Health Insurance Renewal: आरोग्य विमा नूतनीकरण करताना तपासा या ९ गोष्टी

Reading Time: 3 minutesआरोग्य विमा हा स्वतःसाठी व  कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा असतो. यामुळे आरोग्य खर्चामुळे होणारे वित्तीय त्रास कमी होण्यास मदत होते. आरोग्य विमा मात्र हा काही विशिष्ट काळासाठीच असतो. कालावधी संपल्यावर त्याचं नूतनीकरण करणं आवश्यक असतं. स्वास्थ्य विम्याचे नूतनीकरण करणे अगदी सोपं आहे. परंतु, नूतनीकरण करताना काही गोष्टींची खात्री करून घेणे आवश्यक असते.

कुठल्या मालमत्ता मृत्युपत्रात समाविष्ट करू नयेत?

Reading Time: 2 minutesमृत्यूपत्र म्हणजे मृत्यूपश्चात आपल्या मालमत्तेची विभागणी करण्यासंबंधीचा दस्तावेज. मृत्यूपत्र तयार करण हे सक्तीच नसल तरी गरजेच मात्र आहे. मृत्यूपत्र करताना कायदेशीर बाबींच्या पूर्ततेपेक्षाही कठीण काम असत ते मालमत्तेच वर्गीकरण आणि विभाजन. सगळ्या मालमत्ता मृत्यूपत्रामध्ये नमूद करता येत नाहीत. जरी सर्व मालमत्ता तुमच्या स्वतःच्या मालकीच्या असल्या तरी काही मालमत्ता या संबंधीत कायद्यांनुसारच हस्तांतरित केल्या जातात किंवा त्या मालमत्तांसाठी मालकी हक्क निर्माण होतानाच लाभार्थीच (beneficiary) नाव नमूद कराव लागत. त्यामुळे या मालमत्तांची तरतूद मृत्यूपत्रात केल्यास  एका मालमत्तेसाठी एकापेक्षा जास्त लाभार्थींची (multipal  beneficiary) तरतूद केली जाऊ शकते व त्यामुळे मालमत्ता हस्तांतरित करण्यावरून विनाकारण निर्माण होणाऱ्या गोंधळाचाही सामना करावा लागतो.

लॉकडाऊनच्या काळात स्वत:ला शांत व आनंदी कसे ठेवाल?

Reading Time: 2 minutesकोरोना या संसर्गजन्य रोगाने सगळीकडे निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे. मानवी आयुष्यात अनिश्चितता आली आहे. जगभरातील सर्व देश या परिस्थितीला तोंड देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे लढत आहेत.सतत त्याच त्याच गोष्टी ऐकून मनाचा गोंधळ होऊ शकतो. आयुष्यात १००℅ सुखी झालात तर मग ते आयुष्य कसलं, नाही का? पण या भयावह परिस्थितीत आपण शांत व आनंदी राहण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो. यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्या. 

पगारच पुरत नाही…बचत कशी करू?

Reading Time: 2 minutesपगारच पुरत नाही…बचत कशी करू? आज आपण बचतीच्या सवयी व उत्पन्नाची विभागणी…

वेबिनार – “पडत्या शेअर बाजारात SIP बंद करावी का?”

Reading Time: < 1 minuteमंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२० रोजी सकाळी ११ वा.  Join Zoom Meeting https://us02web.zoom.us/j/89865210901?pwd=TZ-IGeNfmzc Meeting ID: 898 6521 0901 Password: 444444

कोरोना व्हायरसचे पृथ्वीवर झालेले परिणाम

Reading Time: 3 minutesकोरोना व्हायरस हा जीवघेणा विषाणू चीनच्या वुहान शहरापासून जगभरात पसरला. हवाई मार्गाने येऊन याने भारतातही पाय पसरले. संपूर्ण पृथ्वीवर या रोगाने थैमान मांडले आहे. याला रोखण्यासाठी शास्त्रज्ञ, संशोधक त्यांचे प्रयत्न करत आहेतच, पण अद्याप यावर योग्य इलाज मिळाला नाही. कोरोनाचे गंभीर परिणाम पृथ्वीवर प्रत्येक सजीव जातीवर दिसून येत आहे. या महामारीचा पृथ्वीवर व सजीवांवर काय परिणाम होत आहे, ते आपण जाणून घेऊ. 

कोरोना – लॉकडाऊनच्या काळात या ८ आर्थिक गोष्टी अवश्य करा

Reading Time: 3 minutesकोव्हिड-१९ या जीवघेण्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने २१ दिवसांच लॉकडाऊन जाहीर केले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आणि मृतांचा आकडा लक्षात घेता, हे लॉकडाऊन अजून वाढवण्यात आले आहे. हा वेळ म्हटलं तर सक्तीचा आणि कंटाळवाणा वाटू शकतो आणि म्हटलं तर याचा सदुपयोगही करता येऊ शकतो. वेबसिरीज, सिनेमे यामुळे वेळ छान जातही असेल, पण या काळात काही आर्थिक नियोजन करता येतं का? याकडेही लक्ष देऊ या.  या लॉकडाऊनच्या काळात, कोणत्या आर्थिक बाबी पहायला हव्यात, याबाबत या लेखातून जाणून घेऊ. 

गुगल माय बिझनेस म्हणजे नेमकं काय?

Reading Time: 3 minutes“गुगल” हे एक सर्च इंजिन आहे, म्हणजे इंटरनेटवरील एक संकेतस्थळ ज्यावर कुठल्याही विषयाची माहिती असो किंवा तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर एका क्लिकवर मिळते. खाण्यासाठी उत्तम हॉटेल शोधण्यापासून ते चांगला लाँड्रीवाला भैया शोधण्यासाठी हे गुगल कायम आपल्या मदतीसाठी सज्ज असतं. या हॉटेल्स किंवा या सोयी सुविधांची माहिती गुगलवर येते कुठुन? तर याचं उत्तर म्हणजे व्यावसायिक त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी, जास्तीचे गिऱ्हाईक खेचण्यासाठी, जाहिरातीसाठी “गुगल माय बिझनेस” या गुगलमार्फतच चालू झालेल्या टूलचा वापर करतात. थोडक्यात सर्व व्यावसायिकांसाठी हक्काचं व्यासपीठ म्हणजे “गुगल माय बिझनेस”.

रिझर्व्ह बँकेचा कर्जदारांना ३ महिन्यांचा दिलासा : जाणून घ्या वस्तुस्थिती

Reading Time: 2 minutesरिझर्व्ह बँकेने आज कर्जदारांसाठी मोठी घोषणा केली आहे.  कोरोना व्हायरस बाबत ‘आरबीआय’ने कर्जदारांसाठी नेमकी काय घोषणा केली आहे ? यासाठीचा कालावधी कोणता आहे ? कर्ज माफी आणि अतिरिक्त कालावधी यात काय फरक आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

कमी क्रेडिट स्कोअर असताना वैयक्तिक कर्ज कसे मिळवाल?

Reading Time: 3 minutesक्रेडिट स्कोअर हा तीन अंकी क्रमांक आहे, जो कर्ज मंजूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. ही तीन अंकी संख्या ३०० ते ९०० दरम्यान असते. सामान्यपणे ७५० किंवा त्यापेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असेल तर तो चांगला मानला जातो, अथवा पेक्षा कमी असणारा अंकाला खराब क्रेडिट स्कोअर असं म्हटलं जातं.  क्रेडिट स्कोअर कमी असल्यास कर्ज मंजूर होण्यात अडथळे येतात किंवा मंजूर होत नाही.