गृह विम्याच्या या पाच गोष्टी माहीती असायलाच हव्यात

Reading Time: 3 minutes नैसर्गिक आपत्ती कधीच कोणाला सांगून येत नाहीत. भूकंप,महापूर, वादळे, आग लागणे अशा नैसर्गिक आपत्तींच्या काळात स्वतःचा जीव सहीसलामत वाचणे हे महत्वाचे आहेच. सध्या महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यात महापूराने थैमान घातले आहे. धुवांधार पाऊस आणि नद्यांची वाढलेली पाणी पातळी यामुळे गावाच्या गाव महापूराच्या पाण्यात बुडाली आहेत. यामध्ये सर्वात जास्त आणि मोठे नुकसान झाले आहे ते राहत्या घरांचे. घरांची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. ही घरे पुन्हा नव्याने उभी करणे हे तर आव्हान आहेच पण अशा काळात घराचा उतरवणे ही सुद्धा काळाची गरज बनली आहे. 

टॉप-अप कर्ज का घ्यावे?

Reading Time: 3 minutes बँकेचे जे ग्राहक नियमित आणि पद्धतशीर कर्जाची परतफेड करतात, ज्यांचा सर्व आर्थिक व्यवहारांचा इतिहास स्पष्ट आहे, त्यांच्यासाठी खास फायदा म्हणून हे कर्ज घेण्याची मुभा त्यांना देण्यात येते. आणि विशेष बाब म्हणजे तुम्ही कर्ज दीर्घ कालावधीसाठी घेऊ शकता शिवाय तुम्ही कशासाठी हे कर्ज घेत आहात हेही बँकेला सांगयची गरज नाही. 

पूरग्रस्तांना मदतीचा हात द्यायचा आहे? मग हे वाचा

Reading Time: 4 minutes निसर्गाचा कोप म्हणजे काय याचा प्रत्यय सध्या महाराष्ट्रासाहित अन्य राज्येही घेत आहेत. खरंतर निसर्गाचं रौद्र रूप बघण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. पण प्रत्येकवेळी आपला भारत देश येणाऱ्या संकटाला धीराने तोंड देत आला आहे. अशा प्रसंगातच ‘माणुसकी’ नावाच्या धर्माचे प्रकर्षाने दर्शन होते. मदत करणे आवश्यकच आहे. फक्त मदत करताना खात्रीशीर संस्थेच्या अथवा व्यक्तीच्या हातातच मदत सोपवा कारण आपल्याकडे मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. 

रक्षाबंधन विशेष: “आर्थिक रक्षाबंधन” म्हणजे काय असते रे भाऊ ?

Reading Time: 3 minutes रक्षाबंधन म्हणजे बहीण – भावाच्या पवित्र नात्याचा सण. या दिवशी सर्वानाच आपल्या भावंडांसोबतची लहापणीची गट्टी- बट्टी, धमाल हमखास आठवत असेल. गेल्या काही वर्षात रक्षाबंधनला बहिणीला “सरप्राईज गिफ्ट” देण्याची एक नवीन पद्धत रूढ झाली आहे. बहिणीला काय भेट देऊ? हा अनेक भावांसमोरचा यक्षप्रश्न “आर्थिक रक्षाबंधन”ने चुटकीसरशी सोडवला आहे. 

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वाचावा रु. २,६७,२८० रुपये

Reading Time: 2 minutes घर! सर्वसामान्य माणसाचं आयुष्यातलं एक महत्वाचं स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणूस जीवापाड प्रयत्न करत असतो. पण घरांच्या गगनाला भिडलेल्या किंमती, महागाई, आर्थिक मंदी अशा आवासून उभ्या राहिलेल्या समस्यांमुळे स्वतःच घर विकत घेण्याचं स्वप्न स्वप्नच राहील की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. स्वतःचं घर हे केवळ स्वप्न नाही, तर ती एक मूलभूत गरज आहे, हे ओळखून सरकारने मध्यमवर्गीयांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातभार लावणारी एक योजना सुरू केली. ती योजना म्हणजे ‘प्रधानमंत्री आवास योजना’.

पॅन कार्डच्या नियमांमधील ४ महत्वपूर्ण बदल

Reading Time: 2 minutes प्रत्येक भारतीय नागरिक, संस्था, कंपनी यांच्यासाठी पॅन कार्ड हे महत्वाचे कागदपत्र आहेच पण आयकर विभागासाठीही करदात्यांचे पॅन कार्ड खूप महत्वाचे कागदपत्र आहे. आजकाल जवळपास सर्वच व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक आहे. त्यामुळे आयकर विभागाला या व्यवहारांवर लक्ष ठेवणे व त्याद्वारे करदायित्व तपासणे सहज शक्य होऊ शकते. २०१९ च्या अर्थसंकल्पात पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. या बदलांना संसदेत मंजुरी मिळणे बाकी आहे परंतु ते विचाराधीन असल्याने लवकरच हे बदल लागू करण्यात येतील.  

आयटीआर: मुदतवाढ मिळाली आता तरी आळस झटकून ‘आयटीआर’ भरा 

Reading Time: 2 minutes सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी आयटीआर दाखल करण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख  होती. मात्र, काही करदात्यांना या मुदतीत आयटीआर फाइल करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे करदात्यांकडून मुदत वाढवण्याची मागणी सातत्याने होत होती. ही मागणी विचारात घेऊन आयटीआर दाखल करण्यासाठीची मुदत वाढविण्यात आली आहे.