Arthasakshar Health Insurance Renewal
Reading Time: 3 minutes

Health Insurance Renewal: आरोग्य विमा नूतनीकरण

आरोग्य विमा स्वतःसाठी व कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा असतो. आरोग्य विम्याचे नूतनीकरण (Health Insurance Renewal) करताना काही गोष्टींची खात्री करून घेणे आवश्यक असते.

आरोग्य खर्चामुळे वित्तीय त्रास कमी होण्यास मदत होते. विमा कालावधी संपायच्या आधी त्याचं नूतनीकरण करणं आवश्यक असतं. आरोग्य विम्याचे नूतनीकरण करणे अगदी सोपं आहे. परंतु, नूतनीकरण करताना काही गोष्टींची खात्री करून घेणे आवश्यक असते.

आरोग्य विमा खरेदी करण्याची 8 महत्वाची कारणे

आरोग्य विमाच्या कालबाह्यतेपुर्ती नूतनीकरण करणे:-

  • आरोग्य विमा हा काही कालावधीपुरताच असल्याने त्याचे नूतनीकरण करत राहावे लागते.
  • विमा कंपनी तारीख संपल्यावरही ‘ग्रेस पिरिएड’ उपलब्ध करत असते. पण एक महत्त्वाची गोष्ट यात असते की ग्रेस पिरिएड मध्ये विमा कंपनी कुठलेही कव्हरेज वा संरक्षण देत नाही. त्यामुळे आठवणीने आपल्या आरोग्य विम्याचे नूतनीकरण करावे.

आरोग्य विमा नूतनीकरण प्रक्रिया :-

  • आरोग्य विम्याचे नूतनीकरण हे ऑनलाइन करता येते. त्यासाठी विमा कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन आवश्यक माहिती भरून फॉर्म सबमिट करावा लागतो.
  • तसेच, विमा नूतनीकरण हे ऑफलाइन म्हणजे प्रत्यक्ष विमा कंपनीच्या जवळच्या शाखेत जाऊनही करता येते.
  • नूतनीकरण करताना काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. आपली पॉलिसी आपल्यासाठी योग्य आहे का? या गोष्टीचा विचार करून मगच नूतनीकरण करावे. नूतनीकरण करताना काही गोष्टी तपासून पाहिल्यास पुढे जाऊन पश्चात्तापाची वेळ येत नाही.

आरोग्य विमा नूतनीकरण: काही महत्वाच्या गोष्टी (Health Insurance Renewal: Important Points)

१. योग्य आरोग्य विम्याची निवड :

  • पॉलिसी नूतनीकरण काळात दुसऱ्या कंपनीची पॉलिसी घेता येणं शक्य असतं.
  • वर्तमान आरोग्य विमा योजनेमुळे ग्राहक संतुष्ट नसेल, तर बाजारातील इतर विमा कंपन्याच्या योजना पडताळून पाहाव्यात.
  • योग्य प्रीमियममध्ये जास्त कव्हरेज देणाऱ्या विमा कंपनीची पॉलिसी घ्यायचा विचार करावा.
  • आपली जुनी पॉलिसी नूतनीकरण करण्याचा एक महत्वाचा फायदा म्हणजे संबंधित पॉलिसीवरील नो क्लेम बोनस (NCB)आपल्याला मिळतो.

२. कुटुंबीयांची गरज आणि आरोग्य विमा:-

  • पॉलिसीच्या नूतनीकरण काळात एकदा विमा पॉलिसीचं सिंहावलोकन करावे.
  • आपल्या कुटुंबाला असलेली गरज आणि पॉलिसीमधील सुविधा, संरक्षण याचा विचार करावा.
  • या काळात काही गरजेचे नवे ड ऑन्स घेता येऊ शकतात. आपल्या आवश्यकतेनुसार ते घ्यावेत.

३. प्रमाणिक राहा (Declaration):-

  • ग्राहकाने कायम स्वास्थ्य विमा घेताना कंपनीशी प्रामाणिक असावे.
  • स्वतःला असलेले व्याधी किंवा नूतनीकरण काळात नव्याने झालेल्या काही व्याधींची माहिती (Declaration) विमा कंपनीला आठवणीने द्यावी.
  • यामुळे ग्राहकाला योग्य ते संरक्षण मिळू शकते.
  • व्याधींची माहिती लपवल्यामुळे पुढे प्रचंड मनस्ताप होण्याची शक्यता असते. तसेच तुमचा क्लेम नामंजूर होऊन पॉलिसी रद्द केली जाते.

४. काळजीपूर्वक आणि जागरूकतेने नूतनीकरण करावे:-  

  • पॉलिसी धारकाने पॉलिसी नूतनीकरण करताना सगळे बदल जागरूक राहून तपासून घ्यावेत.
  • नूतनीकरण झाल्याचे पुरावे, नोंदी, ऍड ऑन्स संपूर्ण तपासून घ्यावे. तसेच पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या सर्व नियम व अटी पडताळून घ्याव्यात.

आरोग्य आणि स्वास्थ्याच्या माध्यमांतून कर वजावटी देणारी कलमं

५. क्लेम सेटलमेंट:-

  • विमा धारकाने केलेला दाव्याचे  सेटलमेंट गुणोत्तर (Settlement Ratio) कसं आहे हे बघणं गरजेचं असतं. जास्तीत जास्त गुणोत्तर असणारी विमा कंपनी योग्य मानता येईल.
  • याशिवाय क्लेम सेटलमेंटला लागणारा वेळही विचारात घेणं आवश्यक आहे. क्लेम सेटलमेंटला कमीतकमी वेळ लावणारी कंपनी योग्य आहे असे समजावे.
  • पॉलिसी घेताना जरी हे गुणोत्तर तपासलेले असेल, तरी नूतनीकरण करताना पुन्हा तपासणे आवश्यक आहे.

६. हॉस्पिटल टाय-अप्स:-

  • आपल्या घराजवळील हॉस्पिटल्स, शहरातील हॉस्पिटल्स  किंवा ज्या शहरांत कामानिमित्त वा अन्य कारणांमुळे जास्त जाणं अथवा रहावं होतं तेथील हॉस्पिटल्स शी हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे टाय अप्स असणे गरजेचं असतं.
  • टाय अप्स  हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा मिळत असल्यामुळे विमा ग्राहकाची गैरसोय होत नाही. पूर्वी पाहिलं असेल तरी नूतनीकरण करतानाही या गोष्टी पडताळून पहाव्यात कारण एखादे हॉस्पिटल वगळण्यात आलेले किंवा नव्याने टाय-अप झालेले असू शकते. 

७. प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायजेशन:-  

  • हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापूर्वी करायच्या चाचण्या, अँब्युलन्सचा खर्च, भरती केल्यानंतरचा सर्व प्रकारचा वैद्यकीय खर्च हा संपूर्ण खर्च विमा कंपनी पॉलिसीमध्ये अंतर्भूत आहे का हे बघणं महत्त्वाचं ठरतं.
  • अनेक विमा कंपन्या ग्राहकाला पोस्ट हॉस्पिटलायजेशन म्हणजेच रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्यानंतरच्या वैद्यकीय खर्चाची सुविधाही ठराविक कालावधीपर्यंत (सामान्यतः जास्तीत जास्त २ महिने) देतात.
  • आपल्या पॉलिसीमध्ये सदर खर्च अंतर्भूत केलेले आहेत का? असल्यास त्याचे स्वरूप काय आहे? याबद्दलचे नियम बदलेल आहेत का? असल्यास काय बदल झाले आहेत? या साऱ्या गोष्टींची खातरजमा करून घ्यावी.

 आरोग्यम् धनसंपदा.. आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष नको! 

८. फ्री मेडिकल चेक-अप:-

  • आरोग्य तपासणी हा एक महत्वाचा व आवश्यक मुद्दा आहे.
  • वर्षातून किमान एकदा तरी आरोग्य तपासणी व सर्व टेस्ट्स करणे आवश्यक आहे.
  • आरोग्य विमा विकणाऱ्या जवळपास सर्वच विमा कंपन्या विमा धारकाला फ्री मेडिकल चेक-अपची सुविधा देतात. तरीही पॉलिसी नूतनीकरणाच्या वेळी या गोष्टीची पुन्हा एकदा खात्री करून घ्या. तसेच त्यासंबंधित नियम व अटी पुन्हा एकदा तपासून घ्या.
  • आरोग्य तपासणीमध्ये काही कमी-अधिक आढळले तरी विमा कंपनी धारकाचे प्रीमिअम्स रकम वाढत नाही.

९. प्री-एग्झिस्टिंग डिसीज:-

  • काही आजार हे रुग्णाला पॉलिसी खरेदी करण्याच्या आधीपासूनच झालेले असतात. त्यासंदर्भात रुग्णाने पॉलिसी खरेदी करतानाच डिक्लेरेशन दिलेले असते.
  • बहुतांश विमा कंपन्या सामान्यतः ४ वर्षानंतर काही प्री-एग्झिस्टिंग डिसीज कव्हर करतात. त्यामुळे चार वर्षानंतर प्री-एग्झिस्टिंग डिसीज कव्हर होत असल्याची खात्री संबंधित विमा कंपनीकडून करून घ्यावी.

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Contact us: [email protected] 

Read – Disclaimer policies 

Web search: Health Insurance Renewal  Marathi Mahiti, Health Insurance Renewal  in Marathi Health Insurance Renewal Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.