Reading Time: 3 minutes

आपण नोकरीला लागलो की आपलं पहिलं स्वप्न असतं , ते म्हणजे शक्य तितके लवकर आपले स्वतःचे घर विकत घेण्याचे. अशावेळी नोकरीच्या सुरवातीच्या काळात पैशाची थोडीफार जमवाजमव केल्यानंतरही, प्रत्येकालाच  गृह कर्ज घेण्याची  गरज भासतेच. काही जण गृहकर्जाच्या मोठाल्या मासिक हप्त्याने घाबरतात. माझा स्वतःचा अनुभव आहे की आपण घर कर्ज घेऊन आपले स्वप्न पूर्ण करावे कारण .१५ ते .४० % इतक्या कमी व्याजाने, तेही अगदी २०२५ वर्षे मुदतीचे गृह कर्ज, गृहनिर्माण कर्ज कंपनी आपल्याला देते. २०२५ वर्ष इतक्या दीर्घ मुदतीमध्ये भरावयाचा कर्जाचा हप्ता नक्कीच आपल्याला तणावाखाली ठेवतो

कर्ज घेतलंय? व्याजदर तपासा!

 • बऱ्याच वेळा असे होते की आपण तणावाखाली फक्त घराचे हप्ते भरत राहतो आपल्याकडून आपल्या भावी आयुष्यासाठी म्हणजेच मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा आपल्या निवृत्ती नियोजनासाठी आपल्याकडून काहीच बचत होत नाही. असे होते की २० वर्षात आपल्या मालकीची स्थावर मालमत्ता तयार झाली मात्र तणावामुळे इतर काहीच बचत झाल्याने इतर काही संपत्ती निर्माण करण्यात मागे पडलो
 • आता आपल्या उतार वयात थोडीफार संपत्ती बनवण्यासाठी म्हणा किंवा आपण घर कर्जावर भरलेले व्याज परत मिळवण्याकरिता आपल्याला जीवन विमा कंपन्या म्युच्युअल फंड मदत करतात. कसे ते आपण जाणून घेऊ
 • गृह कर्ज घेतल्यानंतर पहिला तणाव म्हणजे, आपल्याला काही झाल्यास कर्जाचे हप्ते कसे फेडले जातील , गृह निर्माण कर्ज कंपनी घराचा ताबा घेऊन आपल्या कुटुंबावर आपत्ती ओढवेल का ही भीती निर्माण होते. ही भीती घालवण्याकरिता ताबडतोब गृह कर्ज रकमेच्या साधारण दुपटीपेक्षा जास्त रकमेचा मुदतीचा विमा घ्यावा
 • मुदतीच्या विमा मध्ये विम्याचा हप्ता खूप कमी असतो मात्र सुरक्षा कवच खूप मोठे असते. आपल्याला काही वाईट झाले तरी आपल्या पश्चात विमा कंपनी आपल्या गृह कर्ज हप्त्यांची काळजी घेईल तसेच उर्वरित विमा रकमेतून आपल्या कुटुंबाच्या इतर घर खर्चाची व्यवस्था होऊन जाईल

गृहकर्ज परतफेड – एक वेगळा विचार

म्युच्युअल फंड कसे आपल्याला मदत करतील?

 • समजा आपण २५ लाखाचे २० वर्ष मुदतीचे कर्ज घेतले जे आपल्याला गृहनिर्माण कर्ज कंपनी ने .२०% व्याजाने दिले
 • आपण आपला मासिक हप्ता पहिला, तर तो साधारण रु २१,२२३ असेल. आता आपण पुढील २० वर्षात गृहनिर्माण कर्ज कंपनीला मुद्दलाचे रु.२५ लाख व्याजाचे रु. १३ लाख असे एकूण रु. ३८ लाख परत करणार
 • आपण काय करायचे तर आपला जो गृह कर्जाचा हप्ता आहे त्याच्या १०% म्हणजेच फक्त रु २,१०० ची इक्विटी म्युच्युअल फंडात एसआयपी चालू करायची ती घरकर्जाची मुदत संपे पर्यंत म्हणजेच पुढील २० वर्ष चालू ठेवायची
 • म्युच्युअल फंडाचा मागील इतिहास पहिला तर इक्विटी फंडातील एसआयपी ने अगदी १५% ते १८% किंवा त्याहून जास्त परतावा दिला आहे
 • आपण जरी येणाऱ्या काळात मुद्दाम कमी असा १२% परतावा गृहीत धरला तरी आपल्या छोट्याशा रु. २,१०० च्या  एसआयपी ची रक्कम २० वर्षात वाढून रु १९ लाख होऊ शकते. म्हणजेच आपल्याला गृह कर्जावर भरलेले व्याज परत मिळवल्याचे समाधान आपल्या हाती काही संपत्ती निर्माण करू शकल्याचे अधिक समाधान. दीर्घकालीनएसआयपीमध्ये आपल्याला चक्रवाढ वाढीचा फायदा अधिक होतो
 • समजा आपण आपले गृह कर्ज २० वर्ष मुदतीचे केले, तर आपला गृह कर्जाचा मासिक हप्ता साधारण रु. १९,६३८ होईल. आपण आपली रु. २१०० ची एसआयपी २५ वर्ष चालू ठेवली तर एसआयपी तील वाढ रु. ३५ लाख होईल. म्हणजेच गृह कर्जावरील मुद्दल व्याज दोन्ही आपण परत मिळवू शकतो. तसेच आपल्या उतार वयात चांगली संपत्तीही निर्माण झालेली असेल.   

गृहकर्ज परतफेडीचे विविध पर्याय

 • आपण जर का शिस्तबद्ध पद्धतीने थोडा आणखी वैज्ञानिक दृष्टिकोन घेतला म्हणजेच , आपले उत्पन्न हे दरवर्षी वाढत असते त्या प्रमाणात जर आपण एस आई पी ची रक्कमही वाढवली तर. आजकाल म्युच्युअल फंड आपल्याला स्टेप अपएसआयपीची सेवा देतात. रु २१०० ने चालू केलेली एसआयपी आपण दरवर्षी ठराविक रकमेने वाढवू शकतो
 • जर आपण आपलीएसआयपीची रक्कम दरवर्षी किमान रु ५००  ने वाढविली आणि पुढील २० वर्षात म्युच्युअल फंडाचा १२ % परतावा गृहीत धरला, तर आपलीएसआयपीची रक्कम वाढून रु. ५० लाख होऊ शकते. म्हणजेच मुलांचे उच्च शिक्षण, लग्न , निवृत्ती नियोजन अशी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी चांगली संपत्ती निर्माण केल्याचे समाधान
 • इथे आपण एक लक्षात घेतले पाहिजे की आपला देश जेव्हा आर्थिक महासत्ता होईल त्यानंतर मिळणार परतावा हा थोडा कमी होईल. त्यामुळे वरील आकडेवारी फक्त ढोबळ अंदाज बांधण्यासाठी वापरावा. आपल्या आर्थिक सल्लागाराकडून आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार व्यवस्थित नियोजन करून घ्यावे.  

शेअरबाजार: घर (कर्ज) पहावं ‘न’ फेडून… 

आपले स्वतःचे तणावमुक्त गृह कर्जाने , मालकी हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा

धन्यवाद.

निलेश तावडे 

९३२४५४३८३२ 

nilesh0630@gmail.com

(लेखक हे २० वर्ष म्युच्युअल फंड क्षेत्रात कार्यरत होते सध्या ते आर्थिक नियोजनकार आहेत.)

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…