आधार कार्डवरील फोटो कसा अपडेट कराल?

Reading Time: 2 minutes

आधार कार्ड साठी आधार केंद्रावर काढलेले फोटो विनोदाचा विषय बनले आहेत. लहान मूलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच फोटो काहीतरी विचित्र आल्याची चर्चा सुरु झाली. सगळ्यांना आपापल्या प्रतिमेची काळजी असतेच. तुमच्या फोटोवर जोक होऊ नयेत असे वाटत असेल तर हे वाचा.

बरेच लोक आपल्या आधार वरील फोटोने असमाधानी आहेत. कधी त्यामुळे हशा पिकतो तर कधी एखादे महत्वाचे काम अडते. बऱ्याच लोकांना असा अनुभव आला की आधार वरील प्रतिमा अस्पष्ट किंवा धुरकट असल्याने आधार ओळख पुरावा म्हणून नाकारला गेला. त्याऐवजी दुसरा कुठलातरी ओळखपत्र वापरावे लागले. या प्रश्नावर तोडगा म्हणून काही दिवसांपूर्वी आपलं फोटोग्राफ बदलता येण्याची सुविधा युआयडीएआयने दिली आहे.

आधार कार्डवरील फोटो बदलू शकतो का?

या प्रश्नाचे उत्तर होय आहे. आपण पुढे जाऊ शकता आणि आपला फोटो फोटोवर बदलू शकता परंतु ऑनलाइन माध्यमाद्वारे फोटो बदलला जाऊ शकत नाही. आधार वरील फोटो केवळ प्रत्यक्ष नोंदणी केंद्राला भेट देऊनच बदलता येतो. गैरवापर टाळण्यासाठी ही तरतूद केली आहे. तर

मार्ग १

१.  https://www.uidai.gov.in/ या यूआयडीएआयच्या वेबसाइटला भेट द्या.

२.  उजव्या कोपऱ्यात भाषा निवडीसाठीचा पर्याय उपलब्ध आहे. त्यानुसार आपली भाषा निवडा.  

३.  यामध्ये माझा आधार – डाऊनलोड्स – आधार अद्ययन / सुधारणा फॉर्म  वर क्लिक करून फॉर्म डाउनलोड करा.

४. आवश्यक तपशीलांस हा फॉर्म भरा. त्याच्या छापील प्रतीवरआपली आवश्यक ती माहिती भरा, त्यावर आपला फोटो चिकटवा.

५.  फोटोमधील बदलासाठी विनंती करणारा औपचारिक अर्ज प्रादेशिक यूआयडीएआय कार्यालयाच्या नावे लिहा.

६.  अर्ज आणि विचारलेली कागदपत्रे या अद्यतन फॉर्म सोबत जोडा.

७.  कागदपत्रे पुढील पत्त्यावर पाठवा

यूआयडीएआय प्रादेशिक कार्यालय

खनिजा भवन,

क्रमांक 4 9, तिसरा मजला,

दक्षिण विंग रेस कोर्स रोड,

बंगलोर – 560 001

८. विनंती केल्यानंतर १५ दिवसांच्या आत आपल्याला अद्यतनित (Updated) कार्ड पोस्टाने पाठवले    जाईल.

मार्ग २

नजीकच्या आधार नोंदणी केंद्राला भेट द्या आणि आपला आधार कार्ड वरील फोटो अपडेट करण्याची मागणी करा.

दोन्ही मार्गांनी आपल्याला आधार कार्ड २ आठवड्यांच्या  कालावधीत परत मिळेल. ही फोटो बदलण्याची आणि अपडेटेड आधार कार्ड तुमच्या पत्यावर परत पाठवण्याची प्रक्रिया मोफत नाही. यासाठी १५ रुपये शुल्क आकारले जाते.

आधार कार्डवर ५ वर्षाखालील मुलाचा फोटो देण्याची गरज नाही. मुल १५  किंवा १८ वर्षांचे झाल्यावर फोटो अद्यतनित केला जातो.

आधार अपडेट करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा-

 • सर्व अनिवार्य माहिती भरल्याची खात्री करा.
 • संपूर्ण तपशील इंग्रजीमध्ये आणि स्थानिक भाषेमध्ये अचूकपणे भरा.
 • अंक इंग्रजीमध्ये लिहावेत.
 • आपण ऑफलाइन फॉर्म भरत असल्यास, केवळ कॅपिटल अक्षरे वापरा. त्यामुळे गोंधळ आणि चुका कमी होतात.
 • नाव लिहिताना श्री, श्रीमती, माननीय, राव वगैरे वापर टाळावा.  
 • यूआरएन क्रमांकाची नोंद स्वतःकडे ठेवा. आपल्या विनंतीचा मागोवा (Track) घेण्यासाठी हे वापरू शकता.
 • पावतीची प्रत सुरक्षित ठेवा.
 • सहाय्यक कागदपत्रे देताना ती सूचीमध्ये नमूद केली आहेत का, याची खात्री करा.
 • केवळ आवश्यक कागदपत्रे प्रदान करा, अनावश्यक कागदपत्रे टाळा.
 • सुधारित आधार फक्त रेकॉर्डवरील पत्त्यावर पाठवले जाईल, त्या मुळे  तो पत्ता बरोबर असल्याची खात्री करा.
 • नवीन आधार योग्य आहे का, याची खात्री करणे गरजेचे आहे. जर कार्डधारक अज्ञान असेल तर पालक कागदपत्रे तपासू शकतात.

आपले आधार कार्ड सक्रिय आहे का?,   आपल्या आधार कार्डचा गैरवापर कसा शोधाल?,

आपलं आधार कार्ड सुरक्षित आहे का?,   आधार बरोबर पॅन लिंक करणे अनिवार्य !

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर |

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *