म्युच्युअल फंड क्या है? -भाग ५

Reading Time: 3 minutes या लेखमालेच्या तिसऱ्या भागात योजनांचे माहितीपत्रक का वाचावे? याचा उहापोह केला होता. आज आपण म्युच्युअल फंडांचे प्रकार, योजनांचे वैविध्य याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न करू. गुंतवणूकीसाठी कायम खुला (Open Ended), मुदत बंद (Close Ended) आणि विशिष्ट कालावधीसाठी खुला होणारा (Interval) असे फंडांचे तीन मुख्य प्रकार असतात. तुम्हाला नावं वाचून फंडांच्या प्रकारांची कार्य करण्याची पद्धत लक्षात आली असेल.

सोने खरेदी करताय? थांबा, आधी हे वाचा

Reading Time: 3 minutes दसरा- दिवाळी म्हटली की आपल्या मराठी बांधवांची सोने खरेदीची धावपळ चालू होते. बरेच जण सोनाराकडे जाऊन सोन्याची नाणी किंवा सोन्याचे दागिने खरेदी करीत असतात. या सणासुदीला सोने खरेदीदार थोडे द्विधा मनस्थितीत दिसतायेत. कारण गेल्या ६-८ महिन्यात सोन्याचे भाव २०% पेक्षा जास्त दराने वाढले आहेत. नवीन सोने आता खरेदी करावे का की थोडे थांबून सोन्याचे भाव खाली येतात का पाहावे, असा विचार करताना सोने खरेदीचा निर्णय करणं अवघड जात आहे. 

गुंतवणुकीच्या खेळातले सात नियम

Reading Time: 3 minutes सध्या शेअर बाजारातील हवा नरमगरम आहे, आर्थिक मंदीची चर्चा सुरू आहे आणि इक्विटी म्युच्युअल फंडांतील गुंतवणूकदार कपाळाला हात लावून बसले आहेत. “दोन-तीन वर्षे चालू ठेवलेल्या सिपमध्ये (SIP) नुकसान कसे काय दिसतेय?” असा जाबदेखील अनेक जण विचारत आहेत. काहींना आपले नशीब खराब वाटतेय, तर काहींना आपण फसवले तर गेलो नाही ना, याची शंका येतेय. म्युच्युअल फंडांतील गुंतवणूकदारांचा हा सगळा सार्वजनिक गोंधळ उडालेला आहे तो या खेळाचे नियम त्यांनी समजून घेतले नाहीत म्हणून.

वॉरेन बफेट यांचे यशस्वी गुंतवणुकीचे सूत्र

Reading Time: 3 minutes शेअर्स किंवा स्टॉक मार्केट गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकानेच वॉरेन बफेट यांचं नाव ऐकलेलं असतं. आजच्या घडीला जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीत गणना होणाऱ्या वॉरेनना गुंतवणूकविश्वाने ‘ओरॅकल ऑफ ओमाहा‘ असं नामाभिधान प्रदान केलं आहे. एक गुंतवणूकदार म्हणून वॉरेननी मिळवलेलं यश अद्वितीय असेच आहे. वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात करणाऱ्या वॉरेननी नुकताच ३० ऑगस्ट २०१९ रोजी आपला ८९व्वा वाढदिवस साजरा केला. या त्यांच्या तब्बल ७८ वर्षांच्या प्रदीर्घ गुंतवणूक प्रवासात त्यांनी स्वानुभवातून मिळवलेले ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचा सतत प्रयत्न केला. अशा या जगद्विख्यात, सर्वाधिक यशस्वी गुंतवणूकदाराचे विचार या लेखात समजून घेऊ.

काय आहे बांधकाम व्यवसायाच्या आर्थिक पॅकेजची वस्तुस्थिती?

Reading Time: 6 minutes आपल्याला आत्तापर्यंत पूरग्रस्तांसाठी वाटलेली अन्नाची पॅकेज, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सहाव्या वेतन आयोगाची किंवा सातव्या वेतन आयोगाची पॅकेज माहिती आहेत. आपल्याला संचालक मंडळाला मिळणाऱ्या समभाग किंवा भागभांडवलाचं पॅकेज माहिती असतं. अगदी अमेरिकेनी इतर देशांना दिलेल्या मदतीचं पॅकेजही माहिती असतं. त्याशिवाय, आपल्याला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं पॅकेज माहिती असतं, कर्जबाजारी झालेल्या कृषी व्यवसायामुळे त्यांच्या आत्महत्येच्या बातम्या दररोज येत असतात. पण रिअल इस्टेटसाठी (म्हणजे बांधकाम व्यावसायिकांसाठी, किमान मला तरी असं वाटतं) पॅकेज हे आपण कधीच ऐकलं नव्हतं, नाही का?

म्युच्युअल फंड क्या है?- भाग ४

Reading Time: 3 minutes या लेखमालेचा हेतू सर्व वाचकांना म्युच्युअल फंड नक्की कसे काम करते? हा आहे. परंतु विषय तसा क्लिष्ट असल्यामुळे वाचकांना चांगला परतावा देणाऱ्या योजनांची नावे किंवा माझा फंड का चालत नाही? याबाबत जाणून घेण्यात उत्सुकता आहे असे आलेल्या प्रतिक्रियांवरून लक्षात येते.  मागील लेखात आपण नियंत्रकांची भूमिका, कायदे व गुंतवणूकदारांचे हक्क याबाबत सविस्तर माहिती घेतली होती. या भागात आपण म्युच्युअल फंडाचे वितरक, हिशेब, करदायित्व व मुल्यांकन याची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करू. 

भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय शेअर बाजार – इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज (India INX)

Reading Time: 2 minutes इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज हा मुंबई शेअरबाजारांने आपल्या उपकंपनीमार्फत स्थापन केलेला आणि भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय शेअरबाजार आहे. ९ जानेवारी २०१७ रोजी या बाजाराचे उद्घाटन आपल्या पंतप्रधानांनी केले आणि १६ जानेवारी २०१७ पासून नियमित सौदे होण्यास सुरुवात झाली. गांधीनगर अहमदाबाद येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या गुजरात इंटरनॅशनल फायनान्स अँड टेक सिटीमध्ये याचे मुख्यालय आहे. या आंतरराष्ट्रीय शेअरबाजारासंबंधित महत्वाच्या गोष्टी-

चलती का नाम … गुंतवणूक!

Reading Time: 4 minutes बाजारातील जोखीम आणि आपल्या आयुष्यातील इतर व्यवहारातील जोखीम यांच्यात अनेक साम्य आहे. आपले स्वतःचे वाहन जसं रस्त्यावर चालवायला बाहेर काढलं की त्यावर कधी ना कधी लहान सहान ओरखडे हे पडणारच असतात. त्यापायी आपले लक्ष विचलित होऊ देण्यापेक्षा ज्या गोष्टींवर आपला पूर्ण ताबा आहे त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणं, तिथं चूक होऊ नये यासाठी प्रयत्न करणं हे योग्य आहे. याच उदाहरणाचा आपण थोडा खोलात जाऊन विचार केला, तर असं लक्षात येईल की ड्रायव्हिंगचा अनुभव आपल्याला गुंतवणुकीविषयक योग्य दृष्टिकोन तयार करण्यास मदत करू शकतो. 

शेअर बाजारातील सध्याची उसळी टिकणार का?

Reading Time: 2 minutes शेअर बाजार – मंदीची  कक्षा भेदून बाजाराचीही  चांद्रयान मोहिम? या लेखानंतर ही उसळी टिकणार का? हा प्रश्न ‘ट्रेंडिंग’ होता. आता जर मला ह्या प्रश्नाचे नक्की उत्तर माहित असते, तर मी कीबोर्डवर बडवून बोटे झीजवण्यापेक्षा नोटा मोजून ती झीजवणे पसंत नसते का केले?? तरीपण आपल्याला लोक विचारतायत म्हटल्यावर उत्तर ठोकायलाच हवे, ही नशा पण काही कमी नाही.

शेअर बाजार – मंदीची कक्षा भेदून बाजाराचीही चांद्रयान मोहिम? 

Reading Time: 4 minutes दोन तीन दिवसांपूर्वीच काहीतरी होणार, करणार, देणार म्हणून गाजावाजा झालेल्या पत्रकार परिषदेत फक्त ई-सिगारेटवर बंदीसारखे छुटपूट निर्णय घेऊन डोंगर पोखरुन काढलेल्या उंदीराच्या पार्श्वभुमीवर अचानक घेतलेला करकपातीचा हा निर्णय! या अभूतपूर्व निर्णयाचे वर्णन प्रामुख्याने ‘मंदीवरील उतारा’ असे केले गेले. त्या अनुषंगाने मला जाणवलेल्या विविध पैलूंचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.