नमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, सेबी ची नवीन प्रोडक्ट कॅटेगरी दुसरा भाग डेट फंड.
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ११
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १२
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १३
-
ऑक्टोबर २०१७ पूर्वी म्युच्युअल फंडाच्या बऱ्याच कर्जरोखे संबंधित योजना असायच्या आणि त्यामुळे गुंतवणूकदार गोंधळून जायचे.
-
ऑक्टोबर २०१७ मध्ये सेबीने नवीन नियमावली आणली त्याप्रमाणे प्रत्येक म्युच्युअल फंडाला प्रत्येक कॅटेगरी मध्ये एकच फंड चालवता येणार आहे.
-
त्यामुळे गुंतवणूकदाराला फंड निवड करणं सोपा होईल. हा फरक साधारण एप्रिल–मे २०१८ नंतर दिसून आला.
-
डेट फंड हे त्यात गुंतवणूक असलेल्या कर्जरोख्याच्या मुदतीवर ज्याला आपण पोर्टफोलिओ डुरेशन म्हणतो, त्यावर त्याची अस्थिरता किंवा चंचलता अवलंबून असते, म्हणूनच सेबीने सर्व डेट फंड पोर्टफोलिओच्या डुरेशन संभंदीत वर्गीकरण केले आहेत.
-
एक ‘ओव्हरनाईट डेट फंड‘ असेल जो फक्त एक दिवस मुदतीच्या पेपर्समध्ये गुंतवणूक करतील, ‘लिक्विड फंड‘ हे जास्तीतजास्त ९१ दिवसाच्या मुदतीच्या कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करतील.
-
‘अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड‘ मधील पोर्टफोलिओचे डुरेशन हे ३–६ महिने असेल, ‘लो डुरेशन फंड‘ च्या पोर्टफोलिओ चे डुरेशन ६–१२ महिने असेल.
-
पुढचा फंड म्हणजे ‘मनी मार्केट फंड‘. याच्या पोर्टफोलिओ मधील प्रत्येक कर्जरोख्याची मुदत ही एक वर्षापेक्षा कमी असेल.
-
‘शॉर्ट डुरेशन फंड‘ यात पोर्टफोलिओ डुरेशन १–३ वर्षांमध्ये असेल, तर ‘मिड डुरेशन फंड‘ मध्ये पोर्टफोलिओ डुरेशन ३–४ वर्षे असेल. ‘मिड टू लॉन्ग डुरेशन फंड‘ मध्ये पोर्टफोलिओ डुरेशन हे ४–७ वर्षे असेल.
-
‘लॉन्ग डुरेशन फंड‘ मध्ये डुरेशन हे ७ वर्ष पेक्षा जास्त असेल. एक फंड असा असेल जो ‘डायनॅमिक बॉण्ड फंड‘ ह्यात फंड मॅनेजरला कोणत्याही डुरेशनचा पोर्टफोलिओ करण्याची मुभा असेल.
-
‘कॉर्पोरेट बॉण्ड फंड‘ मध्ये किमान ८०% गुंतवणूक ही कंपन्यांच्या कर्जरोखे मध्येच करावी लागेल. ‘क्रेडिट रिस्क फंड‘ मध्ये किमान ६५% हे कमी मानांकन असलेल्या कर्जरोखेमध्ये गुंतवणूक करावी लागेल.
-
‘बँक अँड पी एस यू डेट फंड‘ मध्ये किमान ८०% गुंतवणूक ही त्या कर्जरोख्यांमध्येच करावी लागेल.
-
‘गिल्ट फंडाची‘ किमान ८०% गुंतवणूक ही सरकारी कर्जरोख्यांमध्येच करावी लागेल, ‘१० वर्षे कॉन्स्टन्ट मॅच्युरिटी गिल्ट फंड‘ मध्ये फंड मॅनेजर ला योजनेचा पोर्टफोलिओ मुदतपूर्ती १० वर्षे ठेवावी लागेल.
-
शेवटचा फंड असेल ‘फ्लोटर फंड‘, ज्यात किमान ६५% असे पेपर्स असतील ज्यांचा परतावा हा निश्चित नसतील व कोणत्यातरी बेंचमार्क परताव्याशी जोडलेले असतील.
-
असे हे डेट कॅटेगरी मधले १६ फंड व्यवस्थित वर्गीकरण केलेले आहेत. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की जेवढे ड्युरेशन (दुशण) दीर्घ मुदतीचे तेव्हडी फंडाची अस्थिरता जास्त. परंतु कमी डुरेशनच्या फंडा पेक्षा लांब डुरेशनच्या फंडात परतावा जास्त मिळण्याची शक्यता असते व जोखीमही जास्त असते.
हे सर्व डेट फंड आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार आणि गुंतवणुकीच्या मुदतीनुसार आपण निवड करू शकतो.
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात- भाग १४
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १५
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १६
(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखिमेचा अधीन असते. योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)
म्युच्युअल फंड सही है l
धन्यवाद!
–निलेश तावडे
9324543832
(लेखक हे म्युच्युअल फंड क्षेत्रात २० वर्षे कार्यरत होते. सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत. त्यांना सम्पर्क करण्यासाठी तसेच, ९३२४५४३८३२ या क्रमांकावर व्हाट्स अँप करा. तसेच त्यांचे माहितीपर व्हिडीओ पाहण्यासाठी त्यांच्या YouTube Channel ला सबस्क्राईब करा. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक चालू करण्यासाठी त्यांच्या www.nileshtawde.com या वेबसाईटला भेट द्या. आपल्या विभागात आपल्या मित्रपरिवाराकरिता म्युच्युअल फंड संबंधित मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करा आणि अर्थसाक्षर अभियानामध्ये सामील व्हा.)
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/