दिवाळी आर्थिक नियोजन
https://bit.ly/2IAg63a
Reading Time: 4 minutes

दिवाळी म्हणजे  दीपोत्सव ! 

गुलाबी थंडीत सर्वांच्या मनात उत्साह आणि आनंद घेऊन येणारी दिवाळी हा देशातील सर्वाधिक लोकप्रिय सण आहे. अगदी घराची स्वच्छता असो वा फराळाच्या पदार्थांवर ताव मारणं, कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन दिवाळीच्या प्रत्येक गोष्टींमध्ये सहभागी होतात. दिवाळीचा सण आपल्याला आर्थिक नियोजन करायला शिकवतो. आजच्या लेखात याबद्दलची माहिती  घेऊया. 

दिव्यांची रोषणाई, उटण्याचा सुगंध, फटाक्यांची आतषबाजी, फराळ आणि मिठाईचे विविध प्रकार या साऱ्यामुळे वातावरण मंगलमय झालेले असते. हवेतला गारवा उत्साह अजूनच वाढवत असतो. अशा या मंगलमय, सकारत्मक सणाकडून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. अगदी आपल्या आर्थिक जीवनात सहज आचरणात येतील असे धडे आपल्याला या सणाकडून शिकायला मिळतात.

हे नक्की वाचा: दसऱ्याला करा दहन या दहा आर्थिक सवयींचे!

दिवाळी आणि आर्थिक नियोजन:

१. आर्थिक अज्ञानाचा अंधार दूर करा

 • दिवाळीमध्ये आपण दिव्यांची रोषणाई, आकाशकंदील व तेलाच्या पणत्याही लावतो. दिव्याचा उजेड आपल्या सभोवतालचा अंधकार दूर करतो. 
 • जसं आपण घरामध्ये दिव्यांची  रोषणाई  करून घरातील अंधार दूर करतो, तसाच आपल्या आर्थिक माहितीचा अज्ञानरूपी अंधकारही  दूर करूया.
 • दिवा हे ज्ञानाचे प्रतीक आहे. मनामध्ये आर्थिक माहितीची ज्ञानज्योती लावून; गुंतवणूक, कर्ज, कर यांचे उत्तम नियोजन करण्यासाठी त्याबद्दल आधी संपूर्ण माहिती घ्या. अर्थसाक्षर होण्यासाठी प्रयत्न करा. 
https://bit.ly/35p8GsB

२. उत्तम नियोजन

 • दिवाळी हा मोठा सण आहे. या सणाची तयारी आपण १५ दिवस आधीपासूनच सुरु करतो. घराची स्वच्छता, खरेदी, फराळ, किल्ला, आकाशकंदील एक ना अनेक प्रकार आपण करत असतो.
 • असेच गुंतवणूक, कर अथवा कर्जाचेही नियोजन करा.  उदा. जर कर्जफेडीचा कालावधी २० वर्षांचा असेल तर, पहिल्या वर्षापासूनच हळूहळू तो कालावधी कमी करायचा प्रयत्न करा. सुरुवातीच्या ३ वर्षांत जास्तीत जास्त परतफेड करायचा प्रयत्न करा कारण पहिल्या ३ वर्षांत बँक तुमच्याकडून तुमच्या कर्ज रकमेवरचे व्याज वसूल करून घेत असते. 
 • उत्तम आर्थिक नियोजन केल्यास आर्थिक स्वातंत्र्य,  सेवानिवृत्ती, परदेशी सहल, मुलांचे उच्चशिक्षण, आदी आर्थिक उद्दिष्टे लवकर साध्य करता येतील. 

३. भेटवस्तू आणि ध्येय-आधारित गुंतवणूक

 • दिवाळी म्हटली म्हणजे भेटवस्तू हा एक अनिवार्य भाग असतो. आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देताना आपण त्याच्या आवडी निवडी लक्षात घेऊन त्यांना जे आवडेल किंवा त्यांच्यासाठी जे आवश्यक आहे अशाच गोष्टीची निवड करतो.
 • यामध्ये प्रत्येकाची आवड आणि गरज वेगवेगळी असते आणि आपण त्यानुसारच खरेदी करतो. उदा. छोट्या भाच्यांना ज्या गोष्टी घ्याल त्या मोठ्या बहिणीला नाही घेऊ शकत किंवा धाकट्या भावासाठी जी भेटवस्तू घ्याल ती आईसाठी नाही घेता येणार. 
 • हाच नियम आर्थिक नियोजन व  गुंतवणुकीलाही लागू होतो. प्रत्येक गुंतवणूकदाराची उद्दिष्ट्ये वेगवेगळी असतात. त्यामुळे आपल्या आर्थिक उद्दिष्टांवर आधारित आर्थिक नियोजन  करणे आवश्यक आहे. अर्थात यासाठी सर्वात आधी आपली आर्थिक उद्दिष्ट्ये निश्चित करणे आवश्यक असतं.
 • जसं कोणाकोणाला किती रकमेच्या आणि कोणत्या भेटवस्तू द्यायच्या हे निश्चित असतं, तसंच आपली आर्थिक उद्दिष्टे ठरवून त्यानुसार गुंतवणूक नियोजन करा. 

महत्वाचा लेख: उत्सव कर्ज: उत्सव काळात मिळणाऱ्या कर्ज सवलती आणि वस्तुस्थिती 

४. स्वच्छता आणि  पोर्टफोलिओ

 • दिवाळीच्या काही दिवस आधी घरांची साफसफाई केली जाते यामधील महत्वाचा भाग म्हणजे अनावश्यक वस्तूंची योग्य ती विल्हेवाट लावून आवश्यक वस्तूंची खरेदी करायची. 
 • हाच दृष्टिकोनआपल्या पोर्टफोलिओच्या बाबतीतही ठेवा. आपला पोर्टफोलिओ आपल्या आर्थिक उद्दीष्टांशी सुसंगत आहे का याबद्दल विचार करा.
 • जसे आपल्या घरांमध्ये, ज्या वस्तूंची आवश्यकता नसते अशा वस्तू आपण घरात सांभाळून त्यांची अडगळ करत असतो, त्याचप्रमाणे आपल्या पोर्टफोलिओमध्ये देखील खराब कामगिरी करणारे स्टॉक्स असतात जे इतर मालमत्तेवरही विपरित परिणाम करतात, म्हणूनच, त्यांनाही दूर करणे आवश्यक आहे.
https://bit.ly/36sHqsK

५. फटाके आणि गुंतवणूक 

 • दिवाळीच्या वेळी लोक विविध प्रकारचे फटाके खरेदी करतात. फटाके खरेदी करताना आपण त्यांचे वर्गीकरण करतो लहान मुलांसाठी फुलबाजे, भूइचक्र, पाऊस असे कमी धोकादायक तर मोठ्यांसाठी मोठे बॉम्ब, सुतळी बार असे मोठे फटाके खरेदी करतो. 
 • याचप्रमाणे गुंतवणूक करतानाही आपण आपली अल्पकालीन, मध्यम मुदतीची व दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट्ये निश्चित करून त्यानुसार गुंतवणूक करावी. 
 • फटाके धोकादायक आहे हे माहिती असूनही आपण खरेदी  करतो, पण त्याचवेळी आपण बॉक्सवरील सर्व सूचना व नियमांचे पालन करत असतो. त्याचप्रमाणे शेअर्स, म्युच्युअल फंड, इत्यादी जास्त जोखमीच्या पण उत्तम परतावा देणाऱ्या गुंतवणूका करतानाही त्यासंबंधित नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. 
 • फटाके धोकादायक असूनही आपण खरेदी करतो आणि ते उडवताना योग्य ती काळजी घेतो, तसेच, जास्त जोखमीच्या गुंतवणूका योग्य ती काळजी घेऊन कराव्यात. 
 • आर्थिक नियोजन करताना शेअर्स, म्युच्युअल फंड, रियाल इस्टेट, सोने, मुदत ठेव, इ.  वेगवेगळ्या गुंतवणूक प्रकारांच्या जोखीम आणि परतावा याबद्दल स्पष्ट माहिती असणे आवश्यक असते. म्हणूनच आपण आपला पोर्टफोलिओ तयार करताना जोखीम व्यवस्थापन धोरणाचा मसुदा तयार करणे आवश्यक आहे.

६. दक्षता आणि आपत्कालीन निधी 

 • दिवाळीचा हवाहवासा वाटणारा उत्सव साजरा करताना आपण योग्य ती काळजीही घेतोच. उदा. दिवा लावताना इलेकट्रीक वायर असो व तेलाच्या पणत्या असोत किंवा फटाक्यांची आतिषबाजी; लहान मुलं त्याच्याजवळ जाऊन कोणताही अपघात होऊ नये म्हणून आपण नेहमी दक्ष असतो. तेलाचे दिवे लावताना जवळपास कापड, पेपर किंवा इलेकट्रीक वस्तू नाहीत ना याची खात्री करून घेतो. 
 • त्याचप्रमाणे खर्च करतानाही जपून खर्च करणं आवश्यक आहे. आपल्या आर्थिक जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून व अनपेक्षित आर्थिक संकटांची तयारी म्हणून आपत्कालीन निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. 
 • आपत्कालीन निधीची तरतूद हा आर्थिक नियोजनाचा एक महत्वपूर्ण भाग आहे. यावर्षी आलेल्या अभूतपूर्व महामारीने विमा, आरोग्य विमा व आर्थिक नियोजन याचबरोबर आपत्कालीन निधीचे महत्वही पटवून दिले आहे. 

इतर लेख: शेअर बाजार: दिवाळीतील मुहूर्त ट्रेडिंग सेशनचे महत्व

आपल्या भारतीय संस्कृतीमधल्या प्रत्येक सणाचे महत्व केवळ सांस्कृतिक व धार्मिक गोष्टींपुरतेच मर्यादित नाही, तर त्यामधून आयुष्याचे तत्वज्ञान सांगितले आहे. याचप्रमाणे प्रत्येक प्रथेतून आपल्याला शिकण्यासारखं बरंच काही असतं. गरज आहे ती आपण स्वतःहुन ते समजून घ्यायची. 

दिवाळी आणि आर्थिक नियोजन याबद्दल माहिती घेतल्यावर तुम्हाला अर्थसाक्षरतेचं महत्व नक्की पटलं असेल.

या दिवाळीला अर्थसाक्षर यांचा दिवाळीमध्ये तुम्ही लावलेली अर्थसाक्षरतेची ज्ञानज्योत अखंड तेवत ठेवा. उतू नका, मातु नका अर्थसाक्षरतेचा घेतला वसा टाकू नका. 

टीम अर्थसाक्षरकडून दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा !!

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutes बी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutes बी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutes वाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutes सहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –