Work Stress
Reading Time: 2 minutes

Work Stress 

आज आपण सगळेच कामाचा ताण (Work Stress) अनुभवत आहोत. कामाच्या ताणाचे स्पर्धेमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी सगळ्यांचीच धडपड सुरु आहे. शिक्षण, क्रीडा, उद्योग, नोकरी प्रत्येक क्षेत्रात लोक तणाव, भीती, दबाव आणि त्यातून निर्माण होणारे कित्येक आजार याचा अनुभव नित्याचाच झाला आहे. चीनसारखा देश नोकरदारांना सक्तीची रजा घ्यायला लावतो, इतकी कामाच्या ताणामुळे आरोग्याची वाईट अवस्था झाली आहे. 

सध्या कोरोनामुळे अनेकांचे ‘वर्क फ्रॉम होम’ पुन्हा सुरु झाले, तर अनेकांचे ते कधी संपलेच नव्हते. केवळ कर्मचारीच नव्हेत तर, कित्येक व्यावसायिकही घरून काम करत आहेत. शाळांना सुट्टी, कामवाली बाई नाही त्यामुळे काम वाढले आहे. सततच्या बदलत्या परिस्थितीमुळे कामाचे नियोजन करणं म्हणजे तारेवरची कसरत आहे.

कामाचा ताण येण्याचे मुख्य कारण म्हणजे दिलेल्या मुदतीमध्ये का कसे संपवावे, हा प्रश्न. अभ्यास, काम याच्या दिलेल्या डेडलाईन पाळण्यासाठी २४ तासांचा दिवस कमी पडतो. 

पण हा ताणच येणारच नाही, असे होऊ शकते का? 

होय! जर कामाच्या अंतिम मुदतीपूर्वी काम कसे पूर्ण करावे, याचा कानमंत्र तुम्हाला मिळाला, तर तुम्हाला हा ताण मुळीच येणार नाही.

Work Stress: असे करा कामाच्या ताणाचे नियोजन 

दिलेली वेळ का पाळावी?

  • वेळ वाया जात नाही आणि व्यक्तीची कार्यक्षमता वाढते.
  • कुठल्या कामाला प्राधान्य द्यावे हे कळते.
  • कामाचे ओझे घरी घेऊन जावे लागत नाही.
  • “माफ करा काम झाले नाही”, हे उत्तर मान खाली घालून द्यावे लागत नाही.
  • नवीन संधी चालून येतात.

तुम्हालाही वक्तशीर बनायचे आहे? तर पुढील गोष्टी काळजीपूर्वक करा.

  1. शब्द देताना विचार करा- भावनेच्या भरात येऊन कोणतेही काम पूर्ण करण्याचे वचन देऊ नये. कितीही महत्वाचे असेल तरीही त्या कामाला किती वेळ लागू शकतो, आपल्याकडे हा वेळ आहे का, काय अडचणी येऊ शकतात, या सर्वाचा विचार करून लोकांना मुदत द्या.
  2. तत्काळ सुरवात- जमेल तितक्या लवकर कामाची सुरवात करणे गरजेचे आहे. “Well beginning is half done” असं म्हणतात. उत्तम सुरवात म्हणजे काम योग्य दिशेने जाणार याची खात्री मिळते. त्यामुळे टाळाटाळ न करता काम सुरु करणे, हा पहिला मंत्र आहे. 
  3. लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी दूर करा- कामाची मुदत जवळ आली असेल तेव्हा बाकी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. कारण जर तुम्ही तुमचं १००% एकच गोष्टींचे दिलं तरच काम गतीने संपते.
  4. नाही म्हणायला शिका – बऱ्याचदा “नाही” म्हणणे कठीण असते पण तेच सोयीचे ठरते. अधिकच्या कामासाठी नकार देणे आवश्यक आहे कारण डोईजड झालेल्या अनेक मुदती दिसत असतील,तर एकही काम पूर्ण होत नाही. त्यापेक्षा जे आहे तेवढेच नीट करणे आणि वाढीव काम अंगावर न घेणे  शहाणपणाचे आहे.
  5. पूर्व तयारी- काम सुरु करण्याआधी करावयाची सर्व तयारी करूनच काम सुरु करा म्हणजे अडचणी येऊन काम मध्येच थांबवावे लागणार नाही आणि वेळेत काम पूर्ण होईल.
  6. अवघड गोष्टी सर्वात आधी- ज्या कामाला जास्त वेळ लागणार आहे किंवा तुमच्या मते अवघड आहे, ते सर्वात आधी संपले, तर हातात जास्त वेळ उरेल आणि मुदतीच्या आधी काम संपेल. त्यामुळे अवघड आणि वेळखाऊ गोष्टी आधी संपवाव्या.

मुदत चुकली तर काय करावे?

  • कोणतेही काम पूर्ण करताना काय अनपेक्षित अडचणी येतील आपल्याला सांगता येत नाही. पण काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी कंबर कसून काम करणे आपल्या हातात आहे.
  • सर्व काळजी घेऊनही मुदतीची वेळ पाळू शकला नाहीत, तर घाबरू नका. काम पूर्ण न होण्याचे काही वैध कारण तुमच्याकडे असेल, तर ते स्पष्ट करा आणि माफी मागा.
  • कामाची मुदत वाढवून देण्याची विनंती तुम्ही करू शकता. तुम्हाला पुढची मुदत मिळत असेल, तर उत्तमच. तुम्हाला मिळालेली दुसरी संधी असेल ती.
  • आपल्यामुळे झालेल्या असुविधेसाठी काही भरपाई दिली जाऊ शकते का, याचा विचार करा.
  • आपण कोणाला दिलेली वेळ जर कोणाकडून पाळली गेली नाही, तर आपल्याला ज्याप्रमाणे राग येईल, त्याचप्रमाणे आपल्यामुळे दुसऱ्याचे झालेले नुकसान त्यांच्यासाठी त्रासदायक असू शकते, त्यामुळे शक्यतो कोणाच्या वेळेसोबत खेळ करू नये. कारण प्रत्येकाचीच वेळ मौल्यवान आहे.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Work Stress Management in Marathi, Manage Work Stress Marathi Mahiti, Manage Work Stress Marathi

Share this article on :
You May Also Like

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutesबी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutesबी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutesवाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutesसहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –