टॉप १० स्टॉक्स
https://bit.ly/2FiBKIh
Reading Time: 4 minutes

टॉप १० स्टॉक्स

अनलॉक ४.० अंतर्गत आर्थिक घडामोडी सुरू झाल्यामुळे आर्थिक कामकाजात सुधारणा अपेक्षित आहे. ग्रामीण, अत्यावश्यक आणि डिजिटल पातळ्यांवरही पुढील काही तिमाहीत महसूल आणि वृद्धीच्या दृष्टीने मजबूत बदल दिसेल, अशी आशा आहे. त्यामुळे ग्रोकेमिकल्स, आयटी, टेलिकॉम, दुचाकी आणि ट्रॅक्टर्स, कंझ्युमर ड्युरेबल्स, हॉटेल्स आणि मल्टीप्लेक्स या क्षेत्रांत सकारात्मक वाढ पाहायला मिळू शकेल. दरम्यान सप्टेंबर महिन्यात खरेदी करण्याजोगे टॉप १० स्टॉक्स कोणते आहेत याबद्दल माहिती देत आहेत. 

इतर लेख: Stock Market movies: स्टॉक मार्केटवर आधारित ९ रंजक चित्रपट 

टॉप १० स्टॉक्स:

१. इन्ड्युरन्स टेक्नोलॉजीज (टार्गेट १,३१६ रुपये): 

  • इन्ड्युरन्स टेक्नोलॉजीज लिमिटेड ही भारत आणि युरोपमध्ये कार्यरत, ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स उत्पादन करणारी अग्रेसर कंपनी आहे. 
  • ती प्रामुख्याने भारतातील २ आणि ३ चाकी ओइएम क्षेत्र व्यापते तसेच युरोपमधील चारचाकी ओइएमना ल्युमिनिअम कास्टिंग उत्पादने पुरवते. 
  • कोव्हिड-१९ नंतर, दबावाखाली असलेल्या उत्पन्नामुळे ग्राहकांसाठी खासगी वाहतुकीच्या साधनांचे तिकीट कमी करणे तसेच सोशल डिस्टन्सिंगबद्दल जागरूकता निर्माण करणे हे भारतातील दुचाकी आणि विकसित देशांतील चारचाकींसाठी टेलविंड्स म्हणून काम करतील, अशी अपेक्षा आहे. 
  • इन्ड्युरन्स टेक्नोलॉजी ही भारतातील दुचाकींची मागणी उचलून धरणाऱ्यांपैकी महत्त्वाची लाभार्थी ठरेल, कारण ती भारतातील दुचाकी कंपन्यांना महत्त्वाचे घटक पुरवते.

२. स्वराज इंजिन्स (टार्गेट १,८९२ रुपये): 

  • स्वराज इंजिन ही कंपनी डिझेल इंजिन आणि हाय-टेक इंजिन कंपोनंटचा व्यवसाय करते. 
  • कंपनीने बनवलेले डिझेन इंजिन विशेषत: ट्रॅक्टरसाठी तयार केले आहेत. 
  • ही कंपनी एमअँडएमची प्रमुख ट्रॅक्टर इंजिन प्रदाता आहे. 
  • एमअँडएमने जुलै २०२० मघ्ये आपल्या ट्रॅक्टर विभागात २७%ची वार्षिक मजबूत वृद्धी नोंदवली.
  • ट्रॅक्टर्सची मागणीदेखील भरपूर वाढण्याची आम्हाला अपेक्षा आहे. 
  • रबी पिकांमध्ये चांगले उत्पादन, एमएसपीमध्ये वृद्धी आणि सामान्य मान्सूनमुळे स्वराज इंजिनला फायदा होईल. 
  • सध्याच्या काळात स्वराज इंजिनचे ऐतिहासिक मूल्यांकन केल्यास गुण देण्यास भरपूर वाव आहे.

हे नक्की वाचा: Share Market: सुरक्षित ट्रेडिंग कसे करावे?  

३. हॉकिन्स कूकर (टार्गेट ५,५५६ रुपये): 

  • हॉकिन्स कुकर लिमिटेड (एचसीएल) दोन सेगमेंटमध्ये ऑपरेट होते. म्हणजेच प्रेशर कुकर आणि कुकवेअर. 
  • मागील दोन वर्षांत कंपनीने कूकर आणि कूकवेअर सेगमेंमधील विक्रीतील वृद्धी १३% विरुद्ध ४% एवढी करून टीटीके प्रेस्टीज (मार्केट लीडर) ला मागे टाकले. 
  • २०१९ या वित्त वर्षात कुकिंग गॅस (एलपीजी) ची पोहोच ५६% वरून वाढून २०१९ मध्ये ८०% एवढी झाली आहे. 
  • यामुळे मागील वर्षांच्या तुलनेत कुकर आणि कुकवेअरच्या सर्वोच्च विकासासाठी प्रोत्साहन मिळेल.
  • एकूणच, सरकारच्या उपक्रमांवर आधारीत निरोगी टॉप-लाइन व बॉटम लाइन वृद्धीसह, नवीन उत्पादन लाँच करणे, मजबूत ब्रँड व विस्तृत वितरण नेटवर्कचा असा एचसीएलचा रिपोर्ट असेल, अशी आम्ही अपेक्षा करतो.

४. रिलायन्स इंडस्ट्रीज (टार्गेट २,३६६ रुपये): 

  • आरआयएलने (RIL) रिफायनिंग, पेट्रोकेमिकल्स, टेलिकॉम आणि रिटेल व्यवसायांमध्ये जोरदार उपस्थिती नोंदवली आहे. 
  • जिओ प्लॅटफॅर्म, जो टेलिकॉम व्यवसायाचा भाग आहे, त्यांनी फेसबुक, सिल्वर लेक पार्टनर्स, जनरल अटलांटिक, केकेआरसारख्या प्रमुख गुंतवणुकदारांना आकर्षित करून १.५२ लाख कोटी रुपयांचा गुंतवणूक निधी उभारला. 
  • जिओ प्लॅटफॉर्ममध्ये अशा मोठ्या नावांची गुंतवणूक करून कंपनी केवळ कर्जमुक्त झाली. एवढेच नाही तर, कंपनीच्या डिजिटल क्षमतेवरील गुंतवणूकदारांचा विश्वासाला यामुळे दुजोरा मिळाला. 
  • पुढील ३-५ वर्षांमध्ये डिजिटल आणि रिटेल व्यवसायाच्या संभाव्य यादीत दीर्घकालीन शेअरधारकांसाठी महत्त्वाच्या व्हॅल्यू अनलॉकिंगचे कारण बनेल.

महत्वाचे लेख: भारतातील मान्यताप्राप्त शेअर बाजार आणि वस्तुबाजार

शेअर बाजाराबद्दल सर्वकाही – भाग २

५. मेट्रोपोलिस हेल्थकेअर (टार्गेट २,१५६ रुपये): 

  • कंपनीने २०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी अपेक्षित आकडेवारीपेक्षा जास्त प्रगती केली. तर व्यवस्थापनाने दुसऱ्या तिमाहीसाठी व्यापारात अजून सुधारणा झाल्याचे दर्शवले आहे. 
  • नॉन कोव्हिड रिव्हेन्यू प्री-कोव्हिड पातळीच्या ८० टक्क्यांनी वर आहे. 
  • कोव्हिडसंबंधीत तपासण्यांतील महसूल दुसऱ्या तिमाहीतदेखील कमी होणार नाही. 

६. हिरो मोटोकॉर्प (टार्गेट ३४२२ रुपये): 

  • हिरो मोटोकॉर्प ही भारतातील अग्रेसर मोटरसायकल कंपनी असून तिचा बाजारातील वाटा ५४% आहे. 
  • २०२० या वित्तवर्षात कंपनीने आपला बाजारातील वाट कायम ठेवला. 
  • कोव्हिड-१९ च्या नंतर चांगला मानसून आणि सार्वजनिक वाहतुकीवरून खासगी वाहनांवर शिफ्टींग झाल्यामुळे ग्रामीण भागात एंट्री लेव्हलच्या मोटरसायकलची विक्री वेगाने वाढेल. 
  • हीरो मोटोकॉर्पने दुचाकी क्षेत्रात चांगली कामगिरी ठेवली आणि ऑगस्ट २०२० साठी मोटरसायकलच्या विक्रीत ६.५% ची वृद्धी नोंदवली. 
  • यात कोव्हिड-१९ च्या पूर्वीच्या विक्री प्रमाणात सुधारणा झाली. 
  • हीरो मोटोकॉर्प ग्रामीण भारतातून मजबूत मागणी आणि बाजारातील वाट्याच्या लाभामुळे आमच्या मते, ही दुचाकी क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे.

७. परसिस्टंट सिस्टिम्स (टार्गेट १,२७६ रुपये): 

  • परसिस्टंट सिस्टिम ही स्वतंत्र सेवा विक्रेत्यांसाठी (ISV) अग्रेसर सेवा प्रदात्यांपैकी एक आहे.
  • हायटेक, मॅन्युफॅक्चरिंग व लाइफ सायन्स सेगमेंटमध्ये कंपनीची विशेष उपस्थिती आहे. 
  • ती कोव्हिड-१९ च्या कमीत कमी प्रभावित क्षेत्रांमध्ये काम करते. 
  • कंपनीने २०२१ या वित्तवर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी ३.१% ची महसूल वृद्धी दर्शवली आहे. 
  • सेवांचा (services) व्यवसाय तिमाहीनुसार १.८% वाढून १०८.२ दशलक्ष डॉलर झाला आहे.
  • कंपनीने खर्च नियंत्रित करून मार्जिनमध्ये सुधारणा केल्याची माहिती दिली आहे. 
  • या तिमाहीत कंपनीने मोठे करार मिळवले, पुढील तिमाहीत ते आणखी वाढतील. 
  • आमच्या अपेक्षेनुसार, २०२१ या वित्त वर्षात, कोव्हिड-१९ चा प्रभाव खूप कमी झाल्यावर हातात विविध प्रकल्प असल्याने कंपनीचा नफा वाढेल.

८. रेडिको खेतान (टार्गेट ५१४ रुपये): 

  • रेडिको खेतान लिमिटेड (RKL) ही इंडियन मेड फॉरेन लिकर (IMFL) ची अग्रगण्य निर्माता कंपनी आहे. 
  • मॅजिक मोमेंट्स व्होडका आणि 8PM प्रीमियम ब्लॅक व्हिस्कीसारख्या प्रीमियम ब्रँड्सच्या वाढत्या विक्रीसह कंपनीने संपूर्ण भारतात दमदार कामगिरी केली आहे. 
  • २०२० मध्ये रेडिको खेतान लिमिटेडने इंडियन मेड फॉरेन लिकरचा उद्योग १२% ने वाढला आहे आणि या उद्योगाला वाढवण्यासाठी कंपनी असेच प्रयत्न करेल. 
  • मागील ५ वर्षांमध्ये आरकेएलने प्रीमियम प्रॉडक्ट व्हॉल्युम मिक्स (हाय-मार्जिन बिझनेस) २४% नी वाढवून २९% केला आहे. हा ट्रेंड सुरू राहील अशी आशा आहे. 
  • कंपनीकडे कॅफ फ्लो आणि उच्च लाभकारकतेसह निरोगी बॅलेन्सशीट आहे. सध्याच्या काळात स्पर्धकांच्या तुलनेत ही कंपनी मजबूत स्थितीत आहे.

इतर लेख: शेअर बाजार जोखीम:  काही गैरसमज

९. जेके लक्ष्मी सिमेंट (टार्गेट ३२८ रुपये): 

  • जेके लक्ष्मी सिंघानिया समूहाद्वारे समर्थित अशी प्रामुख्याने उत्तर भारतातील सिमेंट कंपनी आहे.
  • तिची क्षमता १३.३ दशलक्ष टन एवढी आहे. 
  • ही प्रामुख्याने उत्तर भारतात असून, सिमेंट उद्योगासाठीचे ते सर्वात पसंतीचे क्षेत्र आहे. 
  • येथून मागणी व पुरवठा सुधारला आहे. अनुकूल प्रादेशिक स्थितीमुळे कंपनीने वित्तवर्ष २०२१ च्या पहिल्या तिमाहीची चांगली आकडेवारी दर्शवली. 
  • व्हॉल्यूममध्ये मोठी घसरण असूनही सिमेंट कंपन्या वीज आणि इंधनाच्या कमी खर्चामुळे मार्जिन राखण्यास सक्षम ठरल्या. 
  • कच्च्या तेलाचे भाव सतत कमी होत असल्याने पुढेही हीच स्थिती राहील. 
  • जेके लक्ष्मी ही मिडकॅप सिमेंट क्षेत्रातील आमची टॉप पिक आहे. 
  • ऐतिहासिक प्रमाणानुसार, पीअर ग्रुपच्या तुलनेत ती महत्त्वपूर्ण सवलतीत व्यापार करत आहे.

१०. एचसीएल टेक्नोलॉजीज (टार्गेट ७९३ रुपये): 

  • एचसीएल टेक्नोलॉजीज भारताबाहेरील महत्वाच्या चार आयटी सेवा (service) कंपन्यांपैकी एक आहे. 
  • एचसीएल टेकने २०२१ या वित्तवर्षातील पहिल्या तिमाहीत बरोबरीने परिणाम दर्शवले. 
  • कंपनीने खर्च नियंत्रणाचे उपाय अवलंबून मार्जिन आणि नफा मिळवला होता. मॅनेजमेंट कॉमेंटरीदेखील मजबूत होता. 
  • क्लाउडसंबंधीत सेवांसंदर्भातील करार लवकरच होणार असून, कंपनीमार्फत  कामाच्या दर्जामध्ये  सुधारणा करण्यात आल्या आहेत. 
  • उर्वरीत वर्षांसाठी याच धर्तीवर, १.५-२.५% वृद्धीचे व्यवस्थापनही आरामात प्राप्त करता येऊ शकते. 
  • सध्याच्या किंमतींवर हा शेअर, इन्फोसिस आणि टीसीएससारख्या इतर मोठ्या भांडवलाच्या आयटी कंपन्यांसाठी महत्त्वपूर्ण सवलतीवर व्यवसाय करत आहे. 
  • सध्याच्या पातळीवर इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंटमध्ये कंपनीला मार्केट लीडरचा दर्जा देण्यात आला आहे.

– श्री ज्योती रॉय

डीव्हीपी, इक्विटी स्ट्रॅटजिस्ट विभाग

एंजल ब्रोकिंग लिमिटेड 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…