संकल्प जुनेच आर्थिक वर्ष नवे

Reading Time: 3 minutes १ एप्रिल २०१९ ला नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. नव्या वर्षाची सुरुवात साधारणपणे नव्या संकल्पानी केली जाते. ज्यांनी गुंतवणुकीस सुरुवात केली नाही त्यांनी ती विनाविलंब चालू करावी. ज्यांच्यावर कोणतीही जबाबदारी नाही त्यांनी आपल्या उत्पन्नाच्या किमान ४०% रकमेची गुंतवणूक करायला हरकत नाही.

गुंतवणूक नक्की कशासाठी? करबचतीसाठी की….. ?

Reading Time: 4 minutes नवीन (२०१९) वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही सर्वांनी आपापल्या कुटुंबासाठी आर्थिक नियोजनाचा आराखडा बनवला असेल. आता ही गुंतवणूक कुठे, कशी करावी? त्याचा साकल्यानं कसा विचार करावा? हे आपण पाहू. नववर्षाची सुरुवात हा करदात्यांचा बहुतेकदा करसवलतींसाठी गुंतवणूक करण्याचा काळ असतो. तेव्हा आज आपण गुंतवणूक आणि करबचत या विषयाकडे वळू.

सरते आर्थिक वर्ष आणि करनियोजन

Reading Time: 4 minutes अजून थोड्याच दिवसात हे आर्थिक वर्ष संपेल. पगारदार व्यक्तींना आपल्या आर्थिक स्थितिचा अंदाज  घेवून वैधमार्गाने करसवलतींचा लाभ घेवून करबचत करणे शक्य असून आपण त्याना मिळणाऱ्या विविध करसवलतींचा आढावा घेवू या.

करबचत करणारे गुंतवणुकीचे विविध पर्याय

Reading Time: 2 minutes संक्रांतीनंतर हळूहळू थंडीचा कडाका कमी होत जातो आणि आयकरचे गरम गरम वारे सगळीकडे वाहायला लागतात . मग शोधले जातात करबचत करणारे गुंतवणुकीचे विविध पर्याय!  खरंतर करबचत करणारी गुंतवणूक करण्याचा सर्वात योग्य कालावधी असतो तो, ‘आर्थिक वर्षाच्या सुरुवातीचा कालावधी’. परंतु “परीक्षेच्या आदल्या रात्री अभ्यास करण्याची सवय मोठं झाल्यावरही जात नाही” आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गुंतवणूक करण्याचे काम चालू असतं.

कलम ८० अंतर्गत करबचतीचे विविध पर्याय

Reading Time: 3 minutes आयकर कायदा १९६१, नुसार कलम ८० मध्ये करबचतीचे विविध पर्याय नमूद करण्यात आले आहेत. मागील भागात कलम ८० सी अंतर्गत नमूदकेलेल्या विविध पर्यायांची माहिती घेतली. या भागात उर्वरित सबसेक्शन अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या करबचतीचे विविध पर्यायांची माहिती घेऊया.

कलम ८०सी अंतर्गत करबचतीचे १० विविध पर्याय

Reading Time: 3 minutes नवीन वर्षाच्या आगमनानंतर हळूहळू आर्थिक नववर्षाचे वारे वाहायला लागतात. गुलाबी थंडीतही कर (Tax), गुंतवणूक (Investment), करबचत (Tax Saving) असे शब्द ऐकून घाम फुटतो. मग चालू होते लगबग कर वाचविण्याची आणि त्यासाठी शोधले जातात गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय! असे पर्याय जे कर वाचवून उत्तम परतावाही देतील.

करबचतीचे सोपे मार्ग

Reading Time: 4 minutes आपले खरे उत्पन्न न दाखवता बनावट नोंदीतून करापासून सुटका मिळण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. असे कराच्या चोरीचे गुन्हे शिक्षेस पात्र असतात. मग करबचत म्हणजेही कराची चोरीच आहे का? तर नाही. करबचत ही कराची चोरी नसून सामान्य माणसाचा कर वाचावा, त्याला कमीतकमी कर भरावा लागावा यासाठीचा एक कायदेशीर मार्ग आहे. व्यक्तीच्या वाढणाऱ्या गरजा आणि त्यांवर होणारा खर्च पाहता, सरकारकडे भरावा लागणारा कर सामान्य माणसाच्या आर्थिक नियोजनावर ताण निर्माण करतो. मोठ्या शहरांमध्ये वाढणाऱ्या गरजा आणि त्यावर होणारा खर्च, भविष्याच्या नियोजनासाठी पैशांची गुंतवणूक, शिक्षणासारख्या गरजांवर होणारा मोठा खर्च, हे सारे खर्च अपरिहार्य असतात. सर्व कर वगळून हातात खर्चासाठी येणारं उत्पन्न (Disposable Income) या सर्वांपुढे अपुरं वाटू लागतं. यातून लोकांनी कर चोरी किंवा इतर बेकायदेशीर मार्गांकडे जाऊ नये. कर वाचावा म्हणून विचारी आणि कायदेशीर मार्गाने करबचत करता येणे सहज शक्य आहे.