Reading Time: 4 minutes

If you are wondering how you can convert a life or lifestyle goal into a financial goal, then here’s a simple approach that can help you with that. – Satyam Pati

आपल्या भविष्यासाठी, आपली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आर्थिक नियोजन करणं आवश्यक आहे, याबद्दल कोणाचंच दुमत नसेल.  पण आर्थिक नियोजन कसं करायचं? ते करण्याची सुयोग्य पद्धत कोणती? असे अनेक प्रश्न बहुतांश लोकांच्या मनात असतील. या लेखात आपण शास्त्रीय पद्धतीने करण्यात येणाऱ्या आर्थिक नियोजनाची माहिती घेऊ. 

आर्थिक नियोजनाची सर्वात महत्वाची पायरी म्हणजे ध्येयनिश्चिती किंवा आर्थिक उद्दिष्ट्ये निश्चित करणे. ध्येयनिश्चिती करण्याच्या पाच महत्वाच्या पायऱ्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत. प्रत्येक पायरीवर जरा थांबून विचार करून, मगच पुढच्या पायरीवर जायचे आहे.

पैशाचं पुनरावलोकन करताना लक्षात ठेवायच्या काही महत्त्वाच्या गोष्टी

१. तुमचे ध्येय पैशाशी निगडित आहे का?

  • पैसा  म्हणजे  सर्वस्व नाही. आपली सर्व स्वप्ने काही पैशाशी निगडित नसतात. परंतु काही उद्दिष्टे मात्र फक्त पैशाशीच संबंधित असतात. 
  • समजा तुम्हाला पुढल्या वर्षी एक सबबॅटिकल रजा घ्यायची आहे. (काही विद्यालयांतून प्राध्यापकांना एक वर्षभर विश्रांती देतात. त्या काळात त्यांनी प्रवास किंवा अभ्यास करावा अशी अपेक्षा असते.अशी रजा म्हणजे सबबॅटिकल रजा). ही रजा घ्यायची की नाही, हा तुमचा निर्णय असतो. पण जर तुम्ही रजेचा निर्णय घेतला, तर त्या कालावधीमध्ये तुम्हाला आर्थिक आधाराची गरज असते. 
  • स्वप्न किंवा उद्दिष्ट्ये ही पैशाशी निगडित नसणे आणि फक्त पैशाशी निगडितअसणे, या दोन्हींमधला फरक समजून घ्या. उदा. समजा तुम्हाला बाहेरगावी फिरायला जायचे आहे आणि त्यासाठी तुमच्या ऑफिसमधून रजाही मंजूर झाली आहे. परंतु फिरायला जायचं का नाही किंवा कुठे जायचे,  हा तुमचा निर्णय असेल, कारण त्यासाठी तुम्हाला आर्थिक गोष्टींचा विचार करणेआवश्यक आहे. रजा मिळाल्यावर तुमचं रजेचे उद्दिष्ट साध्य होतं, फिरायला जायचं नाही. इथे फिरायला जाणे हे आर्थिक घटकाशी निगडित आहे. 

बजेट कसे तयार करावे यासाठी ११ पावले

. किती पैसे आवश्यक आहेत? 

  • एकदा तुमची आर्थिक उद्दिष्टे निश्चित झाली की ती पूर्ण करायला लागणाऱ्या पैशांचा विचार करणं आवश्यक आहे. त्यामुळे दुसरी पायरी म्हणजे,  “किती पैसे आवश्यक आहेत?” 
  • काहीवेळा या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपं असतं. उदाहरणार्थ, तुम्हाला जर एक फ्लॅट विकत घ्यायचा असेल, तर त्याची किंमत तुम्हाला लगेचच समजू शकते. म्हणजे इथे उत्तर लगेच सापडते. 
  • परंतु दीर्घकालीन आर्थिक उद्दीष्टे समजून  घेऊन त्यासाठी लागणारी रक्कम ठरवणे सोपे नाही. उदा. निवृत्तीपश्चात आयुष्यासाठी पैसे जमवणे किंवा तुमच्या मुलांच्या महाविद्यालयीन शिक्षणाचा किती खर्च होणार आहे, हे आत्ताच ठरवणे कठीण असते. 
  • अशा ध्येयासाठी तुम्हाला अनेक बाबी समजून घ्याव्या लागतील. उदा.  महागाई, तुमचे वाढते खर्च व जीवनशैली, विविध गुंतवणुकींवर मिळणार परतावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची बचत करण्याची वृत्ती.
  • आर्थिक नियोजन करताना हिशेब करण्यासाठी इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या “नियोजन  कॅल्युलेटरचा” उपयोग करा.  
  • योग्य किंमत समजून घेणे  खूप महत्वाचे आहे. जर हे काम गुंतागुंतीचे वाटत असेल तर, चागल्या व विश्वासार्ह आर्थिक सल्लागाराची मदत घेऊन तूंचि ध्येयपूर्तीसाठी लागणारी रक्कम निश्चित करा. 

गुंतवणूक कुठे, कधी व कशासाठी?

३. पैशांची गरज असणारा कालावधी निश्चित करणे – 

  • पैशाच्या गरजेचा कालावधी निश्चित करणे ही तिसरी पायरी आहे. 
  • अनेकदा “कधी” याचं उत्तर “किती” यावर अवलंबून असू शकते. कारण मोठी रक्कम जमवायला नेहमी जास्त वेळ लागतो, तर छोट्या रकमेची जुळवाजुळव कमी वेळात होऊ शकते. 
  • सगळ्यात मोठे किंवा छोटे आर्थिक ध्येय कोणते आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला लागणारी रक्कम तुम्ही ठरविक  कालावधीत जमवू शकणार आहात का, याचं उत्तर शोधल्यास, ध्येयपूर्तीच्या क्रम व ध्येय छोटे आहे की मोठे, हे ठरवता येईल. तसेच त्यानुसार त्यासाठी लागणाऱ्या रकमेची वेळ निश्चित करता येईल. 
  • आपल्या ध्येयपूर्तीचा निर्णायक कालावधी आधी आला तर? असा विचार करून ठेवणे आवश्यक आहे. कारण तुमचे “कधी” यावर नियंत्रण राहू शकत नाही. उदा. सेवानिवृत्ती किंवा तुमच्या मुलांचे शिक्षण.   
  • दीर्घकाळानंतर लागणारी रक्कम साठवण्यासाठी जास्त पैशांची आवश्यकता भासू शकतेअशावेळी गुंतवणूक करताना ती महागाईवर मात करायला उपयोगी पडेल, अशा पद्धतीने करणे आवश्यक आहे. 

 पगारच पुरत नाही…बचत कशी करू?

४. तुम्ही बचत करू शकता का

  • आयुष्यातील काही आर्थिक ध्येय अपरिहार्य असतात. निवृत्तीपश्चात आयुष्यासाठी बचत करणे हे असेच एक ध्येय आहे. कारण खूप थोडे असे व्यवसाय आहेत जे तुम्हाला तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आर्थिक उत्पन्न मिळवून देऊ शकतात. परंतु अन्य आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक ती बचत करणे तुम्हाला शक्य आहे की नाही, याचा विचार करणे आवश्यक आहे. 
  • कदाचित तुम्हाला तुमच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवायची इच्छा असेल. पण त्याचा खर्च इतका जास्त असतो की या एकाच उद्दिष्टासाठी चांगल्या गुंतवणूक योजनांमध्ये तुम्हाला पैसे गुंतवावे लागतील.तसेच त्यासाठी प्रति महिना भरपूर रक्कमेची बचत करावी लागेल.
  • एखादे आर्थिक उद्दिष्ट तुमच्यासाठी खूप महत्वाचे असेल, तर तुम्हाला इतर ध्येयांच्या तुलनेत या ध्येयाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना आयुष्यातील प्रत्येक स्वप्न पूर्ण करणे शक्य नसते. कारण आपण केलेली बचत तेवढी पुरेशी नसते.

गुंतवणूक – कला का शास्त्र?

५. तुमची गुंतवणूक तुमचे उद्दिष्ट साध्य करायला उपयोगी आहे का?

  • आता शेवटची पायरी. एकदा तुम्ही तुमचे आर्थिक ध्येय साधण्यासाठी बचत करायचे ठरवले की तुम्हाला गुंतवणूक करायची आहे की नाही आणि नेमकी कुठे करावी लागेल, हे ठरवावे लागेल. तुमची गुंतवणूक तुमच्या बचतीवर अवलंबून आहे.
  • समजा, तुम्हाला तुमच्या निवृत्तीपश्चात आयुष्यासाठी २.५ कोटी रुपयांची गरज आहे. परंतु तुम्ही वीस वर्षात एक कोटी रुपयांची बचत करू शकत असाल तर, उर्वरित १.५ कोटींची अतिरिक्त रक्कम तुम्ही कुठून आणि कशी जुळवणार? याचं उत्तर आहे गुंतवणूक!
  • अशावेळी इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे तुम्हाला कदाचित उपयुक्त ठरू शकेल. यामधील गुंतवणूक साधारणतः सहा वर्षात दुप्पटीहून जास्त परतावा देते. कदाचित वीस वर्षात तुमची रक्कम दुपटीने किंवा तिपटीनेही वाढू शकते. 
  • सोप्या भाषेत सांगायचं, तर तुम्ही केलेली सुयोग्य गुंतवणूक तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोचण्यात मदत करते. 
  • जर तुम्ही ठरवलेल्या आर्थिक ध्येयानुसार बचत केली, तर तुमची गुंतवणूक तुम्हाला तुमचे आर्थिक उद्दिष्ट योग्य वेळेत साध्य करण्यासाठी मदत करू शकेल.

उत्पन्नानुसार वाढवा गुंतवणूक

आता तुम्ही पूर्णपणे तयार आहात! वर दिलेल्या पायऱ्यांचा अभ्यास करून त्याप्रमाणे आर्थिक नियोजन केल्यास लवकरच तुम्ही तुमची आर्थिक ध्येये अगदी वेळेत साध्य कराल, हे नक्की!

– सत्यम पती 

(वरील लेख सत्यम पती यांनी  https://scripbox.com/ या वेबसाईटवर लिहिलेल्या लेखाचा मराठी अनुवाद आहे. सत्यम हे Scripbox टीमचे सदस्य असून ते NSE चे प्रमाणित बाजार व्यावसायिक आणि गुंतवणूक विश्लेषक आहेत. तसेच ते इक्विटी गुंतवणूकदार असून “संपत्ती कशी वाढवायची” याबद्दल ते अभ्यापूर्ण लेखन करतात.)

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.