financial crisis
Reading Time: 3 minutes

Financial Crisis

अनपेक्षित आर्थिक संकटाला (Financial Crisis) सामोरे जाण्यासाठी आर्थिक नियोजन महत्वाचे आहेच, याचबरोबर काही महत्वाच्या गोष्टींचा लेखाजोगा ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे. कोरोना महामारी असो व अतिवृष्टीमुळे आलेला पूर संकटं सांगून येत नाहीत. पण या संकटाच्या काळात सर्वात जास्त चिंता असते ती आर्थिक परिस्थितीची. आपण आणि आपले कुटुंब प्राप्त परिस्थितीतही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असल्यास डोक्यावरचा भार काहीसा हलका होतो. सुयोग्य आर्थिक व्यवस्थापन तुम्हाला आर्थिक संकटांमधून बाहेर काढण्यास उपयुक्त ठरतं. आजच्या लेखात आर्थिक व्यवस्थापनाच्या काही महत्त्वाच्या आर्थिक पैलूंची माहिती घेऊया. 

हे नक्की वाचा: नोकरी गेल्यानंतरही पैशाचे नियोजन कसे कराल?

Financial Crisis: ६ महत्वाच्या गोष्टी 

१. पुरेसे विमा संरक्षण 

  • विमा या संकल्पनेबद्दल सर्वसामान्यांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. 
  • सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विमा म्हणजे गुंतवणूक नव्हे तर भविष्यातील जोखीम कमी करण्यासाठी तुम्ही केलेली तजवीज आहे. 
  • आरोग्य विमा, वाहन विमा, अशा सर्वसाधारण विम्याची आवश्यकता आजही अनेकजण मान्य करत नाहीत.
  • आरोग्य विमा खरेदी ही जोखीम व्यवस्थापित करण्याची पहिली पायरी आहे. परंतु, अनेकदा हॉस्पिटलच्या बिलाचा भलामोठा आकडा बघितल्यावर या गोष्टीची जाणीव होते. 
  • कोरोना महामारीमध्ये तर कमी रकमेची विमा पॉलिसी हॉस्पिटलचा खर्च भागविण्यास असमर्थ ठरली आहे. 

किती रकमेचा आरोग्य विमा घ्यावा? 

  • आरोग्य विमा घेताना तो किती रकमेचा घ्यावा यासाठी कोणताही लिखित नियम नाही. ही रक्कम व्यक्तिसापेक्ष बदलत जाते. 
  • जर तुम्हाला कोणताही आजार नसेल आणि तुमचे आरोग्य उत्तम असेल, तर तुम्हाला रु. ५ ते रु. १० लाख  कव्हरेज असणारी आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करणं आवश्यक आहे. 
  • तुमच्याकडे आधीच आरोग्य विमा पॉलिसी असल्यास, टॉप-अप किंवा सुपर टॉप-अप योजनेची निवड करून कव्हरेज वाढवता येईल.

महत्वाचा लेख: आरोग्य विम्यासंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी 

२. जीवन विमा 

  • आरोग्य विम्याप्रमाणेच जीवन विमादेखील तितकाच महत्वाचा आहे. 
  • आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाचे भविष्य आर्थिकदृष्ट्या करण्यासाठी जीवनविमा घेतला जातो.  यामध्ये मुदतीचा विमा आरोग्य कवच आणि  पुरेसे जीवन विमा संरक्षणही देतो ,
  • मुदतीचा विमा जितक्या लहान वयात घ्याल तितका त्याचा प्रिमिअम कमी असतो. ही कमी किमतीची, उच्च संरक्षण देणारी योजना आहे
  • जीवन विमा योजनेसोबत अपघात, गंभीर आजार इत्यादी कारणांसाठी रायडर्सची सुविधा उपलब्ध असते. 

जीवन विमा किती रकमेचा घ्यावा?

  • जर मुदतीचा विमा घेतला असेल तर आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान २० पट विमा संरक्षण, तर इतर कोणतीही जीवन विमा योजना घेताना वार्षिक उत्पन्नाच्या किमान १० पट विमा संरक्षण घेणे आवश्यक आहे. 
  • रायडर्सची सुविधा घेताना त्यामधील नियम व अटी तपासून घेणे आवश्यक आहे. तसेच संबंधित रायडर्ससाठी उपलब्ध असणाऱ्या स्वतंत्र विमा योजनांच्या हप्त्याची किंमत, कव्हरेज या साऱ्याची खात्री करून मगच रायडर्स खरेदी करा. 

संबंधित लेख: विमा पॉलिसीमध्ये अतिरिक्त कव्हरेज देणारे “रायडर” तुम्हाला माहिती आहेत का? 

३.भविष्यातील संभाव्य खर्चाची तरतूद 

  • भविष्यातील संभाव्य खर्चांसाठी किंवा आपल्या दीर्घकालीन उद्दिष्टांची तरतूद करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नियमित बचत करणे. 
  • यामध्ये मुलांचे उच्चशिक्षण, निवृत्ती नियोजन, घराचे रिनोव्हेशन, महागडी गाडी, परदेशी सहल अशा सर्व गोष्टींचा समावेश होतो. 
  • तुमचे भविष्यातील संभाव्य खर्च व दीर्घकालीन उद्दिष्ट्ये निश्चित करून त्यानुसार प्रतिमाह बचत करण्यास सुरुवात करा. 

गुंतवणूक कुठे कराल? 

  • नियमित बचतीसाठी एसआयपी हा सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र यामध्ये गुंतवणूक करताना व्यवस्थित अभ्यास करून अथवा गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने गुंतवणूक करा. 
  • एनपीएस ही करबचतीसह उत्तम परतावा देणारी सरकारी योजना आहे. यामध्ये तुलनेने जोखीम कमी असते. 
  • दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी इक्विटी आधार गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते. 

४. आपत्कालीन निधी

  • अचानक उद्भवणाऱ्या संकटांमध्ये आर्थिक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे स्वतंत्र निधी असणे आवश्यक आहे. 
  • हा निधी किती असावा हे प्रत्येकाने आपली आर्थिक परिस्थिती, दैनंदिन गरजा, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, गुंतवणूक या साऱ्याचा विचार करून ठरवावा. 
  • किमान सहा महिन्यांच्या घरखर्चा भागवत येईल इतका आपत्कालीन निधी असणं  कधीही उत्तम.

गुंतवणूक कुठे कराल? 

  • तुम्हाला योग्य वाटणाऱ्या कोणत्याही गुंतवणूक पर्यायामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. परंतु, ती गुंतवणूक गरजेच्या वेळी सहज काढून घेता येईल अशी असावी. 
  • यासाठी करमुक्त परतावा देणाऱ्या लिक्विड फंडामध्ये अथवा अल्प मुदतीच्या डेट फंडामध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.

विशेष लेख: बचत आणि गुंतवणुकीचे ५ मूलभूत नियम 

५. रेकॉर्ड किपींग 

  • तुम्ही केलेली गुंतवणूक, विमा, आदी गोष्टींचा  रेकॉर्ड ठेवणे हा तुमच्या गुंतवणुकीच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. 
  • आपल्या कुटुंबातील सदस्यांना, जोडीदाराला आपल्या गुंतवणुकीची व आर्थिक बाबींची संपूर्ण माहिती  बँक तपशीलांसह देणं आवश्यक आहे. अन्यथा गरजेच्या वेळी गुंतवणुकीचा काहीच उपयोग होणार नाही. 

रेकॉर्ड किपींग कसे कराल? 

  • यासाठी तुमच्या सर्व प्रकारच्या गुंतवणुकीची माहिती व विमा पॉलिसीची माहिती तारीखवार व बँकेच्या तपशीलांसह एखाद्या डायरीमध्ये अथवा एक्सेल फाईलमध्ये नोंदवून ठेवा. 
  • या संबंधित लेखाजोग्याची माहिती तुमचा जोडीदार, आई-वडील अथवा विश्वासू व्यक्तीलाच असावी. 

६. नामनिर्देशन (Nomination) 

  • गुंतवणूक आणि विमा योजनांच्या खरेदीचा हेतू आपल्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करणे हा असतो.
  • तुमच्या सर्व गुंतवणूक आणि विमा योजनांसाठी नामनिर्देशन केले असल्याची खात्री करा. 
  • बहुतांश गुंतवणूक व विमा योजनांसाठी नामनिर्देशन करणे हे सक्तीचे असतेच. परंतु, काही कारणांनी नामनिर्देशन केले नसल्यास कुटुंबातील सदस्यांना त्यावरील रकमेवर दावा करणे कठीण होऊ शकते.
  • नामनिर्देशन केल्यानंतरही इच्छापत्र तयार करून त्यामध्ये तुमचा उत्तराधिकारी निश्चित करू शकता. 

संबंधित लेख: नॉमिनी विरुद्ध कायदेशीर वारसदार, मालकी हक्क कोणाचा? 

नामनिर्देशन बदलता येते 

  • नामनिर्देशन ही सुविधा आहे. काही कारणांनी तुम्हाला नॉमिनीचे नाव बदलायचे असल्या तुम्ही ते केव्हाही बदलू शकता. 
  • उदा. तुम्ही नामनिर्देशित केलेली व्यक्ती तुमच्या आधीच मृत्यू पावल्यास अथवा लग्नापूर्वी पालकांच्या नावे केलेले नॉमिनेशन लग्नानंतर ते जोडीदाराच्या नावे करायचे असल्यास तुम्ही नॉमिनी बदलू शकता. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

web search: Financial Crisis preparation in Marathi, Financial Crisis preparation Marathi Mahiti, Financial Crisis preparation Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.