थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक कर्जावर थोडी खरेदी चालू करतात आणि कर्जाचे विळख्यात फसतच जातात, याला कारणीभूत असतात कर्जदाराकडून होणाऱ्या चुका. थोडे किंवा खूप कर्ज असल्यामुळे जीवनात या चुका घडत जातात. या लेखामध्ये कर्जामुळे निर्माण होणाऱ्या नऊ समस्या मांडल्या आहेत.
.
नक्की वाचा – कर्ज घेताना वय हा महत्त्वाचा घटक आहे का ?
- कर्ज फायद्यापेक्षा जास्त खर्च करण्यास प्रोत्साहित करते –
- कर्जाबद्दल असे काही घडते की आपण विचार करतो की हे कर्ज आपण सहज फेडू शकू. त्यावेळी आपणाकडे काहीतरी फेडण्याविषयी ठोस उपाय योजना आहे असे वाटते आणि आपण कर्ज काढतो. कर्जाचा मोह होतो. परंतु कर्ज हे आपणास परवडण्यापेक्षा जास्त खर्च करण्यास प्रोत्साहित करते.
- अखेरीस जेव्हा ईएमआय तुमच्यापर्यंत पोहोचतो त्यावेळी तो आर्थिक बोजा किमान काही वर्ष आपल्यालाच पेलावा लागतो. त्याचे स्वतंत्र नियोजन करावे लागते. व्याज, मुद्दलाच्या चक्रात अडकतो तेव्हा ते तुमच्या मनाला इतके चांगले वाटत नसते पण हा विचार कर्ज घेण्यापूर्वीच तुम्ही करायला हवा होता.
- कर्जावरील व्याज म्हणजे तुमचा खर्चच असते –
- तुम्ही जेव्हा कर्ज काढता किंवा क्रेडिट कार्ड स्वाइप करता तेव्हा कर्जमुक्त वाटते परंतु हा एक भ्रम आहे. कालांतराने तुम्ही तुमच्या कर्जासाठी दुप्पट किंमत मोजता. ती किंमत व्याजाच्या स्वरूपात असते. व्याजदर जितका जास्त तितके जास्त तुम्ही तुमच्या कर्जाची भरपाई कराल हे कायम लक्षात ठेवा !
- कर्जाचा भार जितका जास्त तितके जास्त व्याज तुम्हाला द्यावे लागेल. याला अपवाद व्याजमुक्त कर्ज किंवा शून्य टक्के व्याजदर असतो पण आजकाल ते मिळणे अशक्य आहे.
नक्की वाचा – Home Loan Transfer : गृहकर्ज हस्तांतराविषयी जाणून घ्या सर्वकाही !
- भविष्यातील उत्पन्नातून कर्ज घेतले जाते –
- तुम्ही तुमच्या भविष्यातील कमाईवर अवलंबुन कर्ज घेता किंवा क्रेडिट कार्ड स्वाइप करता. तुम्ही आधीच वापरलेल्या व यापुढे जास्त मूल्य मिळणार नाही अशा गोष्टींसाठी तुम्ही तुमचे पैसे खर्च करता.
- तुमच्या उत्पन्नात कोणते बदल होऊ शकतात हे तुम्हाला कधीच माहीत नसते. त्यामुळे तुमचे भविष्य गहाण न ठेवणे कधीही चांगले हे नेहमी लक्षात ठेवा.
- उच्च व्याजदरच्या कर्जामुळे तुम्हाला वस्तूच्या किमतीपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात –
- तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवर किंवा कर्जावर पंचवीस हजाराचे फर्निचर किंवा लिविंग रूम सेट ११ टक्के व्याजदराने विकत घेतले. पण पूर्ण कर्ज फेडेपर्यंत तुम्हाला अकरा हजारापेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील. फर्निचरच्या किमतीपेक्षा ते अधिक आहे.
- तुम्ही तुमचे मासिक पेमेंट १००० रुपयापर्यंत वाढवून शिल्लक भरले असले तरीही तुम्ही फर्निचरच्या किमतीपेक्षा जवळपास निश्चितच व्याज जास्त देत असता. त्यामुळे बचत करून बिगर कर्जाच्या मोठ्या वस्तू खरेदी करण्याला प्राधान्य द्या
नक्की वाचा – ऍपद्वारे लोन घेताय ? मग हे आधी वाचा – डिजिटल कर्ज देणाऱ्यांवर आरबीआयची करडी नजर !
- कर्ज तुम्हाला आर्थिक उद्दिष्टे गाठण्यापासून रोखते –
- दर महिन्याचा हप्ता तुम्हाला इतर गोष्टींवर खर्च करावयाच्या रकमेवर मर्यादा घालतात. प्रवास, कुटुंबीयांची टूर, समारंभ या गोष्टीवर खर्च कपात होण्याची शक्यता असते.
- कर्जाची रक्कम जेवढी जास्त तेवढेच मासिक देयके जास्त असून तुम्हाला इतर आवश्यक गोष्टीवरील कमी खर्च बळजबरीने करावा लागतो.
- कर्ज तुम्हाला घर घेण्यापासून रोखू शकते –
- जेव्हा तुम्ही गृह कर्जासाठी अर्ज करता तेव्हा तुमच्याकडील वाहन कर्ज , क्रेडिट कार्ड कर्ज, विद्यार्थी शिक्षण कर्ज या सर्वांचा विचार करावा लागतो. तुमची इतर कर्जाची देयके जास्त असतील तेव्हा तारण कर्जासाठी नकार मिळतो.
- बहुतेक वेळी तुम्ही तुमचे इतर कर्ज फेडत असल्याने गृहकर्जाचा हप्ता भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून बँक तुमचे कर्ज नाकारू शकतात त्यामुळे दीर्घकालीन ध्येयांचा विचार करून कर्ज घ्यायचा निर्णय घ्या.
- कर्जामुळे तणाव आणि गंभीर वैद्यकीय समस्या उद्भवू शकतात –
- जेव्हा तुमच्यावर कर्ज असते तेव्हा तुम्ही ते कसे फेडणार, तुमचे हप्ते कसे भरणार याविषयी काळजी करत राहता. कर्जाच्या ताणामुळे तुम्हाला नैराश्य, मायग्रेन,अल्सर, हृदयविकाराचा झटका यांसह सौम्य ते गंभीर स्वरूपाच्या आरोग्य समस्या उदभवू शकतात.
- तुम्ही जितके जास्त कर्जात बुडाल तितक्या तुम्हाला आरोग्याच्या गुंतागुंतीचा सामना करावा लागेल.
नक्की वाचा – Loan Fraud : सावधान कोणी तुमच्या नावाने कर्ज घेत आहे? यासाठी वाचा या टिप्स
- कर्जामुळे तुमचे वैवाहिक जीवन खराब होऊ शकते –
- कर्जामुळे कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर अनावश्यक दबाव येतो व तुमच्या जोडीदारासाठी आणि तुमच्या मुलांसाठी आर्थिक सुरक्षिततेचा अभाव निर्माण होतो.
- आपल्या खर्च करण्याच्या सवयीवरून, अधिकचे अनावश्यक कर्ज काढण्याच्या प्रवृत्तीवरून, कर्ज खूप आहे याबद्दल तुमचेच जिवलग वाद घालू शकतात. हे भांडण वाढून आपले वैवाहिक जीवनात बिघाड होण्याची अधिकच शक्यता वाढते.
- कर्जामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो –
- क्रेडिट स्कोअर हा आपल्या कर्जाच्या रकमेवर व परतफेडीच्या सवयींवर आधारीत असतो. तुमच्या क्रेडिट मर्यादा आणि मूळ कर्ज शिल्लक यांच्या तुलनेत तुम्ही जितके जास्त कर्ज घ्याल तितका तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होत असतो. तुमचा क्रेडिट स्कोअर हा तुमच्या आयुष्यावर परिणाम करतो.
नक्की वाचा – कर्ज देणाऱ्या ‘ऍप सावकारी’ पासून सावधान !
कर्ज म्हणजे एकप्रकारे आपल्याकडे पैसे नसताना केलेला खर्च असतो. भारतीय समाजात कर्ज काढून सण साजरा करायची प्रवृत्ती नाही. बँक देते म्हणून कर्ज घेऊ नका, तुमच्या गरजा, ध्येये, स्वप्ने यांचा विचार करूनच कर्ज घेण्याचा निर्णय घ्या. कर्ज घ्यायच्या डोळस निर्णयासाठी अर्थसाक्षर परिवारातर्फे तुम्हाला शुभेच्छा !