Arthasakshar Loss ATM card? try these alternatives in Marathi
https://bit.ly/2YKlntv
Reading Time: 2 minutes

एटीएम कार्ड हरवल्यास काय कराल?

आजकाल पैशांचे व्यवहार हे प्रत्यक्ष नोटांच्या, नाण्यांच्या माध्यमातून करण्याऐवजी प्लॅस्टिक मनी म्हणजेच ऑनलाईन अथवा एटीएम कार्ड वापरून करण्याला प्राधान्य दिले जात आहे. ही एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्ड हे कार्ड धारकाच्या बँक खात्याला जोडलेले असते त्यामुळे ते कोणत्याही कारणाने गहाळ झाल्यास त्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून त्वरित काही कारवाई करणे अत्यावश्यक असते. यामुळे आपले होऊ शकणारे नुकसान टाळण्यासाठी लवकरात लवकर खालील गोष्टी केल्याचं पाहिजेत-

काय आहे कार्ड सुरक्षा योजना?…

. कार्ड्स ब्लॉक करणे: 

  • जोपर्यंत तुम्ही बँकेला तुमची कार्ड्स गहाळ झाल्याबद्दल कळवत नाही तोपर्यंत त्यावर होणाऱ्या सर्व व्यवहारांची जबाबदारी तुमची असते
  • कार्ड गहाळ झाल्याचे लक्षात आल्यावर लगेचच कॉल, मेसेज, मेल, व्हाट्सअँप अशा कोणत्याही माध्यमातुन सर्वप्रथम बँकेला कळवले पाहिजे
  • त्यानंतर बँक तुमचे कार्ड ब्लॉक करते.त्यामुळे कोणीही कोणत्याही प्रकारे तुमच्या कार्डचा वापर करू शकत नाही
  • बँकेच्या वेबसाईटवरून किंवा तुमच्या जवळील शाखेमध्ये जाऊनदेखील तुम्ही हे करू शकता
  • तुमचे कार्ड हरवल्यानंतर त्याचा रिपोर्ट करण्यासाठी बँकेला संपर्क साधल्यानंतरही तुमचा क्रेडिट अथवा डेबिट कार्ड क्रमांक, OTP, CVV यापैकी काहीही तिथे सांगू नका.

एटीएम मधून पैसे आलेच नाहीत, पण डेबिट झाल्याचा मेसेज आला तर काय कराल?…

.एफआयआर (FIR) दाखल करणे

  • ज्या परिसरात कार्ड हरवले आहे त्या परिसरातील पोलीस स्टेशन मध्ये कार्ड हरवल्याची First Information Report (FIR) दाखल करणे आवश्यक आहे
  • बऱ्याचदा नवीन कार्ड देण्यापूर्वी बऱ्याच बँकांमध्ये ही एफआयआर ची प्रत मागितली जाते
  • तुमच्या राहत्या ठिकाणाजवळच्या पोलीस स्टेशनला जात जिथे कार्ड गहाळ झाले आहे त्याच भागातील पोलीस स्टेशमध्ये एफआयआर दाखल करायची असते, ही औपचारिकता साधारण १५२० मिनिटांत पूर्ण होते.

सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा…

. कार्ड विमा

  • साधारणतः सर्वच बँकांच्या कार्डचा विमा उतारावलेला असतो. त्यामुळे तुम्ही बँकेला कार्ड गहाळ झाल्याची सूचना दिल्यानंतर त्या कार्डचा काहीही गैरवापर झाला असल्यास या कार्डविम्यांतर्गत त्याची पूर्ण किंवा जास्तीत जास्त नुकसान भरपाई तुम्हाला मिळू शकते
  • यासाठी तुमच्या खात्यावर होणाऱ्या व्यवहारांवर अथवा क्रेडिट कार्ड असल्यास त्याच्या स्टेटमेंट वर लक्ष ठेवा काहीही संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरिक बँकेला संपर्क साधा.  

. क्रेडिट रिपोर्ट

  • TransUnion CIBIL, Equifax Credit Information Services, Experian Credit Information Company of इंडिया यापैकी कोणत्याही एका कंपनीकडून तुम्ही तुमचा क्रेडिट रिपोर्ट मागवू शकता
  • वर्षातून एकदा कोणतीही वेगळी फी भरता असा क्रेडिट रिपोर्ट तुम्ही मागवू शकता
  • कार्ड गहाळ झाल्यावर थोडा कालावधीनंतर हा रिपोर्ट मागवावा, कारण यांच्याकडे सर्व माहिती पोहोचण्यास थोडा वेळ लागतो.

इंटरनेट बँकिंग – धोके आणि सुरक्षा भाग १…

. नवीन कार्डसाठी अर्ज करणे

  • आवश्यकता असल्यासच नवीन कार्डसाठी अर्ज करावा.
  • तुमचे क्रेडिट कार्ड झाले असले आणि ते ब्लॉक केले असले तरी ते खाते बँकेकडे सुरूच असते.
  • त्यामुळे मागील वर्षांचा त्या कार्डच्या वापराबाबत पडताळणी करून खरंच गरज असल्यास नवीन कार्ड मागवावे अथवा त्या खात्यावरील सर्व व्यवहार पूर्ण करून ते खाते बंद करणे केव्हाही फायदेशीर.
  • नवीन कार्ड हवे असल्यास त्यासाठी ठराविक रक्कम भरून बँकेकडून असे डुप्लिकेट कार्ड मागवता येते.

भारतीय बनावटीचे रूपे कार्ड…

. खबरदारीच्या सूचना

  • आपल्याकडे असणाऱ्या सर्व कार्ड्सची माहिती म्हणजे बँकेचे नाव, कार्ड नम्बर, त्यांची वैधता, गहाळ झाल्यास कालावण्यासाठीचा टोल फ्री क्रमांक याची नोंद आपल्याकडे करून ठेवावी
  • विशेष करून आपल्याला सतत फिरतीवर जावे लागत असेल आणि कार्ड्स हरवण्याची शक्यता जास्त असेल त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून आपली जी कार्ड्स वापरात नसतील ती तात्पुरती बंद करावीत. यामुळे त्यांचा गैरवापर टाळता येऊ शकेल
  • उदा. ICICI बँकेने मोबाईल अँप्लिकेशनच्या मार्फत ही सुविधा पुरवली आहे, त्याचप्रमाणे ऍक्सिस बँकेनेही ही सुविधास्वीच ऑफम्हणून दिली आहे.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Debit Card haravale tar kay karal? Loss of credit Card in Marathi, credit card chorila gele tar kay? in marathi
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.