शेअर बाजार – मनी वसे ते सत्यात दिसे

Reading Time: 3 minutesजेव्हा भावाच्या दीर्घकालीन सरासरीपेक्षा अल्पकालीन सरासरी जास्त दिसू लागते. विश्लेषक याचा अर्थ बाजारांत तेजीचे वातावरण तयार होऊ लागले आहे असा घेतात. याउलट भावाची अल्पकालीन सरासरी खाली जाऊ लागल्यास तेजीवाल्यांकरिता ती मंदीची सुचना असते. (यामागचा तर्क समजणे विशेष अवघड नसावे). बाजाराच्या तांत्रिक परिभाषेत या संदर्भांत दोन लक्षवेधी संज्ञा आहेत, ‘गोल्डन क्रॉस’ (Golden Cross) आणि ‘डेथ क्रॉस’ (Death Cross).

सोन्यात गुंतवणूक – किती आणि कशी?

Reading Time: 3 minutesआपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओच्या परताव्यात सोने स्थैर्य देऊ शकते. तसेच कमालीच्या अस्थैर्याची परिस्थिती निर्माण झाली – युद्ध, आर्थिक मंदी, सरकारी दिवाळखोरी किंवा तत्सम – तर अशा काळात इतर कुठल्याही गुंतवणूक पर्यायापेक्षा सोन्यात जास्त परतावा मिळेल. त्यादृष्टीने आपल्या संपूर्ण गुंतवणुकीतील ५-१०% भाग हा सोन्यात असायला हरकत नाही. मात्र त्यापेक्षा जास्त भाग आपल्या आर्थिक नियोजनाला हानिकारकच ठरत असतो.

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील (NPS) नवे बदल

Reading Time: 3 minutesराष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) ही सरकार पुरस्कृत सामाजिक सुरक्षितता योजना आहे. सेवानिवृत्तीनंतर हमखास आणि नियमितपणे निवृत्तीवेतन मिळावे हा या योजनेचा हेतू आहे. १ एप्रिल २००४ नंतर सरकारी नोकरी  स्वीकारलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना (संरक्षण विभागातील कर्मचारी वगळून) ही योजना सक्तीने लागू करण्यात आली आहे. अन्य पेन्शन योजनांच्या तुलनेत या योजनेत काही त्रुटी होत्या. त्या दुरुस्त करण्यात आल्या असून काही नवीन सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही योजना पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक झाली आहे.

कर्जरोखे (Debt Fund) योजनांचे कामकाज कसे चालते?

Reading Time: 5 minutesम्युच्युअल फंडाच्या डेट फंड किंवा कर्जरोखे संबंधित योजनांची सोप्या शब्दात व्याख्या करायची झाल्यास आपण म्हणू की व्याजाने पैसे देणे. यात म्युच्युअल फंड, कर्जदाराकडून मिळालेले व्याज किंवा परतावा आपल्या गुंतवणूकदारांना भांडवलवृद्धीच्या स्वरूपात देतात. म्युच्युअल फंडात १२ प्रकारच्या डेट फंड किंवा कर्जरोखे प्रकारच्या योजना असतात. या सर्व १२ प्रकारची वर्गवारी त्या योजनेमध्ये असलेल्या निरनिराळ्या कर्जरोख्यांच्या एकत्रित मुदतपूर्ती कालावधीवर अवलंबून असते.

रिअल ईस्टेट वि.  शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड

Reading Time: 3 minutesभारतीय रिझर्व बँकेच्या २०१७ सालातील एका अहवालानुसार आपल्या देशातील सर्व व्यक्तींकडील वैयक्तिक संपत्तीचा ७६.९% भाग – म्हणजे तीन चतुर्थांशपेक्षा अधिक – हा रिअल इस्टेटमधे गुंतवलेला आहे. त्या खालोखाल ११% सोन्यातील गुंतवणूक आहे आणि अवघी ५% संपत्ती बँकेत किंवा निवृत्तीनिर्वाह निधीत आहे. आपल्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या चाकोरीबद्ध गुंतवणुकीच्या सवयींचा हा परिपोष आहे.इथे हे नमूद करणे आवश्यक आहे की स्वतःच्या राहण्यासाठी घेतलेले घर हे वापरण्याच्या (Consumption) दृष्टीने घेतलेले असल्यामुळे तिला आपण ‘शुद्ध आर्थिक गुंतवणूक’ मानत नाही. राहण्यासाठी स्वतःचे घर असावे ही बहुतेकांची भावनिक गरज असते, तसेच कौटुंबिक स्वास्थ्य आणि स्थैर्याच्या दृष्टीने ते आवश्यक असते. त्यामुळे असे आपण राहते घर आणि इतर आर्थिक गुंतवणुकी यांची तुलना करू शकत नाही. या लेखांमधील विचार आर्थिक गुंतवणूक म्हणून घेतलेल्या रिअल इस्टेट किंवा घरांसाठी आहेत.

गुंतवणुकीची उद्दिष्टे, उत्साह अन् उल्हास

Reading Time: 3 minutesप्रत्यक्षात बघायला गेलं तर गुंतवणूक करणं किंवा त्यातून श्रीमंत होणं ही एक संथ आणि त्यामुळे कंटाळवाणी प्रक्रिया आहे. आपण नियोजनाचा प्लान बनवताना, आपली आर्थिक उद्दिष्टे निश्चित करताना कदाचित कोणी स्वप्नं बघू शकेल, आपण काय काय साध्य करू शकतो? याच्या शक्यता कोणाला रोमांचकारी वाटू शकतात. पण श्रीमंत होण्याच्या कल्पना आणि त्यासाठीची प्रक्रिया यात एक मोठा फरक असतो. तो प्लान प्रत्यक्षात उतरवण्याची प्रक्रिया संथ व संयत असते.

शेअर बाजारातील प्राणी

Reading Time: 3 minutesव्यक्ती तितक्या प्रकृती’ असे म्हटले जाते. कोणीही एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नाही. त्यामुळे त्यांची गुंतवणूक करण्याची सवय आणि गुंतवणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असणारच. त्यामुळेच त्यांच्या वर्तनावरून ही नावे दिली असावीत. अर्थात हीच नावे का दिली? ते अगदी ठामपणे सांगता येणार नाही. हे प्राणी म्हणजे बाजारात असलेल्या प्रवाहातील विशिष्ट  गटातील लोकांचा समूह आहे. बाजारातील तेजीचा संबध बैलाशी तर मंदीचा संबंध अस्वलाशी जोडल्याने आणि तेजी मंदीचे चक्र सातत्याने चालू असल्याचे या दोन प्राण्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. तेव्हा त्यांच्यासह काही अपरिचित पशु आणि पक्षी या प्रकारांच्या वर्तनांचा गंमत म्हणून मागोवा घेऊयात.

अक्षय्य तृतीया आणि सुवर्ण गुंतवणूक

Reading Time: 3 minutesसुवर्ण खरेदी आपल्या संस्कृतीचा / परंपरेचा भाग आहेच शिवाय सोने व सोन्याचे दागिने हा अनेकांच्या आवडीचा विषय आहे. हौशीला मोल नसते.परंतु जर आपली हौस आपल्या गुंतवणुकीचा उत्तम पर्याय बनू शकत असेल तर दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. यासाठी गरज आहे ती तुमचा दृष्टिकोन बदलण्याची.सोनं खरेदीसाठी पारंपरिक पर्यायांचा विचार करण्यापेक्षा आधुनिक पर्यायांचा विचार केल्यास, तुमची हौस आणि गुंतवणुकीचं कठीण गणित तुम्ही सहज सोडवू शकाल.

बँक एफडी वि. म्युच्युअल फंड

Reading Time: 4 minutesआपण सर्व जण बँकेच्या एफडीमध्ये नियमित गुंतवणूक करत असतो. बँकेच्या एफडीमधून मिळणारा निश्चित कालावधीसाठी निश्चित परतावा आपल्याला आश्वस्त करतो आणि त्यामुळे आपली ओढ बँकेच्या एफडी कडे अधिक असते.  बँकेच्या एफडी मध्ये गुंतवणूक करीत असताना आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

Moneycontrol – नव्या रूपातील गुंतवणूकदारांचा मितवा

Reading Time: 4 minutesएक गुंतवणूकदार म्हणून आपल्या गुंतवणुकीवर आपले लक्ष हवे. त्याची अधिकृत माहिती मिळवण्याचे पुस्तके, अहवाल, संकेतस्थळे, मोबाईल अँप यासारखे अनेक मार्ग आहेत. त्यापैकी  Moneycontrol हे सर्व उपयुक्त माहितीचे सर्वसमावेशक अँप आहे. हे अँप म्हणजे गुंतवणूकदारांचा मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या अशा अर्थाने ‘मितवा’ आहे असे मी म्हणतो. या अँपमध्ये  अनेक उपयोगी गोष्टी असून ते पूर्ण क्षमतेने वापरले तर अन्य कोणत्याही माहितीची गरज पडणार नाही. अनेकांना हे अँप शेअर, म्युच्युअल फंड युनिटचे भाव पाहण्याचे आहे असे वाटते. यापलिकडे त्याचा कसा वापर करावा याची माहितीच नसते. अलीकडेच या अँपने आपला चेहरा मोहरा बदलल्याने थोडा गोंधळ होण्याची शक्यता आहे. तेव्हा थोडक्यात या अँपचा कसा उपयोग होऊ शकतो ते जाणून घेऊयात.