फिटे अंधाराचे जाळे….गुंतवणूक विशेष

Reading Time: 3 minutes LPG म्हणजेच Liberalization, Privatization आणि Globalization. दुर्दैवाने या स्थित्यांतराकडे बघण्याचा दृष्टीकोन सामान्य बचतकर्त्याकडे नसतो. त्याचे कारण वर नमूद केले आहेच. परंतु त्याला छोटीशी का होईना गुंतवणूक सुरु करायची असते. ही सुरुवात मात्र इच्छा, आस की ध्येय हे ठरवता येत नाही. मग पदरी अंधारच पडतो. 

लक्ष्मी शुद्ध व्यवहार करणाऱ्यांचे घर शोधते आहे..!

Reading Time: 4 minutes तरुण, आधुनिक भारतीय समाजाला पोटापाण्याच्या प्रश्नांमधून बाहेर पडायचे आहे, कारण त्याच्या जगण्याविषयीच्या आशाआकांक्षा आता प्रचंड विस्तारल्या आहेत. त्याला आता समृद्ध आणि आनंदी आयुष्य जगायचे आहे. तसे ते जगण्यासाठी आर्थिक व्यवहारांचे शुद्धीकरण अपरिहार्य आहे. ती अपरिहार्यता लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने अधिकाकाधिक भारतीयांनी समजून घेतली पाहिजे.  

बँकेतील ठेवींना सुरक्षित पर्याय 

Reading Time: 4 minutes पीएमसी बँकेसारख्या मोठया सहकारी बँकेवर भारतीय रिजर्व बँकेने अचानकपणे निर्बंध आणल्याने आणि त्यानंतर उडालेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे, त्याचप्रमाणे यासंबंधी नियामकांनी महिनाभरात घेतलेल्या वादग्रस्त निर्णयाने देशातील सर्वच बँक ठेवीदार आज संभ्रमात आहेत. यातच देशातील मोठी खाजगी बँक एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना ‘डीआयजिसी’च्या नियमानुसार आपल्या बँकेतील ठेवी १ लाख रुपयांपर्यंत सुरक्षित असल्याचा शिक्का बचत खात्याच्या पासबुकावर मारून दिल्याचे चित्र समाज माध्यमात सर्वत्र प्रसारित झाल्याने, विविध बँकेत आपल्या ठेवी ठेवलेले ग्राहक, आता नक्की काय करावे? ज्यामुळे आपण निश्चित राहू शकू याचा शोध घेत आहेत. तेव्हा उपलब्ध पर्यायांचा शोध आणि बोध घेण्याचा हा छोटासा प्रयत्न.

मतदानासंदर्भात काही महत्वाची प्रश्न उत्तरे

Reading Time: 2 minutes टिम अर्थसाक्षर प्रगत, जागृत, सामर्थ्यशाली लोकशाहीचा पुरस्कार करते. सत्ताधारी पक्ष कायम बदलते असतात. बऱ्याचदा त्यांची विचारधारा पण कालानुरूप बदलते. अर्थसाक्षरता हा सरकार किंवा राजकीय पक्षांपेक्षा मोठा आणि खोल विषय आहे. तेव्हा आम्हाला सर्वच पक्ष आवडतात. कुठल्या पक्षाला मतदान करायचे आहे, का करायचे आहे ते तुम्ही ठरवा. कुणालाही मतदान करा पण या मतदानाच्या पवित्र कर्तव्यापासून पळून जाऊ नका.

कोण आहेत नोबेल मेमोरियल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी?

Reading Time: 2 minutes अभिजीत बॅनर्जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकांचं आयुष्य कसे सुधारता येईल, यावर खूप मेहनत घेतली आहे.  यामध्ये लोकांसाठी शासनाने आखलेल्या योजना व्यवस्थित चालू आहेत का, त्यांचे उद्दिष्ट सफल होतंय का?  यावर खोल अभ्यास करण्यात करण्यात आला. पण असे प्रयोग तर,  यापूर्वीही अनेक लोकांनी केले आहेत. मग अभिजित यांना नोबेल का मिळालं? यामध्ये  काय वेगळं आहे?

मतदान करण्याची ४ महत्वाची कारणे

Reading Time: 3 minutes प्रत्येक मत योग्य उमेदवार निवडण्यासाठी आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी असतेच. परंतु,एका दिवसाच्या मजेसाठी आपल्या हक्क आणि कर्तव्याला विसरु नका. मतदानाच्या दिवशी मत देऊन तुमच्या सुट्टीचा सदुपयोग करा. मत दिल्यानंरही उरलेल्या वेळेत तुम्ही सुट्टीचा आनंद घेऊ शकता. NOTA चा अधिकार आहे हे मान्य. पण उठसूट प्रत्येक निवडणुकीला प्रत्येकानेच मतदान करायचं नाही, असं ठरवलं तर लोकशाही चालणार तरी कशी? 

तुमचा क्रेडिट रिपोर्ट कितपत खरा आहे?

Reading Time: 4 minutes माहिती अधिकाराचा प्रसार प्रचार करणारे श्री गिरीश मित्तल यांनी अलीकडेच एका बँकेचे क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी अर्ज केला होता परंतू “TransUnion CIBIL ltd” या कंपनीने त्यांचे  मूल्यांकन ६६२ म्हणजेच विश्वासार्ह नाही, असा अहवाल दिल्याने, ते खराब असल्याचे कारण देऊन क्रेडिट कार्ड देण्यास नकार दिला. नियमितपणे २५ वर्षे काटेकोरपणे आर्थिक व्यवहार करणाऱ्या व्यक्तीस हा मोठा धक्का होता.

वाहनउद्योग, मंदी आणि दिवाळी

Reading Time: 2 minutes सध्या मंदीचे वारे वाहत आहेत. दिवाळीचे दिवे जणू प्रकाश विसरले आहेत. भारतामध्ये वाहन खरेदी उद्योग मंदीची परिस्थिती अनुभवत आहे. अन्य उद्योग देखील याला अपवाद नाहीत. खरेदी कमी झाल्याने वित्तसंस्था आणि बिगर बँकिंग वित्त कंपन्यांना तोटा सोसावा लागत आहे. 

Bank Rules: बँकेच्या या नियमांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Reading Time: 3 minutes अनेकदा बऱ्याच अधिकाऱ्यांना आपल्याच बँकेचे नियम नक्की काय आहेत ते माहीत नसते आणि आपल्या हेकेखोर स्वभावामुळे ‘मी म्हणतो तोच नियम’ यावर ते अडून बसतात आणि आपण म्हणतो तसेच झाले पाहिजे म्हणतात त्यामुळे ग्राहकाचे आणि ग्राहक नाराज झाल्याने, अप्रत्यक्षपणे बँकेचेही नुकसान होण्याची शक्यता असते.

आरोग्यविम्यामधील घोषणेचे महत्त्व

Reading Time: 2 minutes देशभरात वैद्यकीय खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे अनेकांना उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. तुमच्या किंवा कुटुंबियांच्या बाबतीत अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय समस्यांवर मात करण्यासाठी आरोग्य विमा उपयुक्त ठरतो. त्यासाठीच पुरेसे, विनाखंड आरोग्य विमा कवच मिळविण्यासाठी तुम्ही तुमच्या विमा कंपनीला आवश्यक ती माहिती देणे गरजेचे आहे.