घर पहावे बांधून, का भाड्याने घेऊन? – दुसरी बाजू

Reading Time: 3 minutes मागील भागात आपण पाहिलं प्रसिद्ध जुळे भाऊ सुरेश आणि रमेश यांचे रस्ते व विचार भाड्याच्या घरात राहायचं की स्वतःच्या; यावरून वेगळे झाले. सुरेशने भाड्याच्या घरात राहून वाचलेले पैसे दुसरीकडे गुंतवण्याचं ठरवलं, तो आपल्या मार्गाने गेला. तर रमेशची कथा मात्र वेगळी होती. रमेशने स्वतःचं घर विकत घेण्याची हिंमत करण्याचं ठरवलं. त्याने गृह कर्ज घेतलं.रमेशने सर्व अभ्यास करून घराचं मासिक भाडं आयुष्यभर देत राहिल्यावर जितका खर्च येईल साधारण तेवढाच किंवा  त्याहून कमी खर्च स्वतःचं घर विकत घेण्यात येईल. सुरवातीला जरी भाड्याच्या घराचं मासिक भाडं इएमआयहुन कमी वाटतं पण येत्या वर्षांत ते भाडं वाढेल. त्यामुळे त्याने गृहकर्जाचा किंवा घरामध्ये रक्कम गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता.

घर पहावे बांधून, का भाड्याने घेऊन? – पहिली बाजू

Reading Time: 3 minutes जर्मनी, इंग्लंड, अमेरिकेत भाड्याच्या घराचं भाडं हे गृहकर्जावरील व्याजापेक्षा जास्त असतं. त्यामुळे या देशांत भाडयाने राहणं परवडत नाही. परंतु भारतात अशी परिस्थिती नाही. भारतात भाड्याच्या घरात राहताना द्यावं लागणारं भाडं गृह कर्जावर भरावं लागणाऱ्या व्याजापेक्षा कमी आहे.

परदेशातील उत्पन्नावरील दुहेरी कर आकारणी कशी टाळाल?

Reading Time: 2 minutes एखाद्या देशातील रहिवासी व्यक्ती जर दुसऱ्या देशातून उत्पन्न मिळवत असेल तर त्या व्यक्तीला मिळणाऱ्या उत्पन्नावर दोन्ही देशातून कर आकारणी होऊ शकते. साहजिकच या दुहेरी कर आकारणीमुळे करदात्यावर अन्याय होऊन त्याचं नुकसान होतं. यालाच परकीय कर क्रेडिट (Foreign Tax Credit) असे म्हणतात. परकीय कर क्रेडिट हे जागतिक उत्पनाशी निगडित आहे.दोन्ही देशांच्या करप्रणालीनुसार दुहेरी कर भरायला लागून करदात्याचे नुकसान होऊ नये या कारणास्तव आयकर कायदा १९६१, कलम  ९० व कलम ९१ मध्ये परकीय कर क्रेडिटसाठी संदर्भात तरतूद करण्यात आली आहे.

आपल्या पीएफ अकाऊंट संबंधित तक्रार कशी दाखल कराल?

Reading Time: 3 minutes भविष्य निधी (पीएफ) किंवा कर्मचारी भविष्य निधि (ईपीएफ) ही सेवानिवृत्ती लाभ योजना आहे. ही गुंतवणूक योजना कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीसाठी बचत करण्यास प्रोत्साहित करते आणि या योजनेचा मूळ उद्देश सेवानिवृत्ती निधीची तरतूद हा आहे. ईपीएफ खात्याच्या दिशेने, कर्मचारी आणि नियोक्ता एकत्रितपणे १२% योगदान देतात. प्रत्येक कर्मचाऱ्यास सेवानिवृत्तीच्यावेळी ईपीएफ रक्कम व्याजासहित परत मिळते. ईपीएफ व्याजदर हा सतत बदलत असतो. सध्याचा व्याजदर ८.६५% आहे.

अक्षय्य तृतीया आणि सुवर्ण गुंतवणूक

Reading Time: 3 minutes सुवर्ण खरेदी आपल्या संस्कृतीचा / परंपरेचा भाग आहेच शिवाय सोने व सोन्याचे दागिने हा अनेकांच्या आवडीचा विषय आहे. हौशीला मोल नसते.परंतु जर आपली हौस आपल्या गुंतवणुकीचा उत्तम पर्याय बनू शकत असेल तर दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. यासाठी गरज आहे ती तुमचा दृष्टिकोन बदलण्याची.सोनं खरेदीसाठी पारंपरिक पर्यायांचा विचार करण्यापेक्षा आधुनिक पर्यायांचा विचार केल्यास, तुमची हौस आणि गुंतवणुकीचं कठीण गणित तुम्ही सहज सोडवू शकाल.

आधार कार्डवरील फोटो कसा अपडेट कराल?

Reading Time: 2 minutes आधार कार्ड साठी आधार केंद्रावर काढलेले फोटो विनोदाचा विषय बनले आहेत. लहान मूलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच फोटो काहीतरी विचित्र आल्याची चर्चा सुरु झाली. सगळ्यांना आपापल्या प्रतिमेची काळजी असतेच. तुमच्या फोटोवर जोक होऊ नयेत असे वाटत असेल तर हे वाचा.

अर्थसाक्षरचा महाराष्ट्र दिन!!

Reading Time: 2 minutes आज १ मे! आजचा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर आजचा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.  पुलंच्या विनोदी साहित्यापासून गदीमांच्या कवितांपर्यंत,रत्नाकर मतकरींच्या गुढकथा असोत वा बहिणाबाईंच्या कविता साहित्याने श्रीमंत असणारा महाराष्ट्र आजच्या आधुनिक डिजिटल युगातही तितक्याच ताकदीने उभा आहे.

आपल्या आधार कार्डचा गैरवापर कसा शोधाल?

Reading Time: 2 minutes आपलं आधार कार्ड भारतातील एक महत्वाचे ओळखपत्र आहे. १२ अंकी युनिक ओळख नंबर (Unique Identification Number) असलेल्या आपल्या आधार कार्डास आपला मोबाइल नंबर, पॅन आणि बँक खात्यास जोडणे अनिवार्य करण्याचा निर्णय आला आणि देशात ‘राईट टू प्राईवसी’चं वादळ उठलं. आपली सर्व माहिती धोक्यात आहे आणि त्याचा गैरवापर होऊ शकतो, या भावनेने काहीसं असुरक्षिततेचं  वातावरण निर्माण झालं. आता तुमच्या आधार कार्डचा कुठे गैरवापर होतोय का? हे तुम्ही तपासू शकता.

काटकसरीचे कानमंत्र भाग २

Reading Time: 3 minutes प्रत्येक श्रीमंत व्यक्तीचा काटकसरीच्या मार्गानेच धनोढ्य झाला आहे असे नाही. वेगवेगळ्या अनैतिक मार्गांनीदेखील संपत्ती मिळवता येते, पण ही श्रीमंती क्षणिक असते. ज्या गतीने पैसा येतो त्याच गतीने पैसा जातो देखील. सावकाश येंणारी श्रीमंती मात्र काटकसरीच्या सवयीने येते आणि दीर्घकाळ टिकते. जास्त पैसा असणे म्हणजे जास्त खर्च करणे या पेक्षा जास्त बचत करणे असे समीकरण असेल तर ती श्रीमंती टिकते. नाहीतर पत्त्याचा बंगला कोसळावा तशी सर्व संपती क्षणात नाहीशी होते. आपली श्रीमंती टिकवण्यासाठी श्रीमंत काही सवयी अंगी बाळगतात ज्यांना अंगीकार सगळ्यांनीच करायला काही हरकत नाही.