म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १३
नमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, ‘एसडब्लूपी’बद्दल. “एसडब्लूपी म्हणजेच सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन”.
- एसआयपी आणि एसटीपी मध्ये आपण पाहिले की आपण पद्धतशीरपणे इक्विटीमध्ये गुंतवणूक करत असतो. ‘एसडब्लूपी’मध्ये आपण आपल्या गरजेनुसार पैसे काढत असतो.
- ही सुविधा अशा लोकांसाठी योग्य आहे ज्यांना नियमितपणे महिन्याला किंवा तिमाहीला खर्चासाठी पैशाची गरज असते.
- ज्यांनी म्युच्युअल फंडामध्ये एकगठ्ठा रक्कम गुंतवलेली आहे, असे गुंतवणूकदार आपल्या गरजेनुसार आपल्याला महिन्याला किंवा तिमाहीला लागणाऱ्या रकमेची ‘एसडब्लूपी’चा विनंती अर्ज म्युच्युअल फंडाकडे देऊ शकतो.
- त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार दर महिन्याला किंवा तिमाहीला त्याच्या बँकेत ‘एसडब्लूपी’ची रक्कम म्युच्युअल फंडच्या युनिट्समधून निघून जमा होत असते.
- आपली ‘एसडब्लूपी’ची रक्कम ही म्युच्युअल फंडामधून मिळणाऱ्या वार्षिक उत्पन्नापेक्षा कमी असावी. जेणेकरून आपली मूळ गुंतवणूक खाली जाणार नाही.
- उदाहरणार्थ, जर आपण म्युच्युअल फंडातून १०% परताव्याची अपेक्षा करत असू, तर आपली ‘एसडब्लूपी’ची रक्कम वार्षिक ८-९% असावी जेणे करून आपल्याला नियमित उत्पन्न मिळेल व आपली गुंतवणूकही वाढत राहील. शक्यतो आपण जो पर्यंत नोकरी किंवा व्यवसाय करत असतो तोपर्यंत आपण एसआयपी किंवा एसटीपी मध्ये गुंतवणूक करत राहिले पाहिजे व जेव्हा आपण निवृत्त होतो तेव्हा नियमित उत्पन्नासाठी आपण ‘एसडब्लूपी’ चालू केली पाहिजे.
ह्या सुविधेचा वापर गुंतवणूकदार आपल्या गरजेनुसार उत्तमरित्या करू शकतात.
(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखिमेचा अधीन असते. योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ११
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १२
म्युच्युअल फंड सही है l
धन्यवाद!
–निलेश तावडे
9324543832
(लेखक हे म्युच्युअल फंड क्षेत्रात २० वर्षे कार्यरत होते. सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत. त्यांना सम्पर्क करण्यासाठी तसेच, ९३२४५४३८३२ या क्रमांकावर व्हाट्स अँप करा. तसेच त्यांचे माहितीपर व्हिडीओ पाहण्यासाठी त्यांच्या YouTube Channel ला सबस्क्राईब करा. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक चालू करण्यासाठी त्यांच्या www.nileshtawde.com या वेबसाईटला भेट द्या. आपल्या विभागात आपल्या मित्रपरिवाराकरिता म्युच्युअल फंड संबंधित मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करा आणि अर्थसाक्षर अभियानामध्ये सामील व्हा.)
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/