Holiday Plan
https://bit.ly/2FylS4c
Reading Time: 3 minutes

Holiday Plan: यशस्वी व्यक्तींची सुट्टी 

सर्वांना नेहमीच उत्सुकता असते की’यशस्वी व्यक्ती त्यांच्या सुट्टीमध्ये नक्की काय करत असतील? कसे असेल त्यांच्या सुट्टीचे नियोजन (Holiday Plan)?

सतत काम करत राहणे, नवनवीन गोष्टींचा विचार करत राहणे, येणाऱ्या समस्या सोडवत राहणे हाच यशाचा मूलमंत्र आहे असा तुमचा समज असेल, तर तो चुकीचा आहे. कधी कधी थोडा स्वल्पविराम घेणे, थोडी विश्रांती घेणे, मनाला जास्त ताजेतवाने बनवते. सुट्टीच्या दिवशी घेतलेली ही विश्रांती अनेकदा येणाऱ्या आठवड्याभरासाठी अधिक ऊर्जा देणारी ठरते.

हे नक्की वाचा: वेळेच्या नियोजनासाठी पार्किन्सनचा सिद्धांत

Holiday Plan: यशस्वी व्यक्तींची सुट्टी 

१.  येणाऱ्या आठवड्याचे नियोजन: 

  • कामाच्या दिवसाची सुरुवात बऱ्याचदा गडबड, धावपळ यानेच होते. यामागचे कारण म्हणजे नियोजनाचा अभाव. 
  • हे टाळण्यासाठी आणि तुमच्या कामाची सुरुवात आनंदाने होण्यासाठी तुमच्या सुट्टीच्या दिवसातला थोडा वेळ येणाऱ्या आठवड्याचे पूर्ण नियोजन करण्यासाठी देणे नक्कीच फायद्याचे ठरते. 
  • यामध्ये तुमच्या पुढच्या आठवड्यातील महत्वाच्या कामांची यादी करणे, त्यांचा प्राधान्यक्रम ठरवणे ते अगदी तुम्ही कोणत्या दिवशी कोणते कपडे घालणार आहात ते ठरवून त्यानुसार तुमचे कपाट लावण्यापर्यंत सर्वच येते. 
  • तुमच्या सुट्टीचा थोडा वेळ यासाठी दिल्यामुळे तुम्हाला जाणवेल की तुमची बरीचशी चिडचिड, धावपळ आणि ‘ऐनवेळी येणारी/आठवणारी कामे’ अगदी आटोक्यात आली आहेत.
  • याशिवाय आठवड्याच्या शेवटी तुमच्या असेही लक्षात येईल की या आठवड्यात तुमची जी काही नियोजित कामे होती ती बरीचशी हातावेगळी झाली आहेत.  

२. व्यायाम, मैदानी अथवा साहसी खेळ : 

  • शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी ‘व्यायाम’ हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. तसेच हलके-फुलके मैदानी खेळ खेळल्यामुळे देखील मन आणि शरीर प्रसन्न होतं. 
  • ट्रेकिंग, रिव्हर राफ्टिंग अशा साहसी क्रीडाप्रकारांमुळे नवीन आव्हाने स्वीकारण्याची सवय लागते. 
  • व्यायाम अथवा खेळामुळे एक वेगळाच उत्साह, हिम्मत, आत्मविश्वास आणि आनंद मिळतो. यशस्वी व्यक्ती व्यायाम व खेळांना नेहमीच महत्व देतात. 
  • इतरवेळी कामाच्या धावपळीमुळे व्यायामाला वेळ देता येत नसेल, तर सुट्टीच्या दिवशी यासाठी वेळ दिल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि पुढील आठवडाभर कामाचा उत्साह वाढतो. 

इतर लेख: या ५ सवयी असतात यशाच्या मार्गातले सर्वात मोठे अडथळे

३. गॅजेट्सपासून दूर राहणे: 

  • यशस्वी लोकांना हे माहित असते की ते त्यांचा लॅपटॉप, मोबाईल अशा गॅजेट्स पासून दूर नाही राहिले, तर ते स्वतःला, कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकणार नाहीत. 
  • जेव्हा तुम्ही सतत मेंदूला उत्तेजना देणाऱ्या उपकरणांपासून दूर राहता तेंव्हा तुमच्या मेंदूला आराम मिळतो, निद्रानाश, ताण, इ. अनेक मानसिक व्याधींच कारण ठरलेल्या सोशल मीडिया पासून सुट्टी मिळते. 
  • अनेक मानसोपचार तज्ज्ञांच्या मते गॅजेट्सपासून दूर राहणे ही मानसिक स्वास्थ्याची पहिली पायरी आहे.  
  • गॅझेटना दूर ठेवल्यास कामा व्यतिरिक्त ज्या गोष्टी केल्याने तुम्हाला आनंद मिळतो त्या सुट्टीच्या दिवशी आवर्जून केल्या पाहिजेत. उदा. वाचन, लेखन, बागकाम, स्वयंपाक, इत्यादी. 
  • स्वतःसाठी आणि स्वतःला ज्यामुळे आनंद मिळतो अशा गोष्टी केल्यामुळे एक माणूस म्हणून आपली प्रगती होतेच शिवाय यामुळे कामाचा ताण कमी होण्यास खूप मदत होते.

४.  पूर्णपणे ‘स्व’ साठी आणि प्रियजनांना वेळ देणे: 

  • या सुट्टीच्या दिवसातले काही तास यशस्वी व्यक्ती फक्त ‘स्वतःसाठी’ राखून ठेवतात. 
  • या वेळेत ते मागील काळात काय मिळवले/ गमावले, काय नवीन शिकले अशा गोष्टींचा आढावा घेण्यासाठी देतात. 
  • यातून एक प्रेरणा मिळते, स्वतःच्या निर्णयांबद्दल समाधान वाटते आणि पुढे जातानाचा आत्मविश्वास आणखी दृढ होतो. 
  • ‘माणूस’ म्हणून वाटचाल करताना या गोष्टी फार महत्वाच्या असतात आणि यातून आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन अधिक दृढ होत जातो.
  • आठवडाभर कामाच्या ताणामुळे, व्यस्त दिनचर्येमुळे जोडीदाराला, कुटुंबाला हवा तसा निवांत वेळ देता येत नाही. 
  • सुट्टीच्या दिवशी कुटूंबासोबत, मित्र-मैत्रिणींसोबत छान मजामस्ती करत वेळ घालवणे हे वेळ वाया घालवणे नसून, वेळ सत्कारणी लावणे असते हे या यशस्वी लोकांना माहित असते.

हे नक्की वाचा:या ५ सवयी असतात यशाच्या मार्गातले सर्वात मोठे अडथळे

५. प्रत्यक्ष विश्रांती घेणे: 

  • सुट्टी असल्यावर सर्वसामान्य लोकांची आवडती सवय म्हणजे तासनतास लोळत पडणे. यशस्वी लोक हे करणे टाळतात कारण त्यांना माहित आहे की यामुळे उलट शरीराची कार्यरत राहायची लय बिघडते आणि कोणत्याही गोष्टीत उत्साह रहात नाही. 
  • इंटरनेट वर सर्फिंग करणे, टीव्ही पाहणे यामुळे विरंगुळा होतो इतकच! पण शरीराला आणि मनाला पूर्ण विश्रांती हवी असेल, तर त्यासाठी प्रत्यक्ष विश्रांतीची जास्त गरज असते. 
  • ही प्रत्यक्ष विश्रांती तुम्हाला ध्यानधारणे सारख्या  अनेक गोष्टींमधून मिळू शकते. 

या यशस्वी लोकांच्या काही सवयी आहेत ज्या अंगिकारल्यामुळे आयुष्यात पुढे जाताना ते पुन्हा ताजेतवाने होऊन अधिक जोमाने काम करण्यासाठी सज्ज होतात. त्यामुळे ते चांगले रिझल्ट देऊ शकतात आणि हेच त्यांना ‘यशस्वी’ बनायला उपयोगी ठरत असते.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutes बी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutes बी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutes वाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutes सहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –