Reading Time: 2 minutes
नमस्कार, ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “नवीन योजना कशी उपलब्ध होते व त्या मागील प्रक्रिया”.
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग २
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात- भाग ३
-
म्युच्युअल फंडामध्ये एक प्रॉडक्ट टीम असते, ती टीम इतर म्युच्युअल फंडाच्या चालू असलेल्या योजना, तसेच डेट आणि इक्विटी बाजारातील संधीचा लाभ गुंतवणूकदारांना कसा करून देता येईल, या दृष्टीने नवीन योजना आखतात.
-
त्यानंतर ती योजना म्युच्युअल फंड कार्यालयाच्या समितीमध्ये चर्चेला घेतली जाते. जिथे फंड मॅनेजर्स (Fund Managers), विक्री विभाग (Sales Team), ऑपरेशन्स टीम (Operations Team) तसेच, अनुपालन (Compliance Team) आणि जोखीम टीम (Risk Management Team) आपापली मते मांडतात.
-
सर्व संमतीने योजनेची आखणी करून ते सर्व प्रथम म्युच्युअल फंडाच्या विश्वस्त कंपनीच्या आणि निधी व्यवस्थापक कंपनीच्या संचालक मंडळाकडे मंजुरीसाठी पाठविले जाते, यात दोन्ही संचालक मंडळ हे पाहतात की त्याच पद्धतीची एखादी योजना आधीच अस्तित्वात तर नाही ना, तसेच गुंतवणूकदारांचे हित.
-
त्यानंतर सेबीने आखून दिलेल्या मसुद्यानुसार योजनेचे एसआयडी (SID) मसुदा सेबीला मंजुरी साठी पाठविला जातो. सेबी त्याचा पूर्ण अभ्यास करून मंजुरी देते. सेबी ची मंजुरी आल्यानंतर निधी व्यवस्थापक कंपनीला सहा महिन्याच्या आत ती योजना गुंतवणूकदारांना उपलब्ध करावी लागते. अन्यथा त्या एसआयडी मसुद्याची वैधता संपते.
-
ओपन एंडेड म्युच्युअल फंडची (Open Ended MF) नवीन फंडाचा गुंतवणूक कालावधी हा १५ दिवसाचा असतो मात्र कर बचत योजनांचा नवीन ऑफर कालावधी जास्त असू शकतो.
-
ह्या कालावधीमध्ये म्युच्युअल फंडाचा विक्री विभाग, वितरकांमार्फत जास्तीत जास्त गुंतवणुकदारांपर्यंत पोहचून त्यांना त्या योजनेचे फायदे समजावतात.
-
जास्तीत जास्त गुंतवणुकदारांपर्यंत पोहचण्यासाठी ऑनलाईन सेवा तसेच फेसबुक (Facebook), व्हाट्सअप (Whats app), लिंक्डईन (LinkedIn) सारख्या सोशल मेडिया चा देखील वापर करतात.
अशाप्रकारे नवीन योजना उपलब्ध करताना गुंतवणूकदाराचे हित जपले जाते.
(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखिमेचा अधीन असते. योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ४
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ५
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ६
म्युच्युअल फंड सही है l
धन्यवाद!
– निलेश तावडे
9324543832
(लेखक हे म्युच्युअल फंड क्षेत्रात २० वर्षे कार्यरत होते. सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत. त्यांना सम्पर्क करण्यासाठी तसेच, ९३२४५४३८३२ या क्रमांकावर व्हाट्स अँप करा. तसेच त्यांचे माहितीपर व्हिडीओ पाहण्यासाठी त्यांच्या YouTube Channel ला सबस्क्राईब करा. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक चालू करण्यासाठी त्यांच्या www.nileshtawde.com या वेबसाईटला भेट द्या. आपल्या विभागात आपल्या मित्रपरिवाराकरिता म्युच्युअल फंड संबंधित मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करा आणि अर्थसाक्षर अभियानामध्ये सामील व्हा.)
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/
Share this article on :