काटकसरीचे कानमंत्र भाग १
Reading Time: 2 minutesआपण देशतील, जगातील श्रीमंत लोकांकडे पाहतो आणि सहज विचार येतो की, हे श्रीमंत आहेत कारण यांचे पूर्वज श्रीमंत होते किंवा त्यांनी पुढच्या पिढ्या श्रीमंत व्हाव्यात याची सोय खूप पूर्वीच करून ठेवली होती. आपण श्रीमंत नाहीत कारण आपल्या आधीच्या पिढ्यांनी आपल्यासाठी फार कोट्यवधी रुपये कमवून ठेवले नाहीत. पण हे साफ चूक आहे. कित्येक श्रीमंतानी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. श्रीमंत होण्यासाठी पूर्वापार संपत्ती किंवा लॉटरीच तिकीट किंवा खजिना सापडावा लागत नाही. गरज आहे ती काही सवयी स्वतः मध्ये रुजवण्याची. मग दहा बाय दहा च्या खोलीत राहणारा आणि महिना १०,००० रुपये कमावणारा माणूस देखील बिलगेट्स, अंबानी, आदानी होऊ शकतो. जाणून घ्या श्रीमंत माणसांचे बचतीचे कानमंत्र.