आधार कार्डद्वारे मिळवा पॅन कार्ड मोफत !
२०२०-२१ च्या अर्थसंकल्पानुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच आधार कार्डची माहिती देऊन ऑनलाईन पॅन कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये पॅन कार्डसाठीचा पूर्ण फॉर्म भरण्याचीदेखील गरज पडणार नाही. त्वरित पॅन कार्ड मिळण्यासाठीच्या अर्जामध्ये तुम्हाला फक्त तुमचा अधिकृत आधार नंबर टाकायचा आहे, त्यानंतर पुढील E-KYC (ओळखचपात्रांची पूर्तता) पूर्ण करण्यासाठी त्या आधार नंबरशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP पाठवला जातो आणि मग १० मिनिटांमध्ये तुम्हाला PDF फॉरमॅटमध्ये तुमचे पॅन कार्ड मिळते.
पॅन विषयी सर्व काही…
यासंदर्भातील काही महत्वाची प्रश्नोत्तरे
१. ही सेवा कोणासाठी आहे?
- ही सेवा ज्यांच्याकडे अधिकृत आधार कार्ड आहे आणि त्या आधार कार्डला त्यांचा मोबाईल क्रमांक जोडलेले आहे अशा सर्व सज्ञान भारतीयांसाठी उपलब्ध आहे.
- सदर सुविधा ही अल्पवयीन व्यक्तींसाठी उपलब्ध नाही.
२. यासाठी किती खर्च येतो?
- इ-पॅन वितरण प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारे कागदाचा वापर केलेला नसून ही सुविधा संपूर्णपणे विनामूल्य आहे.
- इ-पॅन कार्ड तुम्ही कुठेही वापरू शकता. तरीही, तुम्हाला लॅमिनेटेड कॉपी हवी असल्यास फक्त ₹५० भरून ती घरपोच मिळण्याची व्यवस्था केलेली आहे.
पॅन कार्डमधील चुका दुरूस्त करा आता एका क्लिकवर..!!
३. इ-पॅन कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया:
- ही प्रक्रिया अत्यंत साधी, सोपी, विनामूल्य आणि अत्यंत कमी कालावधीमध्ये उपलब्ध आहे.
- यासाठी तुम्हाला कोणतेही कागदपत्र देखील अपलोड करावे लागत नाहीत.
- ही सुविधा
- ज्यांनी आजपर्यंत पॅन कार्ड काढलेले नाहीये त्यांच्यासाठी,
- आधार क्रमांकाला मोबाईल क्रमांक जोडलेला असेल त्यांच्याठीच व
- ज्यांच्या आधार कार्डवर त्यांची जन्मतारीख DD-MM-YYYY (दिनांक-महिना-पूर्ण वर्ष) या फॉरमॅटमध्ये आहे त्यांच्यासाठी उपलब्ध आहे.
तुमचंही पॅनकार्ड रद्द झालंय का? लगेच तपासा काही मिनिटांत..
४. इ-पॅन कार्डसाठी अर्ज करण्याची पद्धत
१. आयकर विभागाच्या इ-फिलिंग पोर्टल वर जाऊन ‘इन्स्टंट पॅन थ्रू आधार’ (Instant PAN through Adhaar’ जे ‘Quick Links’ मध्ये आहे त्यावर क्लिक करा
२. त्यानंतर येणाऱ्या नवीन पेजवर ‘Get New PAN ‘ वर क्लिक करायचं
३. नवीन पॅनसाठी तुमचा १२ आकडी अधिकृत आधार नंबर टाका आणि तिथे दिलेला कॅप्टचा कोड टाका म्हणजे तुमचे आधार कार्डला जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल
४. आलेला OTP टाका
५. तुमचे आधार कार्ड चे सर्व डिटेल्स तपासा
६. त्यानंतर तुमचा ई-मेल ऍड्रेस तपासून घ्या ज्यावर तुमचे इ-पॅन कार्ड पाठवले जाणार आहे
७. या आधार क्रमांकाचे इ-KYC डिटेल्स Unique Identification Authority of India(UIDAI) सोबत शेअर केले जातात. यानंतर पुढील १० मिनिटांतच तुम्हाला इ-पॅन कार्ड पाठवले जाईल
८. तुमचे पॅन कार्ड तुम्ही “Check Status/ Download PAN” इथे तुमचा संबंधित आधार क्रमांक टाकून डाउनलोड करून घेऊ शकता. शिवाय आधार डेटाबेस मध्ये तुमचा इ-मेल ऍड्रेस असल्यास तुम्हाला PDF फॉरमॅट मध्ये तुमचे इ-पॅन कार्ड त्यावर पाठवले जाते.
आपले आधार कार्ड सक्रिय आहे का?…
५. पॅन-आधार जोडणी प्रक्रियेची शेवटची तारीख काय आहे
- पॅन-आधार जोडणी प्रक्रियेची शेवटची तारीख आहे ३० जून, २०२०.
ही प्रक्रिया सुरुवातीला १२ फेब्रुवारी, २०२० ला ट्रायल बेसिसवर आयकर विभागाच्या इ-फिलिंगच्या माध्यमातून चालवण्यात आली होती. तेव्हा २५ फेब्रुवारीपर्यंतच ६,७७,६८० जणांना हे ‘त्वरित इ-पॅन कार्ड्स’ वितरित करण्यात आले होते, तर २० मे २०२० पर्यंत एकूण ५०.५२ करोड करदात्यांना पॅन कार्ड्स दिले गेले होते त्यापैकी ४९.३९ हे व्यक्तिगत होते तर ३२.१७ कोटी पॅन कार्ड्स हे आधारला लिंक केलेले होते.
आधार कार्ड अपडेट हिस्ट्री आता एका क्लिकवर…
Download Arthasaksharr App – CLICK HERE
Read – Disclaimer policies