Capital Market Investment
Reading Time: 2 minutes

Capital Market Investment

भांडवली बाजारात गुंतवणुकीस (Capital Market Investment) सुरुवात करण्याची सर्वोत्कृष्ट वेळ कोणती, याविषयीच्या सल्ल्यांचा भडिमार इंटरनेटवर असतो. पहिल्यांदा गुंतवणूक करणारा असो किंवा पहिल्या पिढीतील उद्योजक असो, प्रत्येकासाठी भांडवली बाजार वेगळा असतो. दूरदृष्टीचे उद्योजक नावीन्यपूर्ण उत्पादने, सेवा, प्लॅटफॉर्म विकसित करू शकतात आणि गुंतवणूक संपत्ती निर्माण करण्यासाठी त्यांचा लाभ घेऊ शकतात.  

महत्वाचा लेख: शेअर बाजार- गुंतवणूक करताना या मूलभूत चुका टाळा 

Capital Market Investment: भांडवली बाजारात गुंतवणूक 

१.बाजाराभोवतीचा दृष्टीकोन लक्षात येणे: 

  • शेअर बाजारात निवडीसाठी अनेक साधने आहेत, मात्र त्याकडे जाणारा मार्ग कोणता हे समजत नाही. उद्योजकांचीही अशीच स्थिती आहे. कारण गरजा व उणीवा या दोन्ही मोठ्या व गतिमान आहेत. 
  • तथापि, भांडवल बाजारात प्रवेश करण्यापूर्वी – का व कसे, या दोन  मूलभूत प्रशांची उकल झाल्यास गुंतवणूकदार आणि उद्योजक, दोघांसाठी फायद्याचे ठरेल. 
  • पोर्टफोलिओचे वैविध्यीकरण असो, प्रगत चार्टिंग, म्युच्युअल फंड्स किंवा इतर पैलू असो मूलभूत संकल्पना शिकल्याने महत्त्वपूर्ण बदल दिसून येतो. 

२. डिजिटल ट्रेडींग प्लॅटफॉर्म

  • बऱ्याच सेवा प्रदात्यांना संभाव्य गुंतवणूकदारांचे भवितव्य समजते, तसेच धोकेही लक्षात येतात. यामुळेच आभासी ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचा प्रसार झाला. 
  • यात पेपर ट्रेडिंग किंवा व्हर्चुअल ट्रेडिंग होते. यामुळे संभाव्य गुंतवणूकदारांना मार्केटमध्ये खरे पैसे न गुंतवता फंडामेंटल माहिती मिळते. 
  • गुंतवणूकदारांना लाइव्ह मार्केटमधील रिअल-टाइम हालचालीही दिसू शकतात. तर दुसरीकडे उद्योजकांना त्यांच्या सेवेत अशा सेवा समाविष्ट करता येतील, जेणेकरून त्यांना UX अधिक अबाधित राहिल.

विशेष लेख: दिवस सारखे नसतात, हे सांगणारा भांडवली बाजाराचा आशावाद !

३. गुंतवणूक करणारे तरुण आणि कुटुंबासाठीची गुंतवणूक: 

  • मागील पिढ्यांपेक्षा आजचे तरुण त्यांचे भवितव्य सुरक्षित करण्याबाबत अधिक सतर्क आहेत. 
  • मोबाइल ॲपचा  प्रसार, सध्याचे डिजिटायझेशन आणि उच्च उत्पन्न या सर्वांमुळे हे परिवर्तन घडले आहे. 
  • वेगवान जगात बदलत्या तंत्रज्ञानामुळे जीवन आणि सर्व प्रक्रिया बदलत असताना त्यांना जाणीव आहे की, तरुणपणातच गुंतवणूक केल्यास भविष्यातील संकटात आपला बचाव होईल. 
  • याचबरोबर एखाद्या नव्या गुंतवणूकदाराने तरुणपणीच गुंतवणूक केल्यास त्याला किंवा तिला प्रयोगशीलतेसाठी अधिक वाव मिळू शकतो. 
  • चाळीशी किंवा पन्नाशीत असलेल्या लोकांपेक्षा त्यांना जास्त जोखीम पत्करता येऊ शकते. जेणेकरून निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी ते अधिक सुरक्षित बेट लावू शकतात.
  • जास्त जोखीम घेतल्यास जास्त बक्षीस मिळते. तरुण वयात जबाबदाऱ्या कमी असल्याने आजचा तरुण ही जोखीम उचलतोय. गुंतवणुकीस नव्याने सुरुवात करताना विविध स्टॉक्सचा पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेत आहे, अर्थात सुरुवातीला जोखीम कमी घ्यावी, हेच योग्य आहे. 
  • पालकांनीही आपल्या मुलांमध्ये अधिक चांगले गुण विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करावे. यासाठी मुलांना साप्ताहिक/ मासिक भत्ते किंवा स्टॉक्स द्यावेत.

४. लवकर गुंतवणूक करण्याचे फायदे: 

  • काहीजण गुंतवणुकीच्या सुरक्षित पर्यायाचा विचार करून त्यात आपले पैसे सुरक्षित ठेवतात. 
  • यात फिक्स डिपॉझिट, प्रत्यक्ष सोने, रिअल इस्टेट किंवा इतर गोष्टींत पैसे गुंतवतात. 
  • ते नेहमीच बाजारात प्रवेश करण्याच्या संधीच्या प्रतीक्षेत असतात. कारण भरपूर भांडवल असल्यास आपल्याला अधिक चांगले बेटिंग करता येईल, असे त्यांना वाटत असते. त्यांचा हेतू योग्य असला तरी बाजाराचे वास्तव पाहता हे करणं योग्य नाही.

 हे नक्की वाचा: परदेशातील शेअर बाजारात गुंतवणूक कशी कराल?

नियमितपणे वाढीव गुंतवणूक करणे चांगले. कारण प्रत्येक गुंतवणूकीतून शेअरचे मूल्य दीर्घकालीन स्वरुपात तीव्रतेने वाढण्याची संधी असते. तसेच बाजार नेहमीच गुंतवणूकदारांच्या बाजूने असतो. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक करणे हितावह व लाभदायक ठरणारे असते. त्यामुळे जागतिक निर्देशांकात गुंतवणूक करणे म्हणजे विस्तृत टाइमलाइनवर गुंतवणूक केल्यासारखे असते. ती एक दशक किंवा अधिक काळासाठी असते. एखाद्याचा विविधतेचा पोर्टफोलिओ आणि वेळेवर गुंतवणूकीद्वारे गुंतवणूकदाराला चांगली खरेदी करता येते.

त्यामुळे यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी अडचणींवर मात करून लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करून आपला उत्तम पोर्टफोलिओ तयार करा, त्याचबरोबर दरवर्षी बाजाराचा अभ्यास करणेही आवश्यक आहे.

श्री प्रभाकर तिवारी

मुख्य विकास अधिकारी,

एंजल ब्रोकिंग लिमिटेड

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…