माझी कन्या भाग्यश्री योजना

Reading Time: 4 minutes केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१४ पासून “बेटी बचाओ-बेटी पढाओ” ही योजनाही सुरु केली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार सदर योजनेसाठी मुलींचे जन्मदर कमी असणाऱ्या भारतातील १०० जिल्ह्यांची निवड करून सदर जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे. “बेटी बचाओ-बेटी पढाओ” या योजनेच्या धर्तीवरच मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार निर्माण करणे, मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांना शिक्षण देणे व बालविवाहास प्रतीबंध करणे या उद्देशाने महाराष्ट्र राज्यसरकारने सध्या सुरु असलेली सुकन्या योजना विलीन करुन “माझी कन्या भाग्यश्री” ही नवीन योजना सुरु केली आहे.

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY)

Reading Time: 3 minutes अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत हे वाक्य आपण आयुष्यभर ऐकलेलं असतं. त्यातील निवारा म्हणजेच राहायला घर ही गोष्ट तर आपल्याला सर्व ऋतूंत तिन्ही त्रिकाळ वाचवणारी. शिवाय ते घर जर स्वतःचं असेल तर त्यातून मनाला मिळणाऱ्या आनंदाची गोष्टच वेगळी. मात्र सध्याच्या दिवसात स्वतःचं घर घेणं ही एक मोठी बाब आहे. वाढती महागाई, वाढत्या गरजा यांचा मेळ बसवत स्वतःचं घर खरेदी करणं म्हणजे आकाशाला गवसणी. स्वतःच घर म्हणजे जणू सामान्य लोकांना आवाक्याबाहेर वाटणारी गोष्ट .पण “प्रधानमंत्री आवास योजना” असताना सामान्य नागरिक स्वतःच्या घराचं स्वप्न नक्की पाहू शकतात.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना

Reading Time: 3 minutes या वर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पात असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी प्रस्तावित असलेली प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन (PM-SYM) योजना सुरू झालेली आहे. आपल्या पंतप्रधानानी या योजनेचे औपचारिक उद्घाटन १५  फेब्रुवारी २०१९ रोजी गांधीनगर येथे केले. या योजनेनुसार यातील लाभार्थीना ६० वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा 3000/- (रुपये तीन हजार) एवढे निश्चित निवृत्तीवेतन मिळेल. या योजनेच्या निवडक लाभार्थीना PM-SYM या पेन्शनकार्डचे वाटप करण्यात आले.

काय आहे पोस्ट ऑफिस पीपीएफ योजना?

Reading Time: 3 minutes कोणीही व्यक्ती आयुष्यभर कमाई कशी करू शकेल? म्हणूनच कमवत असतानाच आपल्या स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्याची तरतूद आपण करायला हवी.यासाठी बाजारात अनेक बचत व गुंतवणूक योजना उपलब्ध असल्याचं आपल्याला दिसतं.  अशा अनेक योजनांपैकी कोणती निवडावी? तर ती निवड सजगतेने करायला हवी.कारण आपल्या मेहनतीचा पैसा आपण गुंतवणार असतो. अशा सगळ्या योजनांमध्ये सर्वात खात्रीशीर म्हणता येतात, भारतीय टपाल खात्याच्या काही योजना. अशापैकीच एक आहे PPF योजना अर्थात सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी योजना. 

काय आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना?

Reading Time: 3 minutes प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही एक सरकारची महत्वाची कर्ज योजना असून मुद्रा (Micro unit deployment & refinance agency Ltd) या नावाने एक संस्था स्थापन केली असून त्यांनी काढलेल्या कर्ज योजना या मुद्राकर्ज नावाने ओळखली जाते. यातून प्रत्येक उद्योगी गरजवंताला ‘अकृषी उद्योगासाठी’ सुलभ कर्ज मिळू शकते.

आयुष्यमान भारत योजनेची शतकपूर्ती

Reading Time: 2 minutes आयुष्यमान भारत योजना भारतातील आरोग्यक्षेत्रात माईलस्टोन ठरली आहे. आरोग्यक्षेत्रात ‘गेम चेंजर’ ठरलेल्या या योजनेला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. गरिबांसाठी आशेचा किरण ठरलेली भारत सरकारची ही एक प्रमुख योजना आहे.

संपूर्ण भारतीय आणि व्यवहार्य मॉडेल – सर्व ज्येष्ठांसाठी ‘यूबीआय’ योजना

Reading Time: 4 minutes भारतीय नागरिकांच्या मनात सध्या असुरक्षिततेने घर केले असून पुरेसा पैसा उपलब्ध नसणे, हे त्याचे सर्वात प्रमुख कारण आहे. सर्व ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा जाहीर करून त्यांच्यात कोणताही भेदभाव न करता विशिष्ट मानधन देणे ही ‘गरजू नागरिकांना किमान पैसे देण्याची आदर्श (Universal Basic Income – UBI) योजना’ ठरू शकते. अर्थक्रांतीचा या प्रस्तावाची अमलबजावणी करण्याची हीच वेळ आहे. कारण, त्यामुळे अधिकाधिक नागरिकांना समृद्ध आयुष्य जगण्याचा हक्क मिळणार आहे.

राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) ही PARDA यांनी प्रवर्तित केलेली अत्यल्प व्यवस्थापन फी असलेली पेन्शन योजना आहे. जरआपण त्याचे सदस्य असलात (?) तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता एका चुटकीसरशी आपणास आपल्या खात्यासंबंधीची माहिती मिळू शकते. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटी (NSDL) यांनी नुकतेच एक नवीन अँप तयार केले आहे. गुगल प्ले स्टोअर आणि अँप स्टोअरवर ते उपलब्ध आहे. या अँपच्या साहाय्याने खातेदारांस आपल्या खात्यासंबंधी सर्व अद्ययावत माहिती एन.पी.एस चे रेकॉर्ड किपर NSDL CRA च्या संकेतस्थळाचा लॉग इन आय डी व पासवर्ड वापरून मिळू शकते. हे अँप गुंतवणुकांदाराना हाताळायला सोपे (users friendly) असून अँड्रॉईड सिस्टीम असलेल्या सर्व मोबाईलमध्ये चालते.

सुकन्या समृद्धी योजना – भाग ३

Reading Time: 2 minutes सुकन्या समृद्धी योजनेचे सर्व फायदे समजले असतील तर आपल्या मुलीच्या पंखाना बळ देण्यासाठी महत्वाचं पाऊल म्हणजे, तिच्या दूरगामी भविष्याची सोय करून ठेवणं. यासाठी तुम्हाला सुकन्या समृद्धी योजना (SSY) हा उत्तम पर्याय आहे. या भागात सुकन्या समृद्धी खात्यासंदर्भात पडणारे महत्वाचे प्रश्न व उत्तरे जाणून घेऊया.  

आयुष्यमान भारत योजना

Reading Time: 3 minutes आयुष्यमान भारत ही भारत सरकारची महत्वाकांक्षी आरोग्यविमा योजना असून, त्यामधून १०.३६ कोटी अल्प उत्पन्न असलेल्या गरीब कुटुंबांतील साधारणपणे ५० कोटी लोकांना ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्यविम्याचे संरक्षण दरवर्षी मिळेल. २३ सप्टेंबर २०१८ रोजी ही योजना सर्व भारतभर अमलात आली आहे. ही जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्यविमा योजना ठरली आहे.