युलीपची मुदतपूर्ती आणि सामंजस्य करार
युनिट संलग्न विमा योजना (ULIP) हा एक फारसा लोकप्रिय नसलेला भांडवल बाजाराशी संबंधित गुंतवणूक प्रकार असून तो गुंतवणूकदारांना निश्चित परताव्याची हमी देत नाही.
समभाग संलग्न बचत योजना (ELSS) की युनिट संलग्न विमा योजना (ULIP)?
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक व विमा याचे हे मिश्रण आहे यात विविध गुंतवणूक पर्याय उपलब्ध असून योजनांची मुदत संपल्यावर यात जमा युनिटची विक्री करून ती रक्कम गुंतवणूकदारास दिली जाते. यात किमान गुंतवणूक कालावधी ५ वर्ष असून यापूर्वी या योजनेतून बाहेर पडता येत नाही. जर सलग २ वर्ष या योजनेचा हप्ता न भरल्यास त्या योजनेतून बाद केले जाते. या योजनांचे नियंत्रण भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण (IRDA) यांच्याकडून केले जाते.
टॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याची ५ कारणे
- काही वर्षांपूर्वी या योजनांची ग्राहकांची दिशाभूल करून विक्री करण्यात आल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले त्यानंतर यात अनेक बदल झाले असून या योजना आता म्युच्युअल फंड योजनांच्या जवळपास आल्या आहेत.
- यातून पुरेसे विमा संरक्षण किंवा चांगला परतावा मिळत नसल्याने अनेक जण किमान मुदत संपली की भ्रमनिरास झाल्याने यातून बाहेर पडत आहेत.
- याची विक्री प्रामुख्याने बँकांमधील रिलेशनशिप मॅनेजर करीत आहेत.
- एका प्रसिद्ध बँकेतील मॅनेजर ने मी ही योजना घ्यावी म्हणून आग्रह धरला त्यास नकार देताना माझ्या असे लक्ष्यात आले की यासंबंधी त्यांना फारसे ज्ञान असत नाही. त्यांचे पद आणि लोकांमध्ये असलेला विश्वास याचा वापर करून ते असे बकरे शोधत असतात. कोणाकडे पैसे आहेत यांची पूर्ण माहिती त्यांच्याकडे असतेच.
- योजना संपल्यानंतर युनिट विक्री केली जाते त्यावरील नफा तोट्यास भांडवली नफ्यातून वगळले असल्याने नफ्याच्या रकमेवर कोणताही कर लागत नाही तसे तोटा झाला असल्यास तो अन्य फायद्यात समयोजित केला जात नाही.
गुंतवणूक – कला का शास्त्र?
सध्या भांडवल बाजार खूपच खाली गेल्याने या योजनांची मुदतपूर्ती आहे त्याना बराच तोटा होत आहे. यासाठी नियमकांनी (IRDA) त्यांना असलेल्या अधिकारांचा वापर करून, ४ एप्रिल २०२० रोजी एक पत्रक काढून योजनेची मुदतपूर्तीअसलेल्या गुंतवणूकदाराना आपली गुंतवणूक एकरकमी काढून न घेता येत्या ५ वर्षात काढून घेण्याची सवलत दिली आहे. याची सक्ती नसून पूर्णपणे ऐच्छिक आहे याबाबत धारकाने आपल्या कंपनीशी सामंजस्य करार करायचा आहे.
गुंतवणुकीसंदर्भात काही प्रश्न (FAQ) व त्याची उत्तरे
या सवलत योजनेची वैशिष्ट्ये अशी-
- या योजनेची मुदतपूर्ती रक्कम ही पुढील ५ वर्षात विभागून घेता येईल.
- यात मासिक, त्रेमासिक वार्षिक पर्याय उपलब्ध असून यातील पहिला हप्ता मुदतपूर्तीच्या दिवशी मिळेल.
- सध्या ३१ मे २०२० पर्यंत मुदतपूर्ती असलेल्या योजनाच यात येतील.
- सध्याची परिस्थिती पाहता याच अटी कायम ठेवून यामुदतीत भविष्यात वाढ होऊ शकते.
- ज्या योजना भांडवल बाजाराशी संलग्न असून त्यात कोणतीही किमान हमी दिली नाही अशाच योजनांना ही सवलत लागू आहे, पेन्शन योजनांना ही सवलत लागू नाही.
उत्तम परतावा आणि करबचतीचा पर्याय – ईएलएसएस
- हा पर्याय या कालावधीत मृत होणाऱ्या धारकांच्या वारसांना उपलब्ध नाही. मात्र जर धारकाच्या मृत्यू सामंजस्य पर्याय स्वीकारल्यावर झाला, तर त्याच्या वारसास नियमानुसार मृत्यू भरपाईची रक्कम मिळेल. त्याचबरोबर राहिलेल्या सर्व युनिटची विक्री निव्वळ मालमत्ता मूल्यानुसार करून येणारी रक्कम मिळेल.
- यात टप्याटप्यात होणाऱ्या विमोचनासाठी कोणताही आकार घेतला जाणार नाही. योजना बंद झालेली असल्याने त्यावर असलेले विमासंरक्षण मिळणार नाही.
- फंड योजनेत बदल, अथवा स्वीकारलेल्या अंशतः पूर्तीत बदल करता येणार नाही मात्र इच्छा असल्यास मधेच एकरकमी सर्व रक्कम काढून घेता येईल.
- नियमाप्रमाणे फंड व्यवस्थापन करण्याचे शुल्क घेतले जाईल. आधी स्वीकारलेल्या पद्धतीने त्याची जपणूक केली जाईल.
- फंड मुदतपूर्तीमुळे भविष्यात नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी फंड व्यवस्थापनावर राहणार नाही.
- ज्या योजनांच्या माहितपत्रकात सामंजस्य योजना लागू होणार नसल्याची अट होती त्या योजनांनाही ही वाढीव सवलत मिळेल.
- योजनेत दर्शविलेला वारस / धारकाने सर्वात शेवटी नोंदवलेला वारस हाच वाढीव मुदतपूर्ती काळात वारस राहील.
करबचत करणारे गुंतवणुकीचे विविध पर्याय
गुंतवणूकदारांना थोडासा दिलासा द्यायचा हा प्रयत्न असून यात प्रत्येकाचा नेमका काय आणि कसा फायदा होईल किंवा होणार नाही ते सरसकट सांगता येणार नाही तेव्हा असा पर्याय स्वीकारायचा की नाही याचा निर्णय आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी विचारविनिमय करून घ्यावा.
– उदय पिंगळे
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: https://arthasakshar.com/disclaimer/