जीवन म्हणजे अनिश्चित भविष्यासाठी नियोजन करणे. आणि सर्वात महत्वाची अनिश्चितता म्हणजे मृत्यू. म्हणूनच, माणसाने कितीही नाही म्हटले तरी तो त्याच्या प्रत्येक हक्काच्या गोष्टींबाबत भावूक आणि जागरूक असतोच.
आपल्या पश्चात आपल्या मालमत्तेच काय होणार ? हा प्रश्न प्रत्येक माणसाला कधी न कधी आयुष्यात पडतोच.
आपण आपल्या मालमत्तेचं इच्छापत्र किंवा मृत्युपत्र बनवून ठेवू शकतो. या मृत्युपत्राविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.
हिंदू वारसा कायदा कलम ३० प्रमाणे वडिलोपार्जित मिळकतीमधील स्वतः चा अविभक्त हिस्सादेखील मृत्युपत्राने देता येतो. मृत्युपत्र लेखी असावे लागते. अर्थात त्याचा कुठलाही नमुना कायद्याने दिलेला नाही. फक्त मुस्लिम धर्मीय व्यक्ती तोंडी मृत्युपत्र करू शकतात.
- मृत्युपत्र हे एक कायदेशीर दस्तऐवज आहे जे लिखित स्वरुपात असते. यामध्ये व्यक्तीने आपल्या मृत्यूपश्चात आपल्या मालमत्तेचे काय करायचं किंवा आपल्या अल्पवयीन मुलांचा ताबा कोणाकडे द्यायचा याविषयीची तरतूद नमूद करून ठेवलेली असते.
- मृत्युपत्र तयार करताना व्यक्ती शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्वस्थ व सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा मृत्युपत्र ग्राह्य धरले जात नाही.
- जोपर्यंत तुम्ही अल्पवयीन असाल आणि मनाने निरोगी असाल, तोपर्यंत तुम्ही भारतीय उत्तराधिकार कायदा, १९२५ नुसार एक इच्छापत्र तयार करू शकता.
हेही वाचा – मृत्यूपत्राविषयीच्या कायदेशीर बाबी व त्यांची पूर्तता
मृत्युपत्र कोण बनवू शकतो ?
- कायद्यानुसार 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती
- मानसिकदृष्टया आरोग्यवान असलेले व्यक्ती
- ज्यांच्याजवळ संपत्ती किंवा जीवन विमा पॉलिसी आहे त्यांनी आपले मृत्युपत्र लिहिणे आवश्यक आहे.
- एखाद्या व्यक्तीने मृत्युपत्र लिहिले तरी ती व्यक्ती जिवंत असेपर्यंत संपत्तीवर त्या व्यक्तीचाच अधिकार राहतो.
- त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच त्याची संपत्ती त्याच्या उत्तराधिका-याला मिळते.
- केवळ मृत्युपत्रकर्त्याच्या स्वतंत्र इच्छेने तयार केलेले इच्छापत्र ग्राह्य धरले जाते.
- एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात अनेक वेळा मृत्युपत्र बदलू शकते. अशा वेळी कायद्यानुसार त्या व्यक्तीने शेवटचे लिहिलेले मृत्युपत्र ग्राह्य धरले जाते.
नक्की वाचा – Benami Property: आयकराच्या चष्म्यातून काळा पैसा आणि बेनामी मालमत्ता
मृत्युपत्र बनवणे आवश्यक आहे का?
- कायद्याने मृत्यूपत्र करणे आवश्यक नाही, पण भविष्यात आपल्याच वारसदारांमध्ये भांडण लागून त्यांचे संबंध बिघडू नयेत म्हणून विल केलेले केव्हाही चांगले.
- माणसाच्या मृत्यूनंतर संपत्तीची त्यांच्या इच्छेप्रमाणे विभागणी आणि तेही कमी खर्चात करण्याचे काम इच्छापत्र किंवा मृत्युपत्र करते.
- ज्यांना त्या संपत्तीतील हिस्सा मिळणार असतो त्यांचेही काम या मृत्युपत्र मुळे सोपे होते व कायदेशीर कामाला लागणारा वेळही वाचू शकतो.
- मालमत्तेचे यश हे कुटुंबातील सदस्य किंवा मृत व्यक्तीच्या नातेवाईकांमधील सामान्य संघर्ष आहे. मृत्युपत्र करणार्याला त्यांची इच्छा असल्यास त्यांची मालमत्ता धर्मादाय संस्थेला दान करता येईल.
- मालमत्तेच्या हस्तांतरण कायदा १९८२ नुसार, कोणत्याही मालमत्तेचे हस्तांतरण हे पुढील दोन पद्धतीने होऊ शकते.
- दोन जिवंत व्यक्तींमध्ये (किंवा कायदेशीररीत्या जिवंत जसे संस्था वगैरे).
- मृत्यूनंतरच्या मालमत्तेचे हस्तांतरण.
नक्की वाचा – मृत्युपत्र – मृत्युपत्र म्हणजे काय आणि ते कसे तयार करायचे?
मृत्युपत्र नोंदणी –
- मृत्यूपत्र साध्या कागदावर देखील दाखल केले जाऊ शकते व ते नोंदणीकृत झाले नसले तरी ते ग्राह्य धरले जाऊ शकते.
- कायद्याप्रमाणे मृत्युपत्राची नोंदणी करणे अनिवार्य नाही. पण त्या मृतुपत्रावर कोणी शंका घेऊ नये किंवा कोणी आक्षेपघेऊ नये म्हणून तुम्ही त्याला नोंदणीकृत करू शकता.
- जर तुम्हाला तुमचे मृत्यूपत्र नोंदणीकृत करून हवे असेल, तर तुम्हाला साक्षीदारांसह उप-निबंधकाच्या (Commissioner for Cooperation and Registrar) कार्यालयात जावे लागते.
मृत्युपत्र तयार करण्याचे कोणकोणते फायदे असतात?
- मृत्युपत्र तयार करून आपल्या मृत्युनंतर आपल्या संपत्तीची आपल्या मर्जीनुसार वाटणी केली जावी हे आपण सुनिश्चित करू शकतो.
- आपण जर आधीपासुन आपले मृत्युपत्र तयार करून ठेवले तर आपल्या मृत्युनंतर आपली संपत्ती कोणाला जास्त प्राप्त होईल किंवा कोणाला कमी प्राप्त होईल यावरून घरात कुटुंबियांमध्ये भांडण होत नाहीत.
- आपली जर ईच्छा असेल की आपल्या मृत्यु नंतर आपली पुर्ण संपत्ती एखाद्या गरीब अनाथ अपंग मुलांचा सांभाळ करत असलेल्या संस्थेला दिली जावी, तर मृत्युपत्र तयार केल्यास त्या संस्थेला कायदेशीर पदधतीने दान केली जाते.
- आपल्या मृत्युनंतर आपले अवयव एखाद्या गरजूला दान करण्यात यावे अशी इच्छा असल्यास,आपण त्याबाबद देखील आपल्या मृत्युपत्रात तशी नोंद करू शकतो. ज्याने आपल्या मृत्युनंतर आपले अवयव एखाद्या गरजुला दान केले जातात.
नक्की वाचा-दरमहा 50 हजार रुपये पेन्शन मिळवायचे आहेत का ? मग हे गुंतवणुकीचे पर्याय नक्की वाचा !
मृत्युपत्र कधी तयार करावे ?
- जीवनाचा आज काही भरवसा राहिलेला नाही. मृत्यू हा वेळ आणि काळ कधीही सांगुन येत नसतो.
- अशामध्ये कधीही आपला एखाद्या अपघातात तसेच शारीरीक आजारानेमृत्यू होऊ शकतो.
- म्हणूनच आपण १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच म्रुत्युअत्र तयार करून ठेवायला हवे.