प्रमोशन मिळत नाही
https://bit.ly/3jb1BR3
Reading Time: 3 minutes

प्रमोशन मिळत नाही?

सध्याच्या स्पर्धेच्या युगात अनेकवेळा आपल्याला असे वाटते की आपलीकडे गुणवत्ता असून ऑफिसमधले राजकारण किंवा तत्सम कारणांनी आपल्याला प्रमोशन मिळत नाही. पण खरंच असं असतं की त्यामागे काही वेगळी कारणं आहेत? प्रमोशन मिळालं नाही, तर चुकीच्या पद्धतीने विचार करण्यापेक्षा काही महत्वाच्या मुद्द्यांचा विचार करून त्यावर कृती करणं आवश्यक आहे. हे मुद्दे कुठले, याबद्दल आजच्या लेखात माहिती घेऊया.

गेली तीन वर्ष मायाला प्रमोशन मिळत नव्हते. आपली जबाबदारी उत्तम प्रकारे निभावून देखील अजून पर्यंत प्रमोशनसाठी तिचे नाव विचारात घेतले गेले नव्हते. यावर्षी आपणच विचारावे बॉसला असे तिला मनापासून वाटत होते. मात्र असे कसे विचारावे, काय वाटेल बॉसला, हे तिला समजत नव्हते. मायासारखी स्थिति आपल्यापैकी बर्‍याच जणांची झाली असेल किंवा होत असेल, तर ही परिस्थिति नेमकी कशी हाताळायची?  

हे नक्की वाचा: या ५ सवयी असतात यशाच्या मार्गातले सर्वात मोठे अडथळे 

प्रमोशन मिळत नाही? खालील मुद्द्यांचा विचार करा 

१. प्रमोशनसाठी स्वतः विचारा :

  • आपल्या प्रयत्नांची जाणीव ठेवून आपली कंपनी आपल्याला प्रमोशन देईल असे फार कमी वेळा होते. उलट यामुळे तुम्ही आहे त्या पदावर समाधानी आहात असे समजले जाते तेव्हा प्रमोशन साठी आपल्या बॉसला नक्कीच विचारा.
  • आपण न विचारण्यापेक्षा/ उशिरा विचारण्यापेक्षा लवकर विचारलेले केव्हाही उत्तम. यामुळे फार तर काय होईल आपल्याला प्रमोशन नाकारले जाईल. पण त्याबरोबरच नेमके प्रमोशन का मिळत नाही हे देखील आपल्याला समजेल. जेणेकरून आपण आपल्यात सुधारणा करू आणि आपल्या वरिष्ठाला हे समजेल की आपण प्रमोशन घेण्यास उत्सुक आहात. तो तुम्हाला त्याप्रमाणे जबाबदार्‍या देईल आणि मार्गदर्शन देखील करेल.
  • प्रमोशन साठी विचारायला जाण्याआधी आपण ते विचारायला जायची योग्य वेळ देखील निश्चित करायची, शिवाय सध्याची कंपनीची स्थिती देखील विचारात घेतली पाहिजे.

२. आपली योग्यता सिद्ध करा   :

  • अर्थातच प्रमोशनसाठी विचारणे याबरोबरीनेच महत्वाचे हे आहे की आपण त्या प्रमोशनसाठी कसे योग्य आहोत हे दाखवून देणे.
  • यासाठी आपण त्या पातळीवर जाण्यासाठी आवश्यक मूल्य आपल्याला माहीत असावीत आणि ती अमलात आणायचा प्रयत्न देखील करावा. जेणेकरून प्रमोशन साठी विचारण्याआधी आपण केलेली कामे, कर्तव्ये इ. निदर्शनात आणून देता येईल.
  • एखादे प्रेझेंटेशन तयार ठेवावे. ज्यामुळे आपल्याला पदोन्नतीसाठी विचारात घेताना वरिष्ठ अधिकार्‍याकडे आपण केलेल्या उत्तम कार्यभागाची माहिती असेल.
  • यासोबतच आतापर्यंत केलेली उत्तम कामगिरी, मिळालेली सन्मानपत्रके, प्रमाणपत्रे इ. ची यादी तयार ठेवा. जेणेकरून प्रमोशन साठी विचारताना ह्या सर्व गोष्टी निदर्शनात आणून देता येतील.

३. नवीन जबाबदर्‍या स्वीकारा :

  • प्रमोशन म्हणजेच जबाबदार्‍यासुद्धा वाढतात, तर या वाढणार्‍या जबाबदार्‍या पेलण्यास आपण समर्थ आहोत हे देखील बॉसला समजणे गरजेचे असते, म्हणूनच नवनवीन जबाबदर्‍या स्वीकारायच्या.
  • नुसत्या जबाबदाऱ्या स्वीकारून प्रमोशन मिळत नाही त्या समर्थपणे निभावणे जास्त महत्वाचे आहे. त्यामुळे तुमचे सर्व कौशल्य वापरून तुम्ही नवनवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडून दाखवा.

इतर लेख: या ११ सवयी बदलतील तुमचे आयुष्य 

४. आपल्या जबाबदर्‍या उत्तम प्रकारे निभावा आणि त्या दिसून येऊ द्या : 

  • नवीन जबाबदाऱ्या स्वीकारताना आपल्या पोस्टच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका. या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडणे हे तुमचे प्रथम कर्तव्य आहे, त्यात चूक होऊ देऊ नका. 
  • कोणत्याही कंपनीला आणि वरिष्ठ अधिकार्‍यांना आपली पोस्ट, आपले काम, किती महत्वाचे आहे, आपण ते किती चोखपणे करतो आणि आपल्यावर आणखी जबाबदार्‍या दिल्या तर त्या आपण उत्तम प्रकारे सांभाळू हा विश्वास देणे गरजेचे आहे.

५. इतरांशी तुलना टाळा :

  • दुसऱ्याला चूक किंवा अयोग्य म्हणून आपल्याला योग्य सिद्ध नाही करता येत.आवश्यक असतं ते आपली बाजू मांडणं. 
  • आपण प्रमोशनला का योग्य आहोत हे सांगताना आपल्या सहकार्‍यांसोबत तुलनात्मक उदाहरण देणे टाळावे. त्यापेक्षा आपण त्या योग्यतेचे का आहोत हे तांत्रिकदृष्ट्या पटवून द्यावे.

६. सगळ्यांशी उत्तम व्यवहार करा :

  • सर्वांशी संवाद साधा, सर्वांशी उत्तम संबंध प्रस्थापित करा आणि प्रत्येकाला जिथे कामात मदत लागेल तिथे नक्की करा. यामुळे आपला चांगला अभिप्राय वरिष्ठांपर्यंत जाईल. अभिप्राय हा कधीही आपण स्वतः नाही तर दुसर्‍यांनी दिलेला चांगला.
  • याबरोबरच आपल्या बॉस सोबत देखील चांगले संबंध प्रस्थापित करायचे.

इतर लेख: नोकरी जाण्याची लक्षणे – कसा कराल परिस्थितीचा सामना? 

७. आपण असलेल्या ठिकाणी स्किल गॅप कुठे आहे हे जाणून घ्यायचे :

  • समजा, आपल्याला मॅनेजरच्या पोस्ट साठी विचारात घ्यावे असे वाटत असेल तर कोणत्या मॅनेजरची पोस्ट सध्या रिकामी आहे हे लक्षात घ्यावे आणि त्या साठी लागणारे कौशल्य आपल्याकडे नसेल, तर ते शिकून घ्यावे म्हणजे नक्कीच त्या जागेसाठी आपला विचार केला जाईल.

८. योग्य पेहराव करा :

  • पोशाख ही गोष्ट नेहमी कुठेही येतेच. कारण आपला पोशाख आपले व्यक्तिमत्व ठरवतो. तेव्हा नेहमीच कामाच्या ठिकाणी योग्य पोशाख वापरावा.

वरील बाबी तुम्ही लक्षात घेऊन गरज आहे तिथे बदल केला तर प्रमोशन साठी तर आपले नाव विचारात घेतले जाईलच शिवाय आपली ऑफिस मध्ये एक वेगळीच छाप देखील राहील. प्रमोशन मिळत नाही, म्हणून निराश होऊन चुकीचा विचार नका. आपल्यातले दोष दूर करा, आपल्या चुका सुधारा आणि मुख्य म्हणजे सकारात्मक रहा. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutesबी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutesबी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutesवाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutesसहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –