तुमची आर्थिक उद्दिष्टे कशी ठरवाल?

Reading Time: 4 minutesआपल्या भविष्यासाठी, आपली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आर्थिक नियोजन करणं आवश्यक आहे, याबद्दल कोणाचंच दुमत नसेल.  पण आर्थिक नियोजन कसं करायचं? ते करण्याची सुयोग्य पद्धत कोणती? असे अनेक प्रश्न बहुतांश लोकांच्या मनात असतील. या लेखात आपण शास्त्रीय पद्धतीने करण्यात येणाऱ्या आर्थिक नियोजनाची माहिती घेऊ. आर्थिक नियोजनाची सर्वात महत्वाची पायरी म्हणजे ध्येयनिश्चिती किंवा आर्थिक उद्दिष्ट्ये निश्चित करणे. ध्येयनिश्चिती करण्याच्या पाच महत्वाच्या पायऱ्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत. प्रत्येक पायरीवर जरा थांबून विचार करून, मगच पुढच्या पायरीवर जायचे आहे.

ग्राहकोपयोगी मालाच्या किमतीचे गौडबंगाल

Reading Time: 3 minutesभारताचे दरडोई वार्षिक उत्पन्न १२६४०८ रुपये आहे. म्हणजे आपले सकल वार्षिक उत्पन्न १६६ लाख कोटी होते. यावरून भारताच्या अवाढव्य अर्थव्यस्थेची आणि प्रचंड खरेदीमुल्याची कल्पना येऊ शकते. परंतु, भारताच्या अर्थव्यवस्थेमधला महत्वाचा घटक म्हणजे ग्राहक, हाच मुळी अज्ञान आहे, निद्रिस्त आहे.

आर्थिक नियोजन आणि सल्लागाराची भूमिका  -भाग १

Reading Time: 3 minutesप्रत्येकाला Financial Plan हा शब्द मोहित करत असतो. हा Financial Plan म्हणजेच आर्थिक नियोजन पत्रक बनवून घेण्यासाठी भरमसाठ फी आकारणारे आणि देणारे सुद्धा आहेत. मग ज्यांनी बनवून घेतला ते त्याप्रमाणे अनुकरण करतात का? आजकाल आर्थिक नियोजन ऑनलाईन सुद्धा बनवून मिळते. मग सल्लागाराची गरज काय? तुमच्या आर्थिकच नव्हे तर वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक, सामाजिक जबाबदारींची माहिती असणारा कुणीतरी तटस्थ मित्र म्हणून आर्थिक सल्लागार त्याची भूमिका पार पाडत असतो.

Kakeibo: आर्थिक नियोजनासाठी पारंपरिक जपानी पद्धत ‘काकेइबो’!

Reading Time: 3 minutesहिशोब करण्यासाठी कोणत्याही खास तंत्राचा वापर केला जात नसे शिल्लक असलेल्या पैशात आलेले पैसे मिळवून ते वहीच्या डाव्या बाजूला तारखानुसार जमा दाखवले जात, तर त्यातून काय खर्च केला त्याचा तपशील उजवीकडे लिहून त्याची बेरीज केली जाई. जमा रकमेतून खर्च वजा करून शिल्लक पुढील तारखेस ओढून त्या दिवसाचा खर्च लिहिला जात असे. पैसे येण्याचे प्रमाण अगदी कमी प्रामुख्याने पगार अथवा वसूल उधारी असे, तर खर्च करताना अत्यावश्यक खर्च करायलाच पाहीजे ही भावना असून त्यानुसार नियोजन केले जात असे. 

घर: विकत घ्यावे की भाड्याने राहावे?

Reading Time: 3 minutesकुठल्याही मोठ्या निर्णयाबाबत होते तसे घर विकत घेणे किंवा भाड्याने घेणे या दोन्ही पर्यायांच्या बाजूने आणि विरुद्ध अनेक मुद्दे आहेत (त्यामुळेच तर सर्वसामान्यांचा गोंधळ उडतो). ‘आपले स्वतःचे घर’ ही कल्पनाच सुखद असते, स्वतःच्या घरामुळे कुटुंबाला स्थैर्य मिळते, त्याचबरोबर गृहकर्ज काढून घर विकत घेतल्यास कर वजावट मिळते, भविष्यात घराच्या किमती वाढतात त्यांचा फायदा होतो वगैरे मुद्दे घर विकत घेण्याच्या बाजूने आहेत. 

मोबाईल, आर्थिक नियोजन आणि कमी होणारी कार्यक्षमता

Reading Time: 2 minutesमोबाईल हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. अगदी बँकिंग पासून डेटिंग पर्यंत सर्व गोष्टी मोबाईलवर सहज शक्य होत आहेत. मोबाईलमुळे आयुष्य सुखकर झाले आहे. कुठलीच गोष्ट १००% चांगली किंवा वाईट नसते. त्याचप्रमाणे मोबाइलचेही अनेक तोटे आहेत.  मोबाईलमुळे शारीरिक त्याचबरोबर मानसिक आरोग्याच्या तक्रारीही वाढत चालल्या आहेत. तसेच, हा मोबाईल तुमच्या सामाजिक आयुष्यावर, तुमच्या कार्यक्षमतेवर, तसेच तुमच्या आर्थिक नियोजनावरही विपरीत परिणाम करतोय हे तुम्हाला माहिती आहे का? 

भारतात वापरले जाणारे डिजिटल वॉलेट्स – भाग २

Reading Time: 3 minutesडिजिटल वॉलेट्स, ई-वॉलेट्स आणि मोबाईल वॉलेट्स अशा काही सेवांमुळे कॅशलेस व्यवहार सुलभ झाले आहेत. गेल्या ४ वर्षात मोदी सरकारच्या ‘कॅशलेस इंडिया’ या उपक्रमामुळे याचा वापर अधिक वाढला आहे. आता आपण आपले पैसे डिजिटल वॉलेट्स मध्ये ठेवू शकता, म्हणजे बँकेचं खातं या वॉलेटशी जोडून ऑनलाइन किंवा ऑफलाइन सुद्धा आर्थिक व्यवहार करता येतात. मागील भागात आपण पाच महत्वाच्या डिजिटल वॉलेट्सची माहिती घेतली. या भागात अजून काही डिजिटल वॉलेट्सबद्दल माहिती घेऊया.

भारतात वापरली जाणारी डिजिटल वॉलेट्स – भाग १

Reading Time: 3 minutesडिजिटल वॉलेट्स, ई-वॉलेट्स आणि मोबाईल वॉलेट्स अशा काही सेवांमुळे कॅशलेस व्यवहार सुलभ झाले आहेत. गेल्या ४ वर्षात मोदी सरकारच्या ‘कॅशलेस इंडिया’ या उपक्रमामुळे याचा वापर अधिक वाढला आहे. आता आपण आपले पैसे डिजिटल वॉलेट्स मध्ये ठेवू शकता, म्हणजे बँकेचं खातं या वॉलेटशी जोडून ऑनलाइन किंवा ऑफलाइन सुद्धा आर्थिक व्यवहार करता येतात. 

आपले आवडते ई-वॉलेट कितपत सुरक्षित आहे?

Reading Time: 3 minutesऑनलाइन व्यवहार जास्तीत जास्त वाढला. याचे फायदे आहेतच पण काही तोटे ही दिसू लागले कारण ऑनलाइन व्यवहारात काही फसवणूकही दिसू लागली. म्हणून आपल्या वापरत असलेले ई-वॉलेट सुरक्षित आहे का? याची पडताळणी करणे आवश्यक आहे. 

ग्राहक पंचायत पेठ – सजग ग्राहक अभियान

Reading Time: 3 minutes‘मुंबई ग्राहक पंचायत’ ही ग्राहकांनी ग्राहकांसाठी स्थापन केलेली आशिया खंडातील सर्वात मोठी अशी स्वयंसेवी ग्राहक संस्था असून ‘ग्राहक हिताय ग्राहक सुखाय’ हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. सार्वजनिक न्यास म्हणून तिची नोंदणी झाली असून, ‘Consumer International’ (CI) या आंतरराष्ट्रीय ग्राहक संघटनेची ती सदस्य आहे. वितरण हा संस्थेचा पाया असून त्याद्वारे दैनंदिन वापराच्या ९० ते ९५ वस्तू आणि साठवणीच्या किंवा विशेष अशा ५ ते १० वस्तू अशा एकूण १०० हून अधिक वस्तू संस्थेच्या सभासदांना दरमहा ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर उपलब्ध करून दिल्या जातात.