स्कूल फ्रॉम होम
सध्याच्या ‘स्कूल फ्रॉम होम’ परिस्थितीबद्दल विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्याच्या उद्देशाने ब्रेनली या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठीच्या जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन शिक्षण मंचाने नुकतेच भारतातील २,१५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले. यातून काही रंजक निष्कर्ष मिळाले.
- एकूण २,१५० पैकी ६८.७% ब्रेनली यूझर्सनी सांगितले की, त्यांनी साथीच्या काळापूर्वी कधीही ऑनलाइन क्लासमध्ये सहभाग नोंदवला नव्हता.
- आज शिकण्याच्या या स्वरुपामुळे सुमारे ७२.८% विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रक्रियेवर परिणाम झाला आहे.
- केवळ ४४.६% विद्यार्थ्यांनी सांगितले की, साथ गेल्यानंतरही ते ‘स्कूल फ्रॉम होम’ संकल्पनेला प्राधान्य देतील. त्यामुळे भारतात साथीनंतरही ऑनलाईन क्लास घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ पाहायला मिळू शकेल.
- ६४.५% विद्यार्थ्यांनी म्हटले की, शिक्षणातील ही नवीन पद्धत आता दिनचर्या झाली आहे. तथापि, नेटनर्क कनेक्टिव्हिटीची समस्या भारताच्या वाढत्या ऑनलाइन शिक्षण संस्कृतीत अडथळा ठरू शकते.
- जवळपास ५९.५% विद्यार्थी म्हणाले की, नेटवर्क कनेक्टिव्हिटी ही स्कूल फ्रॉम होम मॉडेलधील जटील समस्या आहे. हीच समस्या तंत्रज्ञान सुविधेबाबतही उभी राहिली का? असे विचारल्यास ५५.९% विद्यार्थ्यांनी नकार दिला.
- ब्रेनलीने विद्यार्थ्यांना संवादाच्या प्राधान्याविषयीदेखील विचारले. याच चार पर्याय सूचीबद्ध करण्यात आले होते. ते म्हणजे-
- फोनकॉल,
- सोेशल मिडीया,
- मेसेजिंग ॲप,
- ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मस.
- या चौघांनाही जवळपास एक चतुर्थांश (अंदाजे २५%) म्हणजेच समान प्रतिक्रिया मिळाल्या.
- या सर्वेक्षणामध्ये लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन कसे केले, हा प्रश्नही विचारण्यात आला.
- ३७.७% विद्यार्थ्यांनी फोन किंवा सोशल मीडियाद्वारे शिक्षकांशी संवाद साधून तर ३०.२ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमाद्वारे प्रश्नांची उत्तरे मिळवल्याचे सांगितले.
- केवळ एका क्लिकवर प्रश्न सोडवण्याच्या अनुभवामुळे विद्यार्थ्यी प्रश्नांची उत्तरे सोडवण्यासाठी या प्लॅटफॉर्मला प्राधान्य देत आहेत.
“झूम ॲप” संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी
या सर्वेक्षणामधील निष्कर्ष म्हणजे, “स्कूल फ्रॉम होम मॉडेल” हे आदर्श असूच शकत नाही. ऑनलाईन लर्निंगमध्ये विज्ञान आणि गणित विषय शिकण्यात विद्यार्थ्यांना सर्वाधिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सर्वेक्षणामध्ये जवळपास ३६% विद्यार्थ्यांनी विज्ञानातील संकल्पना ऑनलाइन शिकताना आलेल्या समस्यांबद्दल वेगवेगळे अनुभव कथन केले, तर ५०% पेक्षा जास्त (५१.९%) विद्यार्थ्यांना गणिते सोडवताना असंख्य अडचणी आल्या. याउलट भाषा विषय शिकताना तुलनेने कमी म्हणजे ३१ टक्के विद्यार्थ्यांना समस्या आल्या.
थोडक्यात, भविष्यामध्ये “डिजिटल स्कुलिंग” सहज शक्य होणार नाही. योग्य शिक्षण पद्धतीसाठी डिजिटल आणि पारंपरिक शिक्षण या दोन्ही पद्धतींचे संतुलन साधावे लागणार हे नक्की.
– Value360 Communications
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies