म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात- भाग १४
नमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “म्युच्युअल फंडाच्या भांडवल वृद्धी (Growth option) व लाभांश (Dividend Option)” बद्दल. म्युच्युअल फंडामध्ये प्रामुख्याने दोन पर्याय असतात, भांडवल वृद्धी (Growth Option) आणि लाभांश ( Dividend Option).
भांडवल वृद्धी –
- या पर्यायामध्ये आपल्या गुंतवणुकीचा परतावा हा योजनेच्या निव्वळ मालमत्ता मूल्यच्या (NAV) वाढीमध्ये दिसून येतो.
- उदाहरणार्थ जर मूळ एनएव्ही (NAV) जी रु.१० आहे ती वाढून जर रु.१२ झाली तर रु.२ ही आपली भांडवल वृद्धी आहे. आपण जेव्हा आपली गुंतवणूक वाढलेल्या एनएव्ही (NAV) वर काढतो तेव्हा आपल्याला अल्पकालीन (Short Term) किंवा दीर्घकालीन (Long Term) भांडवल वृद्धी कर (Capital Gain Tax) भरावा लागतो.
- जर ३ वर्षाच्या आत गुंतवणूक काढली, तर अल्पकालीन भांडवल वृद्धी कर भरावा लागतो आणि ३ वर्ष नंतर गुंतवणूक काढली, तर दीर्घकालीन भांडवल वृद्धी कर भरावा लागतो.
- इक्विटी फंडाच्या गुंतवणुकीमध्ये १ वर्षाच्या आत गुंतवणूक काढल्यास दीर्घकालीन भांडवल वृद्धी कर लागतो. मात्र १ वर्ष नंतर विथड्रॉ केल्यास अल्पकालीन भांडवल वृद्धी कर ही जी कर प्रणाली आहे ती सध्याची आहे पुढे सरकारच्या धोरणानुसार ह्यात बदल होऊ शकतो.
लाभांश पर्याय-
- या पर्यायामध्ये म्युच्युअल फंड योजनेच्या कामगिरीनुसार लाभांश देत असतात.
- ‘एनएव्ही’मध्ये झालेली वाढीतून लाभांश दिला जातो, मात्र सेबीच्या (SEBI) नियमानुसार फंड मॅनेजर्सना प्रथम त्यांनी केलेल्या मार्केटमधील गुंतवणुकीतून एनएव्ही वाढीचा फंडाच्या मालमत्तेमध्ये झालेला नफा बाजूला काढावा लागतो. त्याला वितरणीय अधिशेष (Distributable Surplus) असे म्हणतात.
- ह्या नफ्यामधूनच गुंतवणूकदारांना डिव्हिडंड दिला जातो.
लाभांश पुनर्गुंतवणूक
- आणखी एक पर्याय असतो तो म्हणजे लाभांश पुनर्गुंतवणूक (Dividend Reinvestment).
- यामध्ये लाभांशाची रक्कमेचे युनिट्स गुंतवणूकदाराच्या मूळ युनिट्समध्ये जोडले जातात.
- म्युच्युअल फंडाचा लाभांश हा गुंतवणूकदाराच्या हातात पूर्णपणे करमुक्त असतो, मात्र म्युच्युअल फंड लाभांश वाटण्याचा अगोदर सरकारला लाभांश वितरण कर (Distribution Tax) जमा करतात.
गुंतवणूकदारानी वृद्धी पर्याय निवडला पाहिजे की लाभांश पर्याय निवडावा हे पूर्णपणे त्यांच्या आर्थिक नियोजनावर अवलंबून असते. ज्यांना नियमित उत्पन्न हवे असेल त्यांनी लाभांश पर्याय निवडावा जेणेकरून त्यांना नियमित उत्पन्न वरचे वर मिळत राहील. नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी सध्या तरी लाभांश पर्यायापेक्षा वृद्धी पर्यायामधील ‘सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन’ची सुविधा घ्यावी, जी जास्त करप्रभावी असते. ज्यांना दीर्घकालीन संपत्ती निर्माण करायची आहे त्यांनी भांडवल वृद्धी पर्याय निवडावा जेणेकरून दीर्घावधीमध्ये त्यांच्या परताव्यामध्ये चक्रवाढ वाढीचा चांगला लाभ होऊ शकतो.
चला तर, म्युच्युअल फंडामध्ये आजच गुंतवणूक करूया आणि आपल्या संपत्ती निर्माणासाठी त्याचा लाभ घेऊया.
(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखिमेचा अधीन असते. योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ११
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १२
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १३
म्युच्युअल फंड सही है l
धन्यवाद!
–निलेश तावडे
9324543832
(लेखक हे म्युच्युअल फंड क्षेत्रात २० वर्षे कार्यरत होते. सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत. त्यांना सम्पर्क करण्यासाठी तसेच, ९३२४५४३८३२ या क्रमांकावर व्हाट्स अँप करा. तसेच त्यांचे माहितीपर व्हिडीओ पाहण्यासाठी त्यांच्या YouTube Channel ला सबस्क्राईब करा. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक चालू करण्यासाठी त्यांच्या www.nileshtawde.com या वेबसाईटला भेट द्या. आपल्या विभागात आपल्या मित्रपरिवाराकरिता म्युच्युअल फंड संबंधित मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करा आणि अर्थसाक्षर अभियानामध्ये सामील व्हा.)
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/