Reading Time: 2 minutes
नमस्कार, ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “म्युच्युअल फंडाची रचना व मांडणीबद्दल”!
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १
भारतात म्युच्युअल फंड ही एक पब्लिक ट्रस्ट आहे. त्याचे मुख्यत्वे ४ भाग असतात.
१) प्रायोजक (Sponsor)
२) विश्वस्त कंपनी (Trustee Company)
३) निधी व्यवस्थापक कंपनी (Asset Management company)
४) कस्टोडिअन (Custodian).
-
प्रायोजक म्हणजे एखादी कंपनी किंवा संस्था जे म्युच्युअल फंडाची स्थापना करतात. विश्वस्त कंपनी, म्युच्युअल फंड ट्रस्टचा सांभाळ करतात. ते म्युच्युअल फंडची कामगिरी, सेबीने आखून दिलेली नियमावलीनुसार काम होते की नाही याचा आढावा दर दोन महिन्यांनी विश्वस्त कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेत असतात.
-
सेबीच्या नियमानुसार विश्वस्त कंपनी मध्ये कमीत कमी ६६% संचालक जे असतात ते स्वतंत्र संचालक असले पाहिजेत.
-
निधी व्यवस्थापक कंपनी मध्ये तज्ञ अनुभवी लोक असतात जे नीर निराळ्या गुंतवणूक योजना राबवून, म्युच्युअल फंडामधील गुंतवणूकदारांचा फंड बाजारामध्ये गुंतवतात व गुंतवणूकदारांना भांडवल वृद्धी किंवा लाभांश म्हणून परतावा देतात. त्यासाठी निधी व्यवस्थापक कंपनी म्युच्युअल फंडाला सेबीच्या नियमानुसार शुल्क आकारतात. निधी व्यवस्थापक कंपनी च्या बोर्ड मध्ये कमीत कमी ५०% संचालक हे स्वतंत्र संचालक असावे लागतात. सेबीसुद्धा दर दोन वर्षांनी म्युच्युअल फंडाचे लेखापरीक्षण करून म्युच्युअल फंडाच्या कामकाजावर बारकाईने लक्ष ठेवते.
-
कस्टोडिअन जे असतात, ते फंड मॅनेजर्स ने गुंतवणूक केलेल्या कर्जरोखे आणि समभागांचा सांभाळ करतात. सेबीने म्युच्युअल फंडची संरचना इतकी सशक्त व सुंदर बनवली आहे की गुंतवणूकदार निश्चिन्त होऊन म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकतात.
-
समजा एखाद्या निधी व्यवस्थापक कंपनीला आपला व्यवसाय चालवणं शक्य नसेल, तरी म्युच्युअल फंड बंद होत नाहीत. एखादी दुसरी निधी व्यवस्थापक कंपनी त्या म्युच्युअल फंडाला आपल्या, म्युच्युअल फंडांत सामील करते. अशाप्रकारे गुंतवणूकदारांचे जराही नुकसान होत नाही.
-
आपण ऐकतो की बऱ्याच फसवणूक करणाऱ्या (Ponzi schemes) योजना पैसे घेऊन गायब होतात, मात्र त्या दृष्टीने म्युच्युअल फंड पूर्णपणे सुरक्षित असतात.
चला तर म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करून फसवणुकीच्या योजनापासून दूर राहूया.
(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखिमेचा अधीन असते. योजने संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)
म्युच्युअल फंड सही है l
धन्यवाद!
निलेश तावडे,
9324543832
(लेखक हे म्युच्युअल फंड क्षेत्रात २० वर्षे कार्यरत होते. सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत. त्यांना सम्पर्क करण्यासाठी तसेच, ९३२४५४३८३२ या क्रमांकावर व्हाट्स अँप करा. तसेच त्यांचे माहितीपर व्हिडीओ पाहण्यासाठी त्यांच्या YouTube Channel ला सबस्क्राईब करा. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक चालू करण्यासाठी त्यांच्या www.nileshtawde.com या वेबसाईटला भेट द्या. आपल्या विभागात आपल्या मित्रपरिवाराकरिता म्युच्युअल फंड संबंधित मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करा आणि अर्थसाक्षर अभियानामध्ये सामील व्हा.)
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/
Share this article on :