अर्थसाक्षर यशस्वी फ्रिलान्सर
https://bit.ly/34L87cO
Reading Time: 3 minutes

यशस्वी फ्रिलान्सर व्हायचं आहे?

फ्रिलान्सिंग ही आधुनिक संकल्पना आहे. नोकरी/व्यवसाय सांभाळूनही तूम्ही फ्रिलान्सिंग करू शकता. यशस्वी फ्रिलान्सर होण्यासाठी काही गोष्टींची समज असणे आवश्यक आहे. फ्रिलान्सिंगच्या क्षेत्राबद्दल सांगायचे झाल्यास, फोर्ब्स या जगविख्यात नियतकालिकाने २००५ ते २०१५ केलेल्या सर्वेक्षणानुसार, निर्माण झालेल्या १० दशलक्ष नोकऱ्यांपैकी पैकी ९४ टक्के कामे ही फ्रिलान्सर्स किंवा तात्पुरत्या स्वरूपाची होती. 

Freelancer – फ्रिलान्सर म्हणजे काय रे भाऊ ?

  • फ्रिलान्सिंगच्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकताना आत्मपरीक्षण करणे पुढील वाटचालीच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे.
  • तुमचे व्यक्तिमत्व, तुमची कौशल्ये आणि तुमच्या कमतरता यांची माहिती तुम्हाला असयाला हवी.
  • या गोष्टींवर तुम्ही विचार केलेला असायला हवा आणि त्यानुसार तुम्ही त्या व्यवस्थित हाताळण्याचे नियोजनही केलेले असले पाहिजे.
  • फ्रिलान्सर म्हणून काम सुरु करताना सर्व अभ्यास करणे पुढच्या वाटचालीच्या दृष्टीने उपयोगी ठरेल.
  • आज नामवंत कंपन्याही एखाद्या कामासाठी कर्मचारी नेमण्याऐवजी ते काम एखाद्या फ्रिलान्सरकडून करून घेण्याला प्राधान्य देत आहेत.
  • अनेक तरुण आता ९ ते ५ ची नोकरी करण्यापेक्षा लोक फ्रिलांसींग करण्याचा पर्याय निवडताना दिसतात. परंतु फ्रिलांसींग म्हणजे फक्त ग्राहकांचे प्रोजेक्ट पूर्ण करून देण्याचे काम नाही, तर तो तुमचा व्यवसाय असतो आणि त्यानुसार त्यामध्ये तुमच्या कामासंबंधित कौशल्यांबरोबरच तुम्हाला व्यवसायिकाचीही अनेक कौशल्ये आत्मसात करावी लागतात.
  • तुमच्या प्रगतीसोबत तुमच्या व्यवसायाची वाटचाल, प्रगती याबद्दलचे नियोजन करावे लागते.

यशस्वी फ्रिलान्सर होण्यासाठी खालील मुद्द्यांचा विचार करा 

१. पैशांची कमी-जास्त आवक आणि खर्च: 

  • सुरुवातीला नवीन व्यवसायाला सुरुवात करताना ग्राहकाकडून तुमच्या कामाचे पैसे येण्यावर तुमचे अनेक खर्च अवलंबून असतात. 
  • कधीकधी पैसे मिळायला उशीरही लागू शकतो. अशा वेळी तुमची कामे सुरळीत चालू राहण्यासाठी तुमच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे शिल्लक असणे फार आवश्यक असते.
  • त्याचप्रमाणे ग्राहकांकडून येणारे पैसे व्यवसाय उभारणीला लावले जात असल्याने अनेकदा त्यातून तुमच्या वैयक्तिक खर्चासाठी तुम्हाला कमी पैसे शिल्लक राहू शकतात. यासाठी तुम्ही तयार असायला हवे. 

हे नक्की वाचा: नोकरी करू की व्यवसाय?

२. फ्रिलांसींग म्हणजे फक्त काम मिळविण्यापुरतंच मर्यादित नसते: 

  • जेव्हा कंपनीतील लोकांना एखाद्या कामाकडे लक्ष द्यायला वेळ नसतो अशा वेळी ती कामे फ्रिलान्सर्स कडून करून घेतली जातात. 
  • आजकाल मोठमोठ्या कंपन्याही मोठ्या प्रमाणावर फ्रिलान्सर्सकडून कामे करून घेण्याला प्राधान्य देताना दिसतात. 
  • अशा वेळी कोणत्याही कामाकडे ‘हे एक काम करून दिले की पुन्हा त्या कंपनीशी काही संबंध नाही’ असे पाहणे तोट्याचे ठरू शकते. 
  • फ्रिलान्सर म्हणून काम करताना ‘त्या कंपनीने या एका कामानंतरही आपल्या क्षेत्राशी निगडित सर्व कामे आपल्यालाच द्यायला हवीत’ अशा उद्देशाने काम केले तर यशस्वी फ्रिलान्सर बनणे सोपे होते.

३. कामातील लवचिकता: 

  • फ्रिलान्सर म्हणून काम सुरु केल्यावर तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे काम करण्याची मुभा असते. 
  • तुम्हीच तुमचे मालक असल्यामुळे तुम्ही एकाचवेळी अनेक प्रकल्पांवर काम करण्याची जबाबदारी घेऊ शकता. परंतु, स्वतःची कामे, घरातील जबाबदाऱ्या, घेतलेले वेगवेगळे प्रकल्प इत्यादी सर्व गोष्टींचे व्यवस्थित नियोजन केलेलं नसेल, तर मात्र ते तुम्हाला मनस्ताप देणारे ठरू शकते. 
  • हे टाळण्यासाठी तुमच्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांचे, वेळेचे आणि कामाचे नीट नियोजन केल्यास तुम्ही यशस्वी फ्रिलान्सर नक्कीच होऊ शकाल. 

हे नक्की वाचा : वेळेच्या नियोजनासाठी पार्किन्सनचा सिद्धांत

४. नकार पचवायला शिकणे: 

  • फ्रिलान्सर म्हणून काम करताना अनेकदा एकाच वेळी अनेक ग्राहकांशी हितसंबंध जोडले जातात. पण काही कारणाने पुन्हा त्यांच्याकडून प्रोजेक्ट्स नाकारले जातात. 
  • यामागे कंपनीची स्वतःची काही बंधने, त्यांचा त्या प्रकल्पासाठीचा अर्थसंकल्प (बजेट) अशी अनेक करणे असू शकतात. 
  • अशा वेळी येणारे नकारांकडे वैयक्तिक नजरेतून न पाहता ते स्वीकारता येणे अत्यंत आवश्यक असते. 
  • त्यामुळे निराश न होता आपले काम सुरु ठेवणे, उत्तम दर्जा राखणे हे केल्यास कंपन्या स्वतः तुमच्याकडे काम घेऊन येतात.

५. कामामध्ये विविधता आणणे: 

  • तुम्ही जेव्हा फ्रिलान्सर म्हणून काम सुरु करता तेव्हा फक्त ठराविक कौशल्यांवरच अवलंबून न राहता ग्राहकांच्या मागणीनुसार तुमच्या कामाच्या कक्षा रुंदावण्याची तयारी तुम्हाला ठेवायला लागते. 
  • ठराविक एखाद्या कौशल्यावर अवलंबून न राहता विविध ग्राहकांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून इतरही संबंधित कौशल्ये तुम्हाला ग्राहकांसाठी उपलब्ध करून द्यावी लागतात. यशस्वी होण्यासाठी हे फारच उपयोगी ठरते. 
  • तुमची टीम तुम्हाला तयार करावी लागते आणि ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कायम तत्पर राहावे लागते.

इतर लेख:  तुम्ही नेहेमी कामाची डेडलाईन चुकवता? मग हे वाचा

६. एखाद्या चांगल्या ग्रुपचे सदस्य व्हा: 

  • तुमच्या भागातील काही फ्रिलान्सर्सचा एखादा ग्रुप असेल, तर त्याचे सदस्य व्हा. याचा फायदा असा होईल की तुम्हाला एखाद्या माहितीची, सेवा पुरवणाऱ्याची किंवा अगदी सल्ल्याची जरी गरज पडली तरी त्यांच्याकडून तुम्हाला तास आधार मिळू शकेल. 
  • जर असा कोणता ग्रुप तुमच्या भागात नसेल तर तुम्ही स्वतःही काही फ्रिलान्सर्सना एकत्र घेऊन तसा ग्रुप बनवू शकता. 
  • याचा फायदा तुम्हाला स्वतःला नवीन ग्राहक मिळवण्यासाठीही होऊ शकतो आणि गरज पडल्यास तुमच्या कामामध्ये प्रोत्साहन मिळवण्यासाठी देखील होऊ शकतो. 

७. तुमच्या प्रगतीचे नियोजन आणि वाटचाल: 

  • तुमच्याकडे कितीही काम असले तरीही फ्रिलांसींग हा तुमचा व्यवसाय आहे आणि त्यासाठी सतत मेहनत घेत राहणे गरजेचे आहे. 
  • त्यासाठी तुमच्या क्षेत्राबद्दल तुम्ही नेहमी अपडेटेड असायला हवे, सतत लोकांच्या संपर्कात राहायला हवे, सतत विविध माध्यमातून तुमच्या व्यवसायाची जाहिरात करत राहायला हवे. 
  • ही जाहिरात करण्यासाठी कॉलिंग, वेबसाईट, वेगवेगळ्या ग्रुपच्या नेटवर्किंग मीटिंग्ज अशा विविध मार्गांचा अवलंब केला पाहिजे. यामुळे तुमच्या कामामध्ये सातत्य राहते आणि ‘आता काम नाहीये’ अशी वेळ तुमच्यावर येत नाही.

८. कागदपत्रांचे व्यवस्थापन: 

  • तुम्ही जे काही करत असाल त्या सर्व गोष्टींची नोंद किंवा ताळेबंद ठेवला गेलाच पाहिजे. कारण हा तुमचा व्यवसाय आहे आणि जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्हाला आवश्यक त्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला उपलब्ध होऊ शकली पाहिजे. 
  • याचा उपयोग तुम्हाला ग्राहकाला बिल देताना, तुमचा टॅक्स भरताना, गुंतवणूक करताना, पुढच्या प्रकल्पांविषयीचे निर्णय घेताना, व्यवसायाच्या विस्ताराचा विचार करताना असा प्रत्येकवेळी होत असतो. 
  • शक्य त्या प्रत्येक गोष्टीची बारकाईने नोंद ठेवणे या बाबतीत आग्रही आणि जागरूक असलेच पाहिजे.

संबंधित लेख: काय आहे पॅरेटो सिद्धांत? (८०/ २० चा नियम)

रोजच्या नोकरीला कंटाळून ती सोडून फ्रिलान्सिंगच्या क्षेत्रात उतरताना वर दिलेल्या गोष्टी नीट समजून घ्यायला हव्यात. त्यानुसार पूर्ण तयारीनिशी क्षेत्रात उतरल्यास हा पैसे, नाव आणि समाधान मिळवण्याचा खूप उत्तम पर्याय आहे. या क्षेत्राला बंधने नाहीत आणि नीट हाताळल्यास प्रगतीला मर्यादा नाहीत.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web Title: how to become a successful Freelancer? Marathi 

Web search: Successful Freelancing Marathi Mahiti, Freelancing Marathi Mahiti, freelancing in Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.