Reading Time: 2 minutes
कोरोनाच्या कालावधीत अनेक गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून काढता पाय घेतला. पण काही गुंतवणूकदारांनी चांगले पैसे कमावले. शेअर बाजार पडत असताना गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते. शेअर बाजारातील ६ गोष्टी अशा आहेत ज्यांच्यापासून गुंतवणूकदाराने कायम लांब राहायला हवे.
१. कोणतेही नियोजन नसणे –
- गुंतवणूक करत असताना आर्थिक ध्येय, जोखीम घेण्याची क्षमता आणि किती काळ गुंतवणूक करायची हे माहित असायला हवे. या गोष्टी ठरलेल्या असतील तर गुंतवणुकीला सुरुवात करावी.
- आर्थिक गुंतवणूक करत असताना या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणूनच यांची नोंद घेणे, गुंतवणुकीचा आढावा घेणे आणि ती उद्दिष्टये पूर्ण करण्यासाठी पोर्टफोलिओ निश्चित करणे आवश्यक असते.
- आर्थिक सल्लागाराची गरज पडली तर मदत घेणे आवश्यक आहे.
२. शेअरची खरेदी करताना तात्पुरता विचार करणे –
- शेअर बाजारात एखाद्या शेअरमधून चांगला परतावा मिळतो तेव्हा गुंतवणूकदार त्या शेअरची अधिक खरेदी करतो आणि आधी का त्याची खरेदी केली नाही यावरून स्वतःला दोषी मानतो.
- पण कायम हे ध्यानात ठेवायला हवे की शेअरची खरेदी ही नफा मिळेल याच अपेक्षेने केलेली असते. व्यवसायात पैशांची निकड किंवा वैयक्तिक अडचण असेल आणि तुम्ही अल्पकाळात शेअरची विक्री केली तर तुमचा नफा कमी होतो किंवा तोटा सहन करावा लागतो.
- शेअर जास्त काळासाठी विकत घेतला तर त्यातून मिळणारा परतावा हा जास्त असतो.
नक्की वाचा : शेअर बाजारात उत्तम पोर्टफोलिओ कसा बनवाल?
३. गुंतवणुकीत अनिश्चितता असणे –
- जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार वॉरन बफेट म्हणतात, “की तुम्हाला ज्या उद्योगाबाबत माहिती नाही त्यामध्ये गुंतवणूक करू नये.”
- शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक योग्य नियोजन करून करावी, त्यामुळे स्थिर राहतो.
- एखाद्या शेअर मध्ये गुंतवणूक करताना संबंधित कंपनी आणि ती करत असलेल्या उद्योगाची माहिती असणे गरजेचे असते.
४. संयम न ठेवणे –
- गुंतवणूकदार म्हणून जास्त काळासाठी शेअर खरेदी करून ठेवल्यावर पोर्टफोलिओ हा हळूहळू आणि स्थिरपणे वाढत जातो.
- पोर्टफोलिओ स्थिर बनवण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे शेअरची खरेदी दीर्घकाळासाठी करावी.
- एक वेळ ठरवून दिला की त्या वेळेपर्यंत पोर्टफोलिओ चांगल्या प्रकारे तयार करता येतो आणि त्यामधून मिळणारा परतावाही जास्त असतो.
नक्की वाचा : आर्थिक नियोजनासाठी सल्लागाराची खर्च गरज असते का?
५. शेअर बाजाराचा योग्य अंदाज घेणे –
- शेअर बाजारात गुंतवणूक करताना त्याचा योग्य अभ्यास केलेला नसल्यास मिळणाऱ्या परताव्यातून नुकसान सोसावे लागू शकते.
- योग्य वेळी निर्णय घेऊन शेअर बाजारात गुंतवणूक करता यायला हवी. बरेच गुंतवणूकदार योग्य वेळ निवडत नाही आणि हा निर्णय घ्यायला चूक करतात.
- शेअर बाजारात गुंतवणूक करणे जमत नसेल तर एसआयपी हा सुरक्षित गुंतवणुकीचा मार्ग आहे. एसआयपी द्वारे केलेली गुंतवणूक योग्य वेळेत Power Of Compounding च्या गतीने वाढत जाते.
६. योग्य वेळेची वाट पाहणे –
- शेअर बाजारात गुंतवणूक करत असताना तोटाही सहन करावा लागतो. त्यानंतर नफा परत मिळवण्यासाठी विकत घेतलेल्या शेअरची किंमत मूळ खरेदीपर्यंत येत नाही तोपर्यंत शेअरची विक्री थांबवायला हवी.
- गुंतवणूकदार हा शेअर मधील तोटा ओळखण्यात अयशस्वी झाला की त्याला दोन प्रकारच्या तोट्याला सामोरे जावे लागते.
- एकामध्ये नुकसान सोसावे लागलेल्या शेअरची विक्री करणे गुंतवणूकदार टाळत असतात तर दुसऱ्यात गुंतवणुकीच्या पैशातून दुसऱ्या ठिकाणी गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवण्यात चूक होते.
निष्कर्ष :
- सुरुवातीला गुंतवणूक करत असताना चुका होत असतात. पण त्या चुका सुधारून परत योग्य प्रकारे गुंतवणूकदाराने शेअर मध्ये गुंतवणूक करायला हवी. वर दिलेल्या चुका टाळायच्या असतील तर योग्य प्रकारे विचारपूर्वक धोरण तयार करून त्याला धरूनच गुंतवणुकीला सुरुवात करायला हवी.
- गुंतवणूकदाराला स्वतः शेअर बाजाराचे ज्ञान नसेल तर त्याने योग्य प्रकारे अभ्यास करून गुंतवणूक करायला हवी किंवा आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यायला हवा.
Share this article on :
1 comment
धन्यवाद चांगली माहिती . शेवटचे दोन मुद्दे नकारार्थी पाहिजेत. म्हणजे योग्य वेळेची वाट न पाहणे , शेअर बाजाराचा अंदाज न घेणे