आरोग्य सेतू : तुमच्या माहितीची गोपनीयता
“आरोग्य सेतू” या ॲप्लिकेशनचे जसे अनेक फायदे आहेत तसे काही तोटेही समोर येत आहेत. विशेषकरून या ॲप्लिकेशनद्वारे घेतल्या जाणाऱ्या वैयक्तिक माहितीच्या वापराबद्दल जेव्हा काही दिवसांपूर्वी काही तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केला तेव्हा ११ मे २०२०, सोमवारी, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रिकल अँड इन्फॉर्मशन टेकनॉलॉजी MeiTY) या ॲप्लिकेशनद्वारे मिळालेल्या माहितीचा वापर करण्याविषयीचे काही शिष्टाचाराचे नियम घालून दिले आहेत. याआधी यासंदर्भातील या ॲप्लिकेशनची ‘गोपनीयता’ (Privacy Policy) हा एकच मार्ग या माहितीच्या सुरक्षेबाबतीत होता.
आरोग्य सेतू ॲप: फायदे व वापराची पद्धत…
कोणत्या प्रकारची माहिती ॲप्लिकेशनच्या माध्यमातून घेण्यात येईल?
- मुख्यत्वे ‘आरोग्य सेतू’ च्या माध्यमातून मिळालेली माहिती ४ भागांमध्ये विभागली जाऊ शकेल –
- वैयक्तिक माहिती – नाव, व्यवसाय, लिंग इत्यादी,
- संपर्क – कोण कोण तुमच्या संपर्कात आले, किती वेळ एकत्र घालवला आणि एकमेकांमध्ये किती अंतर होते,
- संपर्क क्षेत्रासंदर्भातील माहिती म्हणजे तुम्ही कोणकोणत्या भागात, किती किती वेळ घालवला याची भौगोलिक माहिती.
- स्व-तपासणीची माहिती
गोपनीयता – तुमची माहिती कोण कोण आणि कोणकोणत्या कारणांसाठी वापरू शकतात आणि केव्हा?
- आरोग्य सेतू ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आलेली माहिती जास्तीत जास्त १८० दिवस साठवून ठेवता येऊ शकेल.
- सद्य परिस्थितीत कोरोना बाधित नसलेल्या व्यक्तींची माहिती ४५ दिवस राहील आणि कोरोना झालेल्या व्यक्तीची माहिती ९० दिवस राहील.
- ही सर्व माहिती MeiTY , ज्यांनी हे अँप्लिकेशन बनवले आहे, त्यांच्याकडे साठवली जाईल.
- ही माहिती मेईटी – NIC (नॅशनल इनफॉरमॅटिकस सेंटर) – आरोग्य मंत्रालय, राज्यस्तरीय / विभागस्तरीय / स्थानिक सरकारी आरोग्य खाते, राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्था अधिकारी, राज्य व केंद्र स्तरीय इतर मंत्रालये, आणि इतर राज्यस्तरीय/विभागीय/स्थानिक सरकारी सामाजिक आरोग्य संस्था ठराविक आरोग्य हितकारक कारणांसाठीच वापरू शकतील.
जन धन, आधार कार्डची अपरिहार्यता ‘कोरोना’ संकटात सिद्ध…
पुढील संशोधनासाठी होणार उपयोग:
- पुढील संशोधनाच्या उद्देशाने यातील काही माहिती काही नोंदणीकृत भारतीय विद्यापीठांना व संशोधन केंद्रांना तज्ज्ञांच्या परवानगीने देता येईल.
- या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या वापराबद्दल ‘आरोग्य सेतू डेटा ऍक्सेस अँड नॉलेज शेअरिंग प्रोटोकॉल, २०२०’ च्या अंतर्गत केलेला हा कायदा सहा महिन्यांपर्यंत अमलांत आणला जाईल.
- आरोग्य सेतू ॲपद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग हा फक्त COVID-१९ संदर्भातील माहितीसाठीच केला जाईल.
- या ॲप्लिकेशनद्वारे मिळालेली कोरोना झालेल्यांविषयीची माहिती विशेष गरजेची आहे. जेणे करून ते कुठे गेले होते, कोणाकोणाच्या संपर्कात आले होते, किती वेळासाठी संपर्कात आले होते हे समजणे आणि त्यानुसार लवकरात लवकर उपचार करणे शक्य होईल.
NIC द्वारे मिळवलेली वैयक्तिक माहिती जोपर्यंत हा शिष्टाचार अस्तित्वात असेपर्यंत अथवा त्या व्यक्तीने तशी विनंती केली असल्यास अथवा ३० दिवसांपर्यंत यापैकी जो सर्वात कमी कालावधी असेल त्यानुसार त्यानंतर नष्ट करता येईल.
Download Arthasaksharr App – CLICK HERE
Read – Disclaimer policies