Arthasakshar Protsahan Package & share Market
Reading Time: 2 minutes

प्रोत्साहन पॅकेजचे भारतीय शेअर बाजारावरील परिणाम 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना व्हायरसचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी २० लाख कोटी रुपयांच्या प्रोत्साहन पॅकेजची (Relief Package) घोषणा केली. या घोषणेचा बुधवारी भारतीय शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी ५० च्या दोन दिवसांच्या नुकसानीला ब्रेक लागला. फार्मा आणि एफएमसीजी वगळता इतर क्षेत्रांचे निर्देशांक ग्रीन झोनमध्ये बंद झाले. बँक निफ्टीने ४ टक्क्यांपेक्षा जास्त नफ्यासह आयटी, ऑटो, धातू, रसायन, उत्खनन, इन्फ्रा आणि ऊर्जा क्षेत्रातही वृद्धी घेतली. परंतु त्यानंतर १५ मी २०२० रोजी  मात्र आर्थिक प्रोत्साहन पॅकेज शेअर बाजारावर परिणाम करण्यात अपयशी ठरल्याचे दिसून आले. 

स्वावलंबी भारत ! २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेजची पंतप्रधान मोदींची घोषणा

  • मागणीच्या बाबतीत चिंता कायम असल्याने सरकारने जाहीर केलेले २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक प्रोत्साहन पॅकेज शेअर बाजारावर परिणाम करण्यात अपयशी ठरले आहे. 
  • एस अँड पी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी ५० निर्देशांकात शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये २ टक्क्यांची घसरण झाली. दिवस पुढे जाऊ लागला, तशी घसरण वाढत गेली. 
  • ३० शेअर सेन्सेक्सचा निर्देशांक ८८५.७२ अंक किंवा २.७७% नी घसरला. तो ३१,१२२.८९ अंकांवर बंद झाला. 
  • निफ्टी ५० चा निर्देशांक २४०.८० अंक किंवा २.५७% नी कमी झाला. तो ९,१४२.७५ अंकांवर बंद झाला.
  • अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ७५.५६ रुपयांवर घसरला. यामुळे गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांच्या भावनांवर परिणाम झाला. 
  • सेन्सेक्सचे ३० पैकी २३ शेअर्स आज रेड झोनमध्ये बंद झाले. सर्वात मोठा फटका आयटी, बँक्स, ऑटो आणि एफएमसीजी क्षेत्रातील प्रमुख शेअर्सना बसला.

Economic Package: “आत्मनिर्भर भारत अभियान” महत्वाच्या घोषणा !

बँकिंग क्षेत्रासाठी बॅकफायर:

  • निफ्टी बँक इंडेक्स मागील ट्रेडिंग सेशनच्या तुलनेत ५६८.४५ अंक किंवा २.८८% च्या घसरणीसह १९०६८.५० अंकांवर बंद झाला. 
  • सरकारी मालकीच्या पंजाब नॅशनल बँकेने ३.९२% किंवा १.२० रुपयांची घसरण नोंदवली. तो २९.४० रुपयांवर बंद झाला. 
  • एचडीएफसी बँकेचा नफाही कोरोना व्हायरसवर केलेल्या अनपेक्षित तरतुदींमळेही कमकुवत पडला.
  • अशा प्रकारे खासगी बँकांमध्ये सर्वोच्च भागीदारी असलेल्या खासगी क्षेत्राचा बँक शेअर बाजारात कमकुवत पडलेला दिसला. तो ८९३.८५ रुपयांवर बंद झाला, म्हणजेच ३३.८० रुपये किंवा ३.६४ टक्क्यांनी खाली आला.

टेक सेक्टरही रेड झोनमध्ये:

  • टेक महिंद्राच्या शेअरच्या किंमतीत ५.३२% किंवा २९.०० रुपयांची घसरण झाली. 
  • तो ५१५.७५ रुपयांवर बंद झाला. इन्फोसिस लिमिटेडदेखील लाल रंग दर्शवत बंद झाला. मागील ट्रेडिंग सेशनमध्ये ५.१०% ची घसरण होती. 
  • आज ज्या शेअर्सनी चांगला व्यापार केला, त्यात केमिकल आणि फर्टिलायझर्स, हेल्थकेअर सेक्टर्सदेखील होते.

Economic Package Day 2 : “आत्मनिर्भर भारत अभियान” विशेष घोषणा ! 

इन्फ्रा क्षेत्रातही मंदी कायम:

  • ज्यांनी डेली चार्टमध्ये चॅनल पॅटर्न ब्रेकआउट प्रदान केला, त्यात अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडचा समावेश आहे. आजच्या घसरत्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक स्थैर्य प्रदान करण्यात यशस्वी ठरला.
  • ट्रेडिंग सेशनच्या सुरुवातीला ३,४९१.०० रुपयांसह खालील स्तर गाठला आणि नंतर ४३.३० रुपये किंवा १.२२% च्या वृद्धीसह ३,५९०.०० रुपयांवर बंद झाला. 
  • जेके सिमेंट आजच्या सर्वात मोठ्या घसरणीसह १,०७४ रुपयांवर बंद झाला. याने शेअरमध्ये ५.३०%ची घसरण दर्शवली.

– श्री अमर देव सिंह

 प्रमुख सल्लागार, एंजल ब्रोकिंग लिमिटेड

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimerhttps://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…