कोरोनाव्हायरस आणि करिअर
कोरोनाव्हायरस या जागतिक महामारीमुळे सर्वच देशांत लॉकडाऊन पाळले जात आहे. आयात-निर्यात, उत्पादन क्षेत्र, व्यापार या सगळ्याच क्षेत्रांवर याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होत आहेत. अर्थशास्त्रज्ञांच्या मते ही सर्वात मोठी जागतिक मंदी असू शकते. नुकतेच कॉलेज संपवून बाहेर पडणारे युवक /युवती असो किंवा नव्याने नोकरीला लागलेला तरुण वर्ग असो सगळ्यांना “करिअर” नावाच्या मोठ्या चिंतेने ग्रासलं आहे. आजच्या लेखात आपण कोरोनाव्हायरस आणि करिअर याबद्दल माहिती घेऊया.
लॉकडाऊनचे रिअल इस्टेटवर होणारे परिणाम
कोरोनाव्हायरस आणि करिअर
नवीन नोकरीची संधी –
- कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने काही उपाययोजना अंमलांत आणल्या आहेत. बऱ्याच मोठ्या कंपन्यांची कार्यप्रणाली, बदलण्यात आली आहे.
- तज्ज्ञांच्या मते, करिअरच्या काही नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. जे नवीन नोकरीसाठी पात्र आहेत अशांनी नोकरी शोधणे किंवा अर्ज करणे थांबवू नये, कोरोनाचं संकट टळल्यावर निश्चित चांगली स्थिती येईल आणि संधी ही निर्माण होतील. अमेझॉन, फेसबुक, गुगल अशा मोठ्या कंपन्यांनी त्यांची मुलाखतीची प्रकियासुद्धा बदलली आहे.
- मुलाखतीसाठी व्हिडिओ प्लॅटफॉर्म्स उपलब्ध करुन दिलेले आहेत. या माध्यमांचा वापर करून नोकरीसाठी पात्र असणाऱ्या अर्जदारांनी कंपनीच्या संपर्कात रहायला हवे याचा फायदा संचारपबंदी उठवल्यावर कंपनीची स्थिती चांगली होईल तेव्हा नक्की होईल.
नोकरी शोधणे खरंच तातडीचे आहे का?
- सद्यस्थितीत आरोग्य ही मूलभूत गोष्ट आहे. अशा परिस्थितीत नवीन नोकरी शोधणे खरंच तातडीचे आहे का? याचा विचार करावा.
- करिअरमहत्वाचे आहेच परंतु, सद्य परिस्थिती मध्ये नोकरी शोधणे अत्यावश्यक किंवा गरजेचं नसेल, तर हा प्रयत्न थांबवून योग्य वेळेची वाट पहायला हवी.
- नोकरी मिळणं खरंच गरजेचं आहे असं वाटत असेल तर अर्थार्जनासाठी इतर पर्यायांचा विचार करा.
असा करा लॉकडाऊनचा सदुपयोग
ऑनलाईन नेटवर्क वाढवा-
- हल्ली फेसबुक, लिंक्डइन सारख्या माध्यमांतून अनेक व्यावसायिक विषयांवर चर्चा करणा-या लोकांचे गट आपल्याला पहायला मिळतात.
- यामध्ये तुम्हाला जगभरातील तज्ञ लोकांशी संपर्क साधता येतो, चर्चा करता येते, संभाषणात सामील होऊन समस्यांवरील तोडगे निघू शकतात.
- उदाहरणार्थ, लिंक्डइनच्या ग्लोबल मार्केटींग अँड कम्युनिकेशन्स प्रोफेशनल्स ग्रुपमध्ये सामील होऊ शकता. अशा व्यवसायिक दृष्टीकोन असलेल्या लोकांशी संभाषण करून आपण व्हर्च्युअल पद्धतीने प्रश्नांचं निराकारण करू शकता.
- यामधून मिळालेली माहिती तुमच्या “करिअर डेव्हलपमेंट” साठी नक्की उपयोगी पडेल.
नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक
पार्टटाईम जॉब-
- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे, मात्र या काळात अत्यावश्यक सेवा चालू आहेत. उदाहरणार्थ, मेडिकल, अन्नधान्यांची दुकाने इत्यादी.
- बिगबझार, बिगबास्केट सारख्या साईट्स ऑनलाईन पद्धतीने किराणा मालाच्या ऑर्डर्स घेतात व घरपोच सेवाही देतात, तुम्ही नोकरीसाठी खरंच हतबल झाले असाल, तर यामध्ये तुम्ही घरपोच डिलिव्हरी करण्याचे काम करू शकता.
- पण लक्षात ठेवा, यावेळी तुमच्या संपर्कात कित्येक लोक येऊ शकतात म्हणून योग्य ती दक्षता व काळजी घेऊनच अशी कामे करायला हवी.
- अशा प्रकारची नोकरी “करिअर” म्हणून नाही तर गरज म्हणून करा.
घरभाड्याची चिंता सोडा
- करिअर बरोबरच अजून एक प्रश्न तरुणांसमोर निर्माण झाला आहे तो म्हणजे घरभाडे.
- कोरोनामुळे ओढवलेल्या भीषण परिस्थितीमुळे सरकारने भाडेकरूंना दिलासा दिला आहे.
- सध्या जवळजवळ आणीबाणीची परिस्थिती आहे अशात बऱ्याच लोकांचे उत्पन्नाचे स्रोत बंद झाले आहेत, म्हणून भाडेतत्त्वावर राहणाऱ्या व्यक्ती या काळातील घरभाडं उशिरा देऊ शकतात. त्यांच्याविषयी कुठलीही तक्रार घेतली जाणार नाही. त्यामुळे घरभाडं देण्याची चिंता करण्याची गरज नाही.
आर्थिक संकटांचा पुनर्विचार
नवीन गोष्टी व कौशल्य आत्मसात करा.
- लॉकडाऊनमुळे बराच वेळ मिळाला आहे, खरंतर नवीन नोकरी शोधणे किंवा करिअरला योग्य वळण देण्यासाठी याच वेळेचा सदुपयोग होऊ शकतो.
- या मिळालेल्या वेळेत, तुम्ही ऑनलाईन माध्यामातून नवीन कोर्सेस शिकू शकता. आपल्याला पहिल्यापासूनच येत असणाऱ्या गोष्टी पुन्हा तपासून पाहू शकता.
- कोरोना संपल्यानंतर जेव्हा जॉबसाठी अर्ज करणार आहात त्यावेळी, कोणते मूलभूत गोष्टी किंवा कौशल्य असायला हवे याचा विचार करा.
- उदाहरणार्थ, जर तुम्ही सोशल मीडिया मार्केटिंगच्या जॉबसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला ‘गुगल ॲनॅलॅटिक्स’ बद्दल माहिती असणे गरजेचे आहे. रेझ्युमे पुन्हा अपडेट करण्यासाठी काय शिकायला हवं याचा विचार करा.
ऑनलाईन इंटरव्ह्यू रद्द झाला किंवा पुढे ढकलला असेल तर –
- इंटरव्ह्यू किंवा मुलाखती सगळ्या व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातूनच पार पडत आहेत. कधीकधी असंही होऊ शकतं की तुम्ही जॉबसाठी सर्व तयारी केली आहे आणि ऐनवेळी इंटरव्ह्यू रद्द झाला किंवा पुढे ढकलला गेला.
- अशावेळी भावनिक किंवा हताश होऊ नका, तुम्ही अर्ज केलेल्या पदासाठी पात्र आहेत हे पटवून देण्यासाठी कंपनीच्या नियोक्ताशी ईमेलद्वारे पाठपुरावा करा.
- तुम्ही नम्रपणे चर्चा करून पहा कदाचित मुलाखत पुन्हा आयोजित करण्यात येईल किंवा रद्द झाल्यास पुन्हा प्राथमिक अर्ज करण्याची संधी मिळेल.
- आपण केलेल्या अर्जाबाबतची स्थिती जाणून घेण्यासाठी कंपपनीशी संलग्न रहा, वेळोवेळी शंका वाटल्यास विचारून घ्या.
लॉकडाऊन व अर्थव्यवस्थेतील अपरिहार्य बदल
सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळात करिअरच्या नवीन संधी फारशा उपलब्ध होत नसतील पण तरीही स्वत:मध्ये काही गोष्टींची सुधारणा करून वर सांगितलेल्या गोष्टी लक्षात घेतल्या तर याचा फायदा लॉकडाऊन संपल्यावर निर्माण होणा-या नवीन नोकरीच्या शोधासाठी नक्की होईल.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web Title – Coronavirus and career Marathi mahiti