पेन्शनचं टेन्शन!

Reading Time: 4 minutesगेल्या काही वर्षात भारताच्या सेवाक्षेत्रातील प्रगतीमुळे तिथले आर्थिक लाभ वाढले आणि सरकारी नोकरीचे महत्त्व काहीसे कमी झाले. मात्र रिटायरमेंट प्लानिंग म्हटलं की लोकांना अजूनही खात्रीशीर, वाढत जाणारं आणि गरजांना पुरून उरणारं ‘सरकारी पेन्शन’ हीच गोष्ट डोळ्यासमोर येते. बदलत्या काळामुळे अशा खात्रीशीर पेन्शनच्या स्वरूपात पडलेला बदल बहुतेकांच्या लक्षात येत नाही आणि मग ते एलआयसी (LIC) किंवा तत्सम कंपनीचा कुठलातरी ‘पेन्शन प्लान’ गळ्यात बांधून घेतात.

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १८

Reading Time: 2 minutesनमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, ‘सेबी’ची नवीन प्रॉडक्ट कॅटेगरी तिसरा भाग हायब्रीड फंड आणि स्पेशल फंड. ऑक्टोबर २०१७ पूर्वी म्युच्युअल फंडाच्या बऱ्याच कर्जरोखे संबंधित योजना असायच्या आणि त्यामुळे गुंतवणूकदार गोंधळून जायचे.  ऑक्टोबर २०१७ मध्ये ‘सेबी’ने नवीन नियमावली आणली त्याप्रमाणे प्रत्येक म्युच्युअल फंडाला प्रत्येक कॅटेगरी मध्ये एकच फंड चालवता येणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदाराला फंड निवड करणं सोपा होईल. हा फरक साधारण एप्रिल-मे २०१८ नंतर दिसून आला. 

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करताय? लक्षात ठेवा या ५ गोष्टी

Reading Time: 2 minutesस्टॉक मार्केट म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो भरघोस परतावा किंवा प्रचंड नुकसान. अनेकदा पूर्वग्रहदूषित नजरेने आपण स्टॉक किंवा शेअर्स खरेदीकडे बघत असतो. परंतु, तुमच्याकडे स्टॉक निवडण्याचे योग्य कौशल्य आणि सतत देखरेख करण्यासाठी वेळ असेल, तर तुम्ही स्टॉकमार्केट म्हणजे शेअर बाजारात गुंतवणुकीचा विचार करू शकता.  

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १७

Reading Time: 2 minutesनमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, सेबी ची नवीन प्रोडक्ट कॅटेगरी दुसरा भाग डेट फंड.  ऑक्टोबर २०१७ पूर्वी म्युच्युअल फंडाच्या बऱ्याच कर्जरोखे संबंधित योजना असायच्या आणि त्यामुळे गुंतवणूकदार गोंधळून जायचे. ऑक्टोबर २०१७ मध्ये सेबीने नवीन नियमावली आणली त्याप्रमाणे प्रत्येक म्युच्युअल फंडाला प्रत्येक कॅटेगरी मध्ये एकच फंड चालवता येणार आहे. 

‘क्रिसिल’ म्युच्युअल फंड पतमानांकनात ‘एलआयसी’ म्युच्युअल फंडाची’ बाजी

Reading Time: 2 minutesगुंतवणूकदारांनाही अशा कालावधी मध्ये योग्य योजनांची निवड करणे कठीण होऊन जाते. बाजारातील काही पतमानांकन संस्था आणि संशोधन संस्था निरनिराळे मापदंड वापरून योजनांची क्रमवारी नियमित जाहीर करीत असतात. क्रिसिल ह्या पतमानांकन करणाऱ्या संस्थेची डिसेंबर महिनाअखेरची क्रमवारी जाहीर झाली. समभाग संबंधित योजनांच्या क्रमवारीत एलआयसी म्युच्युअल फंड’च्या योजनांनी अतिशय सुरेख कामगिरी दाखविली. तब्बल ५ समभाग संबंधित योजनांनी CPR -१ हे उच्च रेटिंग प्राप्त केले. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात –  भाग १६

Reading Time: 2 minutesनमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, ‘सेबी’ची नवीन योजना श्रेणी- ‘इक्विटी’ (Equity)! ऑक्टोबर २०१७ पूर्वी म्युच्युअल फंडाच्या बऱ्याच समभाग संबंधित योजना असायच्या आणि त्यामुळे गुंतवणूकदार गोंधळून जायचे. ऑक्टोबर २०१७ मध्ये सेबीने नवीन नियमावली आणली त्याप्रमाणे प्रत्येक म्युच्युअल फंडाला प्रत्येक कॅटेगरीमध्ये एकाच फंड चालवता येणार आहे. त्यामुळे इन्वेस्टरला फंड सिलेक्ट करणं सोपा होईल.

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १५

Reading Time: 2 minutes‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “लिक्विड फंडाचे फायदे”. लिक्विड फंड हे  म्युच्युअल फंडच्या मनी मार्केट फंड कॅटेगरीमध्ये येतात. हे असे फंड असतात जिथे डेट फंड मॅनेजर अतिशय तरल किंवा अतिशय कमी मुदतीच्या कर्जरोखे किंवा त्या प्रकारच्या  पेपर्स मध्ये गुंतवणूक करतात. 

शेअर बाजार : किंमत-उत्पन्न प्रमाण (P/E Ratio) म्हणजे काय?

Reading Time: 3 minutesकोणत्याही प्रकारचा गुंतवणूकदार असो, कोणत्याही कंपनीच्या समभागामध्ये आपला पैसा गुंतवण्याआधी त्या कंपनीचा- त्याच्या मूल्याचा अभ्यास करणे गरजेचं असतं. याच अभ्यासाचा एक महत्वाचा निकष म्हणजे प्राईज-अर्निंग रेश्यो, ज्याला थोडक्यात “किंमत-उत्पन्न प्रमाण” म्हणतात. बेंजामिन ग्रॅहम यांच्या मते, हा किंमत-उत्पन्न प्रमाण म्हणजे एखादा समभाग निव्वळ गुंतवणूकीवर आधारित आहे की सट्टेबाजीच्या आधारावर व्यापार करीत आहे, हे निर्धारित करण्याचा अतिशय वेगवान आणि सोपा मार्ग आहे.

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात- भाग १४

Reading Time: 2 minutesनमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “म्युच्युअल फंडाच्या भांडवल वृद्धी (Growth option) व लाभांश (Dividend Option)” बद्दल.  म्युच्युअल फंडामध्ये प्रामुख्याने दोन पर्याय असतात, भांडवल वृद्धी (Growth Option ) आणि लाभांश ( Dividend Option ). 

म्युच्युअल फंड युनिट गुंतवणूक काढून घेताय? थांबा, आधी हे वाचा…

Reading Time: 3 minutesशेअरबाजार नवनवीन उच्चांकी विक्रम करीत असताना आपण गुंतवणूक केलेल्या म्युच्युअल फंड योजना अपेक्षित परतावा देत नाहीत, असं आढळून आल्याने आपण यातील गुंतवणूक काढून घ्यायचा विचार करताय का? असं असेल, तर तडकाफडकी असा काही निर्णय घेण्यापूर्वी थोडं थांबा. फक्त म्युच्युअल फंड युनिट नव्हे, तर अनेक गोष्टी अशा आहेत ज्यांचे मूल्य अनेक कारणांनी कमी अधिक झाले आहे. तेव्हा प्रथम खालील चार प्रश्नांची उत्तरे मिळावा आणि मगच यासंबंधी विचार करा.