Reading Time: 2 minutes

अर्थसाक्षर अनुभव स्पर्धा

ही दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा…..

आयुष्याच्या प्रवाहात आपण अनेक अडथळ्यांचा सामना करत असतो. पडत, धडपडत, सावरत चालू असणारं आयुष्य म्हणजे अनुभवांचा खजिना असतो. 

“पुढच्यास ठेच मागचा शहाणा”, या म्हणीनुसार आपल्या अनुभवांमधून आलेलं शहाणपण जर का सगळ्यांना सांगितलं, तर इतरांनाही या अनुभवाचा फायदा होतो.म्हणूनच अर्थसाक्षर.कॉम आपल्यासाठी घेऊन आली आहे एक आगळीवेगळी स्पर्धा – “अर्थसाक्षर अनुभव स्पर्धा”! 

यासाठी आपल्याला फक्त आपले आर्थिक विषयांसंदर्भात आलेले बरे- वाईट अनुभव लिखित ऑडिओ अथवा व्हिडीओ स्वरूपात आम्हाला info@arthasakshar.com या ई-मेल आयडी वर पाठवायचे आहेत. 

आलेल्या लेखांमधून दर आठवड्याला आकर्षक बक्षिसासाठी एक विजेता निवडण्यात येईल. 

आपले अनुभव अनेकांची आर्थिक फसवणूक थांबवू शकतात. आपले अनुभव शेअर करून अर्थसाक्षरतेच्या या मोहिमेत सामील व्हा. 

नियम व अटी :

 1. लेख मराठीत अथवा इंग्रजीत लिहिणे आवश्यक आहे. 

 2. यामध्ये केवळ आर्थिक गोष्टींशी निगडीत असलेले वैयक्तिक अनुभव नमूद करावेत. 

 3. लेखाखाली आपले नाव प्रसिद्ध करण्यात येईल. आपले नाव गोपनीय ठेवायचे असल्यास लेखाखाली तसे नमूद करावे.

 4. आर्थिक अनुभव लिहिताना पुढील विषय असू शकतात :

  • बचतीची सवय, 

  • कौटुंबिक वातावरणाचा , मित्र परिवाराचा बचतीच्या सवयीवर बरा-वाईट परिणाम 

  • दैनंदिन आर्थिक अडचणींना सामोरे जाताना दाखवलेले धैर्य

  • अचानक उद्भवलेले आर्थिक संकट व तुम्ही कसे सामोरे गेलात 

  • आर्थिक फसवणुकीच्या घटना, त्यातून तुम्ही शोधलेला मार्ग व यासंदर्भात तुमच्याकडून कुठला ‘अलर्ट मेसेज’ द्याल.

  • तुम्ही केलेल्या चुकीच्या गुंतवणुका 

  • तुम्ही केलेल्या फायदेशीर गुंतवणुका 

  • गुंतवणुक आणि फसवणुकीच्या घटना

  • तुमचे यशस्वी आर्थिक नियोजन

  • फसलेले आर्थिक नियोजन

  • कर्ज घेताना घ्यायची काळजी

  • कर्ज परतफेडीची जिंकलेली लढाई

या व अशा अनेक विषयांवर तुम्ही तुमच्या अनुभवांतून कुणालातरी मार्गदर्शन करू शकता. लवकरात लवकर आपले अनुभव आम्हाला मेल करा. 

धन्यवाद !

टीम अर्थसाक्षर 

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Click to rate this post!
[Total: 2 Average: 4.5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *