Economic Package: “आत्मनिर्भर भारत अभियान” महत्वाच्या घोषणा !

Reading Time: 2 minutesकरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची  (Economic Package) माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत दिली. विकासाला चालना देण्याबरोबरच “आत्मनिर्भर भारता अभियानासाठी” हे पॅकेज तयार करण्यात आले आहे, असे सीतारामन यांनी सांगितले. 

‘वापरा’वरील खर्च विरुद्ध ‘गुंतवणुकी’वरील खर्च

Reading Time: 2 minutes‘वापरा’वरील खर्च (Spending on consumption) आणि ‘गुंतवणुकी’वरील खर्च (spending on investment) यांच्यातील फरक समजून घेताना या दोन संज्ञा नक्की काय आहेत ते समजून घेणे गरजेचे आहे. 

Rakesh Jhunjhunwala: राकेश झुनझुनवाला – भारतीय शेअर बाजारातील बादशाह

Reading Time: 3 minutesघरात मित्रांबरोबर शेअर्स, स्टॉक मार्केट बद्दलच्या गप्पा लहान मुलाच्या कानावर पडतात आणि तो मुलगा आपल्या वडिलांना विचारतो की शेअर्सच्या किमती का बदलतात, त्याच्यावर त्याचे वडील त्याला उत्तर द्यायचे न टाळता सांगतात की, “जा, वर्तमानपत्रामध्ये ग्वालियर-रेयॉन बद्दल काही बातमी आली आहे का बघ आणि असेल तर त्याच्या शेअर्सची किंमत नक्कीच बदलणार!” या एका वाक्यावरून त्या मुलामध्ये शेअर मार्केटबद्दल उत्सुकता निर्माण होते आणि एक दिवस तो याच शेअर मार्केटचा राजा बनतो.अगदी फिल्मी वाटणारी ही खरी गोष्ट आहे, एका सर्वसामान्य भारतीय कुटुंबातील राकेश झुनझुनवाला यांची.

जन धन, आधार कार्डची अपरिहार्यता ‘कोरोना’ संकटात सिद्ध

Reading Time: 4 minutesकोरोना साथीमुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या स्थितीत आरोग्य सेतू ॲपसबंधी अनावश्यक वाद उभा राहिला आहे. आधार कार्ड, जनधन बँक खाती अशा व्यापक हिताच्या योजनांमध्येही असेच वाद देशाने पाहिले आहेत. कोट्यवधी गरीबांपर्यंत सुसंघटीतपणे पोचणे, अशाच यंत्रणांमुळे आज शक्य झाले आहे. एवढ्या मोठ्या देशाचे आणि लोकसंख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी असे प्रयत्न यापुढेही करावेच लागणार आहेत. यापुढेही अशा तथाकथित वैयक्तिक स्वातंत्र्याला मागील बाकांवर बसविल्याशिवाय बहुजनांचे हित साधले जाऊ शकणार नाही. 

संकटकाळातील आर्थिक नियोजन

Reading Time: 3 minutesवर्षांची सुरुवातच, बहुतेक सर्वच क्षेत्रात कमी झालेल्या मागणीने झाली. यानंतर जे आरोग्य संकट आले त्याचे रूपांतर आर्थिक संकटात कधी झाले ते समजलेच नाही. या संकटकाळातील आर्थिक नियोजन करताना अनेक गोष्टींचा पुनर्विचार आवश्यक आहे. यापुढे नव्याने आर्थिक नियोजन अधिक काळजीपूर्वक करायला हवे, त्याची पूर्वतयारी लगेचच करायला हवी. यात काही चुकी झाल्यास त्याचा आणखी मोठा फटका आपल्याला बसू शकतो.

कर्जमाफी आणि कर्ज निर्लेखन म्हणजे काय?

Reading Time: 4 minutesसन २०१४ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत सरकारने  ६.६६ लाख कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. त्यातील ६८६०७ कोटी रुपयांची कर्जे विजय मल्या, निरव मोदी, मेहुल चोक्सी या सारख्या ५० प्रमुख थकाबाकीदारांची आहेत, अशा आशयाच्या बातम्या समाज माध्यमातून प्रसारित होत असून त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया वाचायला मिळतात. याबाबत वस्तुस्थिती काय ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न. 

रिलायन्स जिओ -फेसबुक मधील डिलचे परिणाम

Reading Time: 3 minutesकोविड १९ या महासंकटामुळे अनेक नियोजित साखरपुडे, विवाह पुढे ढकलले गेल्याचा घटना आपल्या परिचयाच्या असतील. जगावर आलेल्या या संकटकाळात एक नियोजित शाही साखरपुडा मात्र थाटामाटात पार पडला आहे, तो म्हणजे रिलायन्स जिओ -फेसबुक मधील डिल ! अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी थेट परदेशी गुंतवणूक आहे.  जिओ प्लेटफॉर्म्स ही रिलायन्स इंडस्ट्रीज ली ची उपकंपनी असून याचे जवळपास १०% शेअर्स खरेदीसाठी फेसबुक इंडस्ट्रीज ४३५७४ कोटी रुपये मोजणार आहे. 

आली सर्वांनी तुलनात्मक ‘गरीब’ होण्याची वेळ !

Reading Time: 5 minutesकोरोना साथीच्या संकटातून बाहेर पडल्यावर एक समस्या आवासून उभी असेल ती म्हणजे वाढती बेरोजगारी ! या समस्येला कसे सामोरे जायचे, याचे मंथन समाजात सुरु आहे. सर्वांनी तुलनात्मक ‘गरीब’ होण्याचा हा अभूतपूर्व मार्ग या संकटातून बाहेर पडण्याचा खात्रीचा मार्ग ठरू शकतो. यमाजी मालकर यांनी लिहिलेला हा  माहितीपूर्ण लेख आम्ही लिखित आणि दृकश्राव्य म्हणजेच व्हिडीओ स्वरूपात प्रसिद्ध करत आहोत.

Health Insurance Renewal: आरोग्य विमा नूतनीकरण करताना तपासा या ९ गोष्टी

Reading Time: 3 minutesआरोग्य विमा हा स्वतःसाठी व  कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा असतो. यामुळे आरोग्य खर्चामुळे होणारे वित्तीय त्रास कमी होण्यास मदत होते. आरोग्य विमा मात्र हा काही विशिष्ट काळासाठीच असतो. कालावधी संपल्यावर त्याचं नूतनीकरण करणं आवश्यक असतं. स्वास्थ्य विम्याचे नूतनीकरण करणे अगदी सोपं आहे. परंतु, नूतनीकरण करताना काही गोष्टींची खात्री करून घेणे आवश्यक असते.

कुठल्या मालमत्ता मृत्युपत्रात समाविष्ट करू नयेत?

Reading Time: 2 minutesमृत्यूपत्र म्हणजे मृत्यूपश्चात आपल्या मालमत्तेची विभागणी करण्यासंबंधीचा दस्तावेज. मृत्यूपत्र तयार करण हे सक्तीच नसल तरी गरजेच मात्र आहे. मृत्यूपत्र करताना कायदेशीर बाबींच्या पूर्ततेपेक्षाही कठीण काम असत ते मालमत्तेच वर्गीकरण आणि विभाजन. सगळ्या मालमत्ता मृत्यूपत्रामध्ये नमूद करता येत नाहीत. जरी सर्व मालमत्ता तुमच्या स्वतःच्या मालकीच्या असल्या तरी काही मालमत्ता या संबंधीत कायद्यांनुसारच हस्तांतरित केल्या जातात किंवा त्या मालमत्तांसाठी मालकी हक्क निर्माण होतानाच लाभार्थीच (beneficiary) नाव नमूद कराव लागत. त्यामुळे या मालमत्तांची तरतूद मृत्यूपत्रात केल्यास  एका मालमत्तेसाठी एकापेक्षा जास्त लाभार्थींची (multipal  beneficiary) तरतूद केली जाऊ शकते व त्यामुळे मालमत्ता हस्तांतरित करण्यावरून विनाकारण निर्माण होणाऱ्या गोंधळाचाही सामना करावा लागतो.