Ready possession Home: बांधकाम सुरू असलेलं घर घ्यावं की तयार असलेलं ‘रेडी पझेशन’ घर घ्यावं? 

Reading Time: 3 minutesकोणत्याही व्यक्तीसाठी ‘स्वतःचं घर’ हे फक्त एक वास्तू नसून ते एक स्वप्न असतं. नवीन घर घेतांना आणि विशेषतः पहिलं घर घेतांना प्रत्येक जण हा खूप सतर्क असतो. मध्यमवर्गीय मराठी माणसाला तर अशावेळेस बांधकाम सुरू असलेलं घर घ्यावं की तयार असलेलं ‘रेडी पझेशन’ घर घ्यावं? वापरलेलं ‘रिसेल’ घर घ्यावं? असे बेसिक प्रश्न पडत असतात. योग्य उत्तरं फार कमी लोकांकडे असतात. इतका मोठा निर्णय घेताना होणाऱ्या संभाव्य चुका टाळण्यासाठी आम्ही या विषयाबद्दल माहिती देत आहोत. 

Policybazaar.Com: पॉलिसी बाजार.कॉम कंपनीची थक्क करणारी यशोगाथा

Reading Time: 4 minutesजीवन विमा ही संकल्पना भारतात जगातील इतर देशांपेक्षा उशिराच आली. मागच्या काही वर्षात मात्र परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. विमा का गरजेचा आहे? हे आता लोकांना पटवून सांगावं लागत नाही. अचानक ओढवू शकणाऱ्या आजारपणातून बाहेर पडण्यासाठी आणि आपल्यानंतर आपल्या प्रियजनांची काळजी घेण्यासाठी विमा आवश्यक आहे हे आता एव्हाना सर्वांना तत्वतः पटलं आहे. असं असलं तरीही, आजही भारतात केवळ ३.६९% लोकांनी आपला विमा काढला आहे ही वस्तुस्थिती आहे. सरकारी विमा कंपन्यांचा एकसुरी कारभार, विमा प्रतिनिधींची मनमानी यामुळे सुद्धा काही लोक विम्यापासून लांब राहिले आहेत हे ही एक सत्य आहे. 

Nykaa IPO: नायका आयपीओ बाबतच्या या १० गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

Reading Time: 3 minutes‘नायका’ आयपीओ (Nykaa IPO) मार्केटमध्ये विक्रीसाठी उपब्ध होत आहे. साधारणतः महिला वर्गाला किंवा ‘पती’ वर्गाला ‘नायका’ नेमका काय ब्रँड आहे? ही कंपनी कुठल्या क्षेत्रात काम करते? याविषयी थोडीबहुत माहिती असेल, परंतु आपण गुंतवणूकदार किंवा आर्थिक घडामोडींकडे सुज्ञपणे पाहणारे जाणकार असाल तर ‘नायका’च्या आयपीओची कुणकुण आपल्या कानी आली असेल. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी ‘नायका’ विषयी काही महत्वाची माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे.

Aptus Value Housing Finance: Aptus व्हॅल्यू हाऊसिंग कपंनीच्या आयपीओ संदर्भात ९ महत्वाच्या गोष्टी : 

Reading Time: 3 minutesगृहकर्ज देणाऱ्या क्षेत्रातील मोठं नाव  ‘Aptus व्हॅल्यू हाऊसिंग (Aptus Value Housing Finance)’ कंपनी आपला आयपीओ घेऊन आली आहे. घराचं बांधकाम, नवीन घर खरेदी, घर सुधारणा या सर्व गरजांसाठी लोकांना तत्परतेने मदत करणाऱ्या या कंपनीच्या आयपीओला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतांना दिसत आहे. ‘Aptus व्हॅल्यू हाऊसिंग’ या कंपनीने काही वर्षांपूर्वी मालमत्ता विमा सुद्धा सुरू केल्याने त्यांच्या ग्राहक संख्येत लक्षणीय वाढ झाली आणि ही कंपनी खऱ्या अर्थाने लोकांना माहीत झाली.

Nuvoco Vistas Corporation IPO: ‘नुवोको विस्टाज कॉर्पोरेशन’ आयपीओ बाबत या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

Reading Time: 3 minutes‘नुवोको विस्टाज कॉर्पोरेशन’चा आयपीओ (Nuvoco Vistas Corporation IPO) मार्केटमध्ये विक्रीसाठी उपब्ध झाला आहे. यामध्ये आपण गुंतवणूक करायला हवी की नको? आजच्या घडीला घेतलेला निर्णय भविष्यात पश्चातापास कारणीभूत  ठरणार नाही ना? अशी चलबिचल मनात असताना उगाच धाडसी निर्णय घेत अंधारात तीर मारणे म्हणजे आत्मघात ठरू शकतो. या आयपीओ बाबत कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी आपणास माहिती असायला हव्यात.

Vijay Sharma: कर्जबाजारी व्यवसायाला १० वर्षात यशोशिखरावर नेणाऱ्या विजय शर्मा यांची यशोगाथा

Reading Time: 2 minutes“सुट्टे नाहीयेत ? सर, Paytm करा ना…”हे वाक्य नित्याचेच झाले आहे. विजय शर्मा (Vijay Sharma) यांच्या पेटीएम कंपनीच्या यशाची घोडदौड ‘फोन पे’, ‘गुगल पे’ सारखे तगडे प्रतिस्पर्धी असतानाही चालूच आहे. सध्या अनेक डिजिटल वॉलेट आपल्या सेवेत उपलब्ध झाले आहेत. आज घराबाहेर पडतांना तुम्ही वॉलेट घेतलं नाही तरी चालतं, फक्त मोबाईल सोबत ठेवा. तुमच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारात अडथळा येणार नाही. मोबाईलद्वारे पैसे देता येणं म्हणजेच ‘Pay through mobile’ ही संकल्पना भारतात पेटीएमने रुजवली आहे हे मात्र निर्विवाद सत्य आहे. 

Ghadi Detergent: घडी डिटर्जंट कंपनीचा थक्क करणारा प्रवास

Reading Time: 4 minutes“पहले इस्तमाल करे, फिर विश्वास करे” प्रत्येक वस्तू आणि सेवांना लागू पडणारी ही ‘घडी’ डिटर्जंटची  (Ghadi Detergent) टॅगलाईन सर्वांच्या परिचित आहे. कानपूरच्या मुरलीधर ग्यानचंदानी आणि बिमलकुमार ग्यानचंदानी यांनी १९८७ मध्ये प्रस्थापित निरमा, सर्फ, व्हील यांच्यासमोर ‘घडी’ हे आणखी एक कपडे धुण्याची पावडर व साबण हे उत्पादन बाजारात आणलं. ग्यानचंदानी कुटुंबाला कित्येक व्यवसायिकांनी संभाव्य धोक्याची जाणीव करून दिली होती. पण, ग्यानचंदानी बंधूंनी ‘कपडे धुण्यासाठी वापरता येईल अशा पावडरचा मागणी विरुद्ध पुरवठा हा पूर्ण अभ्यास करूनच ‘घडी’ सुरू करण्याचा निर्णय घेतला.

Financial Crisis: आर्थिक संकटात मदतीला येणाऱ्या या ६ गोष्टींचा विचार नक्की करा

Reading Time: 3 minutesकोरोना महामारी असो व अतिवृष्टीमुळे आलेला पूर संकटं सांगून येत नाहीत. पण या संकटाच्या काळात सर्वात जास्त चिंता असते ती आर्थिक परिस्थितीची. आपण आणि आपले कुटुंब प्राप्त परिस्थितीतही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असल्यास डोक्यावरचा भार काहीसा हलका होतो. सुयोग्य आर्थिक व्यवस्थापन तुम्हाला आर्थिक संकटांमधून बाहेर काढण्यास उपयुक्त ठरतं. आजच्या लेखात आर्थिक व्यवस्थापनाच्या काही महत्त्वाच्या आर्थिक पैलूंची माहिती घेऊया. 

Devyani IPO: देवयानी इंटरनॅशनलच्या आयपीओ बाबत या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

Reading Time: 3 minutes‘देवयानी इंटरनॅशनल’चा आपीओ (Devyani IPO) विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. ही कंपनी काय आहे, कधीपासून आहे, कुठल्या क्षेत्रात काम करते, एकूणच कंपनीचा इतिहास, भूगोल माहित नसताना आपण गुंतवणुकीसाठी पाऊल उचलत असाल तर निर्णय चुकू शकतात त्यामुळे ‘रुको जरा सबर करो..!’

Five Hour Rule: एक आयडिया जो बदल दे आपकी दुनिया!

Reading Time: 3 minutesबिल गेट्स, वॉरन बफे, एलोन मस्क, बराक ओबामा, ऑपरा विंफ्री, जॅक मा अशा जागतिक कीर्ती मिळवलेल्या यशस्वी व्यक्तींमधला एक समान धागा म्हणजे ‘फाईव्ह अवर रुल’.या दिग्गजांची नावे वाचून तुमची उत्सुकता अजून वाढली असेल आणि आज खूप मोठं आणि महत्वाचं वाचायला मिळणार हे लक्षात आलं असेल.