Reading Time: 3 minutes

साधारण प्रत्येकाने कधी ना कधी नवीन वर्षाचा संकल्प केला आहे. कोणी ३१ डिसेंबर ला केला असेल कोणी गुढी पाडव्याला केला असेल पण संकल्प प्रत्येकाने केला आहे. शाळा कॉलेजात असताना याच प्रस्थ जरा जास्त असत नंतर नंतर एक तर आपले संकल्प आपण पाळत नाही हे तरी कळून चुकत किंवा संकल्प करण्या साठी नवीन वर्षाची गरज नाही हे तरी कळून चुकत. माझा स्वतःच्या आणि काही जवळच्या मित्र मैत्रिणी, भाऊ बहिणी यांच्या अनुभवातून आणि या निरीक्षणातून एक गोष्ट लक्षात आली की समजा आपण काही संकल्प केला आणि साधारण ८-१० दिवस तो नियमित पाळला देखील पण समजा काही कारणाने त्यात काही गॅप आला मग कारण काहीही असेल परीक्षा, कामाचा भार किंवा कंटाळा परत बॅक तो रुटीन करायला कित्येकांना जमत नाही.

हेही वाचा – Cash Back Offers :  कॅश बॅक ऑफर खरोखरच उपयुक्त आहेत का?

कदाचित याचे कारण आणि नकळतपणे तो संकल्प पूर्ण करण्यापेक्षा तो नवीन वर्षी सुरू करून पूर्ण करणे यावर भर देतो. आणि तीच गोष्ट पून्हा सुरू करता येऊ शकते किंवा ती झाली नाही तर काय याचा प्लॅन बी कधी विचार केलेलाच नसतो.

हेही वाचा – Term insurance : सर्वात स्वस्त टर्म इन्शुरन्स प्लॅन फायदेशीर आहे का?

       २०२० या सालाने बरंच काही शिकवलं अस म्हणता येईल. मी कोणता ही संकल्प केलेला नव्हता पण योगायोगाने साधारण २०१९ च्या शेवटी काही गोष्टी ठरवल्या होत्या की पुढच्या वर्षी XYZ गोष्टी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. आणि २०२० चा गुढी पाडवा म्हणजे ३ महिन्यात “वक्त बदल गया, जसबात बदल गये प्रमाणे” प्रमाणे सगळ्यांचे प्लॅन फसले आणि आपण lockdown मध्ये अडकलो.

नुसतं शरीराने नाही तर कोणी शिक्षणाने, कोणी पगारवाढीने, कोणी लग्नासाठी, कोणाचं अजून काय असेल..!! पण हे झाल नाही तर काय ? याचा विचार कित्येकांनी केलाच नसावा..शिवाय इतकं काही होणार नाही हा विचार ही कोणी केला नसावा. प्लॅन बी असो नसो पण सगळे थांबले पडले कोणी धडपडत कोणी सरपटत पण सगळे पुढे आले. 

हेही वाचा – Health Insurance Premium तुमचा आरोग्य विमा प्रीमियम कमी कसा कराल ?

तेव्हा जग थांबलं होत म्हणुन संपूर्ण जग परत उभं राहिलं आणि इतरांना उभं राहायला एकमेका साहाय्य करू म्हणत राहील. पण जेव्हा आपला एखादा प्लॅन किंवा संकल्प पूर्ण होत नाही ? आणि त्याच कारण काहीही असेल आवाक्यातील किंवा आवाक्याबाहेरच पण ते झालं नाही तर काय ? याचा विचार करून ठेवण फार आवश्यक आहे हा २०२० चा सगळ्यात मोठा धडा होता..!!

हेही वाचा – अर्थसंकल्प: आयटीआर न भरण्याची तरतूद, कशी आणि कुणासाठी?

ती डिग्री हवीय पण पैसे नाहींयत, पैसे गोळा करायला झटून पाहाच पण नाहीच झालं तर काय ? दुसरी नेक्स्ट बेस्ट डिग्री शोधून ठेवावी. त्याच कंपनी मध्ये नोकरी हवीय, जरूर हवा तो जुगाड लावा, तयारी करा पण नाहीच झालं तर काय दुसरी एक त्याच प्रकारची शोधून ठेवा, मला वर्षात एक क्ष रक्कम गुंतवणूक करायची आहे, ठिक आहे  दात कोरून पैसे काढा पण नाहीच झालं तर काय ? क्ष च्या 70% तरी पैसे वाचवा. मला तिच्याशीच किंवा त्याच्याशीच लग्न करायचं आहे ठिक आहे, जरूर प्रयत्न करा नाहीतर काय? सगळी दुनिया करते तस arranged marriage करा किंवा दुसरा पार्टनर शोधा, नसेल तर एकट राहा पण ती किंवा तो नाहीतर काय हा पर्याय शोधणं आवश्यक आहे ते ही खूप आधी.

मी हा विचार बोलता बोलता माझ्या काही मित्रांसमोर बोललो होतो तेव्हा असाही एक मत प्रवाह आला की असा निगेटिव्ह विचार करायचाच नसतो की हे नाही झालं तर काय ? मग वास्तू तथास्तु म्हणते आणि ते होत नाही. निगेटिव्ह विचार करायचा नाही हा मुद्दा पटला पण हे नाही तर काय असा विचार करणे म्हणजे हे होणारच नाही असं असणं आवश्यक नाही. कदाचित तो विकल्प मनातल्या मनात ठेवावा. आपल्या मूळ संकल्पाकडे वेगाने आपण कूच करायला हवे पण प्लॅन बी च्या शक्यता आणि तयारी आपल्या पुरती का असेना ती होत राहावी या मताचा मी झालो आहे. म्हणून संकल्प करणं वाईट नाहीच ते हवेच पण विकल्पासह व्हावे हे Happy Realization करून दिल्याबद्दल वर्ष २०२० आणि कोविड चे आभार मानायला हवे हेच खरं…!!

Happy New Year 2023..!!

©प्रसन्न कुलकर्णी

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…

करोडपती कसे व्हावे?

Reading Time: 4 minutes माझ्या लहानपणी म्हणजे 50 वर्षांपूर्वी दहा हजार ही खूप मोठी रक्कम होती…

Education – नामांकन : गरज की आवश्यकता ?

Reading Time: 3 minutes तुम्ही निवडलेली एखादी व्यक्ती जी तुमच्या पश्चात तुमच्या मालमत्तेची उत्तर अधिकारी असेल.…

डिजिटल रुपया म्हणजे काय ? घ्या समजून

Reading Time: 2 minutes डिजिटल रुपया म्हणजे काय आणि त्याचा व्यवहारात उपयोग कसा होईल याची उत्सुकता…