Reading Time: 3 minutes

रमेशच्या बाबांची अचानक प्रकृती बिघडली, त्यांना जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये तात्काळ भरती करण्यात आलं.  तीन दिवस बँकेला सुट्टी होती. शिवाय रमेशकडे इतकी कॅश बँकेतही नव्हती. हॉस्पिटलचा खर्च, चाचण्या, खोलीचं भाडं, औषधीचा खर्च वाढत होता. त्यामुळे त्याला पैश्यांसाठी नातेवाईकांना, मित्रांना विचारावं लागलं. यात वेळ खूप खर्च झाला आणि आणि मनस्तापही झाला.

त्याच हॉस्पिटलमध्ये अमित नावाचा व्यक्तीच्या आईवरही शेजारच्या खोलीत उपचार सुरू होते. अमित मात्र कायम शांत आणि पूर्णपणे स्वतःच्या नियंत्रणात होता. त्याची पैश्यांसाठी धावपळ होताना दिसली नाही. महेशला वाटलं अमित श्रीमंत असावा. या सार्वजनिक सुट्टीच्या काळातही त्याच्याकडे कॅश आहे.

पण एकदा निवांत क्षणी गप्पा करताना अमितने महेशला सांगितलं की तो एक मध्यमवर्गीय व्यक्ती आहे. साधी नोकरी करतो. महेशला ते ऐकून आश्चर्य वाटलं. अमितने त्याला त्याच्या अकस्मिक वैद्यकीय खर्चाच्या आखणीबद्दल सांगितलं. अमितने कॅशलेस मेडिकल पॉलिसीचा प्लॅन घेतला होता.

  • बरेचदा अकस्मिक वैद्यकीय वैद्यकीय इमर्जन्सीमध्ये पैश्यांची गरज पडते. अनोळखी शहरात ओळखीचे लोक नसताना आर्थिकदृष्ट्या अडचणी येऊ शकतात. अशावेळी आरोग्य विमा खरेदी करताना कॅशलेस आरोग्य विमाचा पर्याय निवडावा. यांमध्ये आपल्याला वैद्यकीय उपचारांचे पैसे भरावे लागत नाहीत. आपल्यातर्फे आपली आरोग्य वीमा कंपनी हॉस्पिटलच्या बिलाचे पैसे देते.  आपण फक्त योग्य ती कागदपत्रेसादर करणे आवश्यक आहे.
  • भारतात प्रमुख कॅशलेस आरोग्य पॉलिसीचे काही प्रकार आहेत.
    • कॅशलेस फॅमिली हेल्थ प्लॅन:- यामध्ये कुटुंबातील एक व्यक्ती आरोग्य वीमा विकत घेते आणि  इतर सदस्य या आरोग्य विम्यात येऊ शकतात. संपूर्ण कुटुंबातील सदस्यांसाठीही कॅशलेस फॅमिली हेल्थ प्लॅन घेता येतं.
    • वृद्ध व्यक्तींसाठी कॅशलेस फॅमिली प्लॅन:-  यामध्ये कुटुंबातील जेष्ठ नागरिकांना अँम्ब्युलंस चार्जेस, चाचण्यांचा खर्च, हॉस्पिटलमध्ये भरती राहण्याचा खर्च असे खर्च समाविष्ठ होतात. अशा प्लॅनमध्ये अनेक नियम व अटी असू शकतात. तसेच संबंधित व्याधींची माहिती वीमा कंपनीला देणे आवश्यक आहे.
    • कॉर्पोरेट कॅशलेस पॉलिसी:- कॉर्पोरेट आरोग्य वीमा प्लॅन हा एम्प्लॉयरकडून त्याच्या एम्प्लॉईसाठी खरेदी केला जातो. एम्प्लॉयर मार्फत एम्प्लॉयीला मिळणाऱ्या सुविधांपैकी ही एक सुविधा असते. यामध्ये आरोग्य विम्याचे हप्ते कंपनी भरत असते. तसेच एम्प्लॉयीच्या हॉस्पिटलायजेशनचा खर्च  व हॉस्पिटलमधून घरी आल्यावर पुढील काही दिवसांचा औषधपाण्याचा खर्चही यामध्ये सामाविष्ठ असतो.
      कॉर्पोरेट आरोग्य विम्यात स्त्री एम्प्लॉयीना मॅटरनिटी म्हणजे गरोदरपणातील फायदेही मिळतात. काही विमा कंपन्या पूर्वीपासून असलेल्या व्याधींवरही (pre -existing disease) जास्त प्रीमिअम भरून कॉर्पोरेट आरोग्य प्लॅनची सुविधा देतात. यांत कंपनीच्या एम्प्लॉयीजना हॉस्पिटलमध्ये कॅशलेस बिल सुविधा मिळते.

कॅशलेस हॉस्पिटल सुविधा कसं काम करते?

  • विमा कंपनींचे विविध शहरांतील अनेक हॉस्पिटल्सशी करार असतात. त्यापूर्वी त्यांनी त्या त्या हॉस्पिटल्सचं कामकाज, तेथील सुविधा तपासलेल्या असतात.
  • या हॉस्पिटल्सला नेटवर्क हॉस्पिटल्स म्हणतात. आपल्या वीमा कंपनीच्या हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यास हॉस्पिटलचा खर्च व्यक्तीला करावा लागत नाही. तर आरोग्य विमा कंपनीतर्फे तिसरी व्यक्ती ज्याला थर्ड पार्टी अडमिनिस्ट्रेटर म्हणतात ते आपला क्लेम नीट तपासून हॉस्पिटल्सला बिल भरतात.
  • बरेचदा व्यक्तीला माहीत असतं की आपल्याला लवकरच हॉस्पिटलमध्ये भरती व्हायचं आहे. अशावेळी ती आपल्याला हवं ते नेटवर्क हॉस्पिटल ठरवून, त्यात भरती होण्यापूर्वी आरोग्य विमा कंपनीचं पॉलिसी कार्ड घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊ शकते. विमा कंपनीला किंवा थर्ड पार्टी अडमीनला आगाऊ कळवता येतं.
  • कधीकधी व्यक्तीला  अचानक हॉस्पिटलमध्ये भरती करायची वेळ येते, अशावेळी कॅशलेस पॉलिसीचं महत्त्व कळतं. तत्कालीन परिस्थितीत आपलं पॉलिसी कार्ड हॉस्पिटलमध्ये दाखवून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागते. सहा तासात कॅशलेस प्रक्रिया सुरू होऊन व्यक्तीचा मनस्ताप टळतो.

कॅशलेस पॉलिसीमध्ये काय समाविष्ठ नाही:-

  • रुग्णवाहिकेचा खर्च, टॉयलेट, बाथरूममधील वस्तूंचा खर्च, साहाय्यकाचा खर्च, कागदपत्रांचा खर्च, इत्यादी  खर्च कॅशलेस पॉलिसीमध्ये येत नाही.

कॅशलेस क्लेम नाकारला जाण्यामागची कारणे:-

  • आरोग्य विमा घेताना अगोदरपासूनच असलेल्या व्याधींची पूर्ण माहिती न देणे किंवा ज्या कारणासाठी किंवा व्याधींसाठी हॉस्पिटलमध्ये भरती झाली आहे त्या व्याधींचा आरोग्य विम्यात अंतर्भाव नसणे.
  • थर्ड पार्टी ॲडमीनला उशिरा कळवणे.

अमितने महेशला कॅशलेस आरोग्य विम्याचं महत्व सांगितलं. कॅशलेस हॉस्पिटलायजेशन असताना व्यक्तीला स्वतःच्या खिशातून एक रुपयाही द्यावा लागत नाही. आपली ऊर्जा फक्त भरती असलेल्या आपल्या व्यक्तीवर,नातेवाईकवर नियंत्रित होते. मनस्ताप वाचतो. अवांतर काळजी करावी लागत नाही.

या बोलण्यातून महेशला कॅशलेस पॉलिसी कसं काम करते, त्याचे प्रकार कळले. अमित आपल्या आईला फळांचा ज्यूस द्यायला गेला आणि महेश प्रथम कॅशलेस आरोग्य विमा काढायला गेला.

आरोग्य विमा खरेदी करण्याची 8 महत्वाची कारणे,

आरोग्य विमा नूतनीकरण करताना तपासा या ९ गोष्टी,

योग्य आरोग्य विम्याची निवड

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
2 comments
  1. कँशलेस व मेडीक्लेम आरोग्य विमा मध्ये काय फरक आहे

  2. Good article. But there is no cashless health plan as such. Rather all health insurance policies have cashless benefit.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.