गुंतवणुकीची उद्दिष्टे, उत्साह अन् उल्हास
Reading Time: 3 minutesप्रत्यक्षात बघायला गेलं तर गुंतवणूक करणं किंवा त्यातून श्रीमंत होणं ही एक संथ आणि त्यामुळे कंटाळवाणी प्रक्रिया आहे. आपण नियोजनाचा प्लान बनवताना, आपली आर्थिक उद्दिष्टे निश्चित करताना कदाचित कोणी स्वप्नं बघू शकेल, आपण काय काय साध्य करू शकतो? याच्या शक्यता कोणाला रोमांचकारी वाटू शकतात. पण श्रीमंत होण्याच्या कल्पना आणि त्यासाठीची प्रक्रिया यात एक मोठा फरक असतो. तो प्लान प्रत्यक्षात उतरवण्याची प्रक्रिया संथ व संयत असते.