फसवणुकीपासून स्वतःला कसे वाचवाल? लक्षात ठेवा हे तीन सुवर्ण नियम 

Reading Time: 4 minutes फसवणुकीचे गुन्हे अनेक प्रकारचे असतात. फसवणुकीला बळी पडणाऱ्या व्यक्ती श्रीमंत, गरीब, सुशिक्षित, अडाणी अशा कोणत्याही प्रकारच्या असू शकतात. प्रत्येकाची कथा वेगळी, प्रत्येकाच्या समस्याही वेगळ्या. प्रत्येकालाच वाटत असतं की माझंच दुःख मोठं आहे. पण दुःखाची ही भावनाच गुन्हेगारांचे प्रमुख हत्यार आहे. सावज हेरताना गुन्हेगार सर्वात आधी त्याची  दुखरी नस ओळखतो आणि बरोबर त्यावरच फुंकर मारतो. या लेखात आपण समस्यांचे प्रकार, त्यामुळे होणारी फसवणूक, फसवणुकीचे विविध मार्ग, त्याची करणे व त्यासाठीचे खबरदारीचे उपाय याबद्दलची माहिती घेणार आहोत. 

नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक

Reading Time: 3 minutes कोविड-१९ मुळे सध्या सर्व कामकाज ठप्प आहे, अनेक लोक आपापल्या घरी गेल्याने, तसेच त्यातील काही पुन्हा न येण्याच्या शक्यतेने, तात्पुरत्या कंत्राटी / कायम स्वरुपात अनेक रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक होण्याच्या प्रकारातही वाढ होण्याची शक्यता आहे. त्याविषयी संस्थेच्या कार्यकर्तीला आलेल्या अनुभवातून काळजी कशी घ्यावी व फसलो तर काय करावे याविषयी थोडे मार्गदर्शन. 

अर्थसाक्षर कथा – गुंतवणुकीचे मृगजळ

Reading Time: 4 minutes “अर्थसाक्षर कथा” या सदरामधील आजची कथा फसव्या योजनांच्या जाळ्यात अडकल्यामुळे एका हसत्या खेळत्या कुटुंबाला बसलेल्या लाखो रुपयांच्या भुर्दंडाची आहे.

बनावट वाहनविमा योजनेपासून सावध रहा

Reading Time: 2 minutes बनावट विमा योजना विकून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार विमा उद्योगक्षेत्रात अनेक वर्षांपासून घडत आहेत. विमा व्यवहारातील व प्रक्रियेतील गुंतागुंत, बाह्य यंत्रणावर (थर्ड पार्टी सर्व्हिस प्रोव्हायडर्स) असणारे मोठे अवलंबित्व यामुळे  विमा कंपन्यांना या धोक्यांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर ग्राहकांमध्ये विमा योफसजनांबद्दल असलेले अज्ञान आणि विमा ही फायदा नसलेली गुंतवणूक (डेड इन्व्हेस्टमेंट) असल्याचा गैरसमज यामुळे अनेक ग्राहक बनावट योजनांच्या जाळ्यात सापडतात.

पॉन्झी स्कीमच्या सापळ्यात फसलेल्या शांताबाईंची व्यथा

Reading Time: 2 minutes आजची कथा आहे, शांताबाई या एका डॉक्टरांच्या दवाखान्यात काम करणाऱ्या मावशींची… गेल्या २ वर्षांपासून त्या डॉ. दाते यांच्या दवाखान्यात काम करत आहेत. मनापासून काम करणे, वेळ पाळणे, पेशन्टला औषधे नीट सांगणे यामुळे दाते डॉक्टर अगदी निश्चिन्त असत. त्यांच्या नवऱ्याचं अकाली निधन आणि एक मुलगा आणि मुलीची असलेली जबाबदारी त्यांनी अगदी लीलया पेलली. डॉक्टरांकडचा पगार, नवऱ्याची मिळणारी काही पेन्शन यावर त्या हे सगळं चालवत होत्या. मात्र काही दिवसांपासून असलेला त्यांचा उदास चेहरा काही दातेंच्या नजरेतून सुटला नाही आणि त्यांनी शांताबाईंना त्याबाबत विचारलं. आधी फारसं काही न सांगणाऱ्या शांताबाईंचा धीर सुटला आणि त्यांची कहाणी ऐकून डॉ. दाते तर चक्रावूनच गेले

भांडवल बाजारामध्ये गुंतवणूक करताय? मग आधी हे वाचा

Reading Time: 3 minutes भांडवल बाजाराबद्दल लोकांचे दोन टोकाचे गैरसमज आहेत. ते म्हणजे यातून भरपूर पैसे मिळतात किंवा यात लोक भिकेला लागतात. सर्वसाधारण काही न करता आपल्याला भरपूर पैसे मिळावेत अशी सुप्त इच्छा असलेल्या भरपूर व्यक्ती आहेत आणि त्यांच्या मानसिकतेचा फायदा घेणारे लोकही आहेत. या बाबतीत अनेक प्रकारे प्रबोधन होत असूनही एक क्षण असा येतो की व्यक्तिला मोह होतो आणि ती फसते. फसवे दावे करण्यास कायदेशीररित्या बंदी असली तरी अनेक ठिकाणी सर्रासपणे त्याचे उल्लंघन केले जात आहे. त्यावर अंकुश ठेवणाऱ्या यंत्रणेच्या मर्यादा आहेत.