Budget 2020 : देशाचा आर्थिक सर्व्हे म्हणजे काय?

Reading Time: < 1 minute आर्थिक सर्व्हेक्षण हा अर्थ मंत्रालयाचा महत्वाचा अहवाल आहे व अर्थव्यवस्थेचा अधिकृत अहवाल समजला जातो. अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा सर्व्हे दोन्ही सभागृहात सादर केला जातो.

Budget 2020: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या १० खास गोष्टी

Reading Time: < 1 minute स्वातंत्र्यापूर्वी भारताचे बजेट ब्रिटीश राजघराण्यापुढे सादर केले जात असे. स्वातंत्र्यानंतर पहिला अंतरिम अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी पहिले अर्थमंत्री आर. के. षण्मुखम चेट्टी यांनी, तर प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प जॉन मथाई यांनी सादर केला होता.

स्वेच्छानिवृत्ती, दूरसंचार क्रांतीच्या शिलेदारांची

Reading Time: 3 minutes दूरसंचार क्षेत्रातल्या क्रांतीमध्ये सर्व कर्मचारी वर्गाचे योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे. २५-३० वर्ष सेवा  करून आता ज्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली आहे, त्यांच्यासाठी सेवाकाळ नक्कीच अभिमानास्पद राहिला. जर आपण आपल्या सेवाकाळाचा आढावा घेतला, तर लक्षात येईल की, गेल्या २५-३० वर्षात दूरसंचार क्षेत्राने किती प्रगती केली आणि त्या प्रगतीतील वेळोवेळी आपण केलेले योगदान आपल्याला निश्चितच खूप समाधान देऊन जाईल. 

मुबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये झालेल्या पडझडीला जबाबदार कोण?

Reading Time: 3 minutes मुंबई! भारताची आर्थिक राजधानी आणि अनेकांची स्वप्ननगरी. या स्वप्ननगरीमध्ये स्वतःचं घर असणं हीच मुळी अभिमानाची बाब आहे. त्याला कारणही तसंच आहे. ते म्हणजे मुंबईमधल्या घरांचे अवाजवी आणि न परवडणारे दर. मुंबईतील घरांच्या वाढलेल्या अवाजवी किंमतीला तशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. पण गृहउद्योगकर्ते आणि रिअल इस्टेट विकसक मात्र एक गोष्ट जाणीवपूर्वक विसरत आहेत की त्यांना या गोष्टीला स्वीकारायचंच नाहीये, हा एक चर्चेचा विषय आहे.

गुंतवणुकीसाठी सल्लागार कशाला?

Reading Time: 4 minutes बऱ्याच लोकांना ‘गुंतवणूक सल्लागार’ म्हणजे नक्की काय या विषयी मोठे गैरसमज असतात. त्यांना वाटतं की हे लोक फक्त पैशांची गुंतवणूक करून देतात किंवा फक्त श्रीमंत लोकांनाच त्यांची गरज असते. प्रत्यक्षात एक गुंतवणूक सल्लागार त्याच्या क्लाएन्टना अनेक प्रकारे मदत करत असतो आणि श्रीमंत लोकांपेक्षा त्यांची जास्त गरज मध्यमवर्गीयांना असते. कारण जेवढी आपली संसाधनं मर्यादित तेवढे त्यांचे नियोजन जास्त महत्त्वाचे.

तुमची आर्थिक उद्दिष्टे कशी ठरवाल?

Reading Time: 4 minutes आपल्या भविष्यासाठी, आपली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आर्थिक नियोजन करणं आवश्यक आहे, याबद्दल कोणाचंच दुमत नसेल.  पण आर्थिक नियोजन कसं करायचं? ते करण्याची सुयोग्य पद्धत कोणती? असे अनेक प्रश्न बहुतांश लोकांच्या मनात असतील. या लेखात आपण शास्त्रीय पद्धतीने करण्यात येणाऱ्या आर्थिक नियोजनाची माहिती घेऊ. आर्थिक नियोजनाची सर्वात महत्वाची पायरी म्हणजे ध्येयनिश्चिती किंवा आर्थिक उद्दिष्ट्ये निश्चित करणे. ध्येयनिश्चिती करण्याच्या पाच महत्वाच्या पायऱ्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत. प्रत्येक पायरीवर जरा थांबून विचार करून, मगच पुढच्या पायरीवर जायचे आहे.

ग्राहकोपयोगी मालाच्या किमतीचे गौडबंगाल

Reading Time: 3 minutes भारताचे दरडोई वार्षिक उत्पन्न १२६४०८ रुपये आहे. म्हणजे आपले सकल वार्षिक उत्पन्न १६६ लाख कोटी होते. यावरून भारताच्या अवाढव्य अर्थव्यस्थेची आणि प्रचंड खरेदीमुल्याची कल्पना येऊ शकते. परंतु, भारताच्या अर्थव्यवस्थेमधला महत्वाचा घटक म्हणजे ग्राहक, हाच मुळी अज्ञान आहे, निद्रिस्त आहे.

आर्थिक नियोजन आणि सल्लागाराची भूमिका  -भाग १

Reading Time: 3 minutes प्रत्येकाला Financial Plan हा शब्द मोहित करत असतो. हा Financial Plan म्हणजेच आर्थिक नियोजन पत्रक बनवून घेण्यासाठी भरमसाठ फी आकारणारे आणि देणारे सुद्धा आहेत. मग ज्यांनी बनवून घेतला ते त्याप्रमाणे अनुकरण करतात का? आजकाल आर्थिक नियोजन ऑनलाईन सुद्धा बनवून मिळते. मग सल्लागाराची गरज काय? तुमच्या आर्थिकच नव्हे तर वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक, सामाजिक जबाबदारींची माहिती असणारा कुणीतरी तटस्थ मित्र म्हणून आर्थिक सल्लागार त्याची भूमिका पार पाडत असतो.

Kakeibo: आर्थिक नियोजनासाठी पारंपरिक जपानी पद्धत ‘काकेइबो’!

Reading Time: 3 minutes हिशोब करण्यासाठी कोणत्याही खास तंत्राचा वापर केला जात नसे शिल्लक असलेल्या पैशात आलेले पैसे मिळवून ते वहीच्या डाव्या बाजूला तारखानुसार जमा दाखवले जात, तर त्यातून काय खर्च केला त्याचा तपशील उजवीकडे लिहून त्याची बेरीज केली जाई. जमा रकमेतून खर्च वजा करून शिल्लक पुढील तारखेस ओढून त्या दिवसाचा खर्च लिहिला जात असे. पैसे येण्याचे प्रमाण अगदी कमी प्रामुख्याने पगार अथवा वसूल उधारी असे, तर खर्च करताना अत्यावश्यक खर्च करायलाच पाहीजे ही भावना असून त्यानुसार नियोजन केले जात असे. 

घर: विकत घ्यावे की भाड्याने राहावे?

Reading Time: 3 minutes कुठल्याही मोठ्या निर्णयाबाबत होते तसे घर विकत घेणे किंवा भाड्याने घेणे या दोन्ही पर्यायांच्या बाजूने आणि विरुद्ध अनेक मुद्दे आहेत (त्यामुळेच तर सर्वसामान्यांचा गोंधळ उडतो). ‘आपले स्वतःचे घर’ ही कल्पनाच सुखद असते, स्वतःच्या घरामुळे कुटुंबाला स्थैर्य मिळते, त्याचबरोबर गृहकर्ज काढून घर विकत घेतल्यास कर वजावट मिळते, भविष्यात घराच्या किमती वाढतात त्यांचा फायदा होतो वगैरे मुद्दे घर विकत घेण्याच्या बाजूने आहेत.