फसव्या योजना ओळखण्याची ६ लक्षणे

Reading Time: 2 minutes फसव्या योजना बनवून लोकांना ठगणारे अनेक बंटी आणि बबली समाजात उजळ माथ्याने फिरत असतात. या फसव्या योजनेचा कोणालातरी फटका बसतो आणि मग बाकीचे  सावध होतात. “पुढच्यास ठेच, मागचा शहाणा” ही म्हण आपल्याकडे उगाच प्रचलित नाही. चुका प्रत्येकजण करतो, पण ती चूक एकदा झाली की त्याच माणसाने तर ती पुन्हा करूच नये, परंतु इतरांनीही त्यातून योग्य धडे घेऊन ती चूक एकदाही करू नये. हीच गोष्ट पैशांबद्दलही लागू होते. 

Ponzi Schemes: फसव्या योजना कशा ओळखाल?

Reading Time: 2 minutes गुंतवणूक तर सगळेच करतात. ज्या गुंतवणुकीमध्ये आकर्षक परतावा असेल, त्या गुंतवणुकीला लोकं प्राधान्य देतात. साहजिकच आहे, पैसा कोणाला नको असतो? पण, हे साध्य करायचा मार्ग कोणता आणि कसा आहे, याची माहिती असल्याशिवाय फक्त आकर्षित व्याजदरांमागे धावू नये. लक्षात ठेवा चकाकतं ते सोनं नसतं. आकर्षक परताव्याच्या चकचकीत ऑफर्स फसव्या असू शकतात.

महिन्याला २-३-५% टक्के हमखास मिळवा योजनांचा भांडा-फोड

Reading Time: 3 minutes महिन्याला २-३-५% टक्के हमखास मिळवा आणि आपले जीवन आनंदी जगा. आधीच कमाई चे मार्ग कमी आणि खर्च जास्त असलेला मध्यमवर्गीय रिस्क न घेता आपल्या पदरात फायदा कसा पाडून घेता येईल याचा विचार करत असतो आणि मिळणाऱ्या हमखास नफ्याच्या आड बुद्धी गहाण ठेऊन गुंतवणूक करतो. तर, जाणून घेऊया या कंपन्या कशा चालतात आणि पुढे काय होते.

अर्थसाक्षर कथा – गुंतवणुकीचे मृगजळ

Reading Time: 4 minutes “अर्थसाक्षर कथा” या सदरामधील आजची कथा फसव्या योजनांच्या जाळ्यात अडकल्यामुळे एका हसत्या खेळत्या कुटुंबाला बसलेल्या लाखो रुपयांच्या भुर्दंडाची आहे.

श्रीमंत मी होणार!

Reading Time: 4 minutes गुंतवणुकीच्या माध्यमातून श्रीमंत होणं ही वेळखाऊ आणि कंटाळवाणी प्रक्रिया आहे. त्यात जर आपल्याला काहीतरी थरार किंवा ‘एक्साईटमेन्ट’ची अपेक्षा असेल तर ती योग्य नाही. मात्र लवकर श्रीमंत व्हायची घाई प्रत्येकालाच झालेली असते. कधी एकदा जादूची कांडी फिरतेय आणि मी श्रीमंत होतो असे झालेले असते. मात्र महामार्गांवर जागोजागी लावलेली ‘अति घाई, संकटात नेई’ सूचना इथेही लागू होते. आपल्या आर्थिक उन्नतीच्या स्वप्नाला फुंकर घालून, भुलवून, परताव्याविषयी अवास्तव, फसवी आश्वासने देऊन आपल्याला अजूनच नुकसानीत घालणाऱ्या गुंतवणूक योजनांची या जगात काही कमतरता नाही. मल्टी-लेव्हल मार्केटींग किंवा पिरॅमिड योजना या त्यातल्या प्रमुख योजना.