कर्जमाफी आणि कर्ज निर्लेखन म्हणजे काय?

Reading Time: 4 minutes सन २०१४ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत सरकारने  ६.६६ लाख कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. त्यातील ६८६०७ कोटी रुपयांची कर्जे विजय मल्या, निरव मोदी, मेहुल चोक्सी या सारख्या ५० प्रमुख थकाबाकीदारांची आहेत, अशा आशयाच्या बातम्या समाज माध्यमातून प्रसारित होत असून त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया वाचायला मिळतात. याबाबत वस्तुस्थिती काय ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न. 

लॉकडाऊन व अर्थव्यवस्थेतील अपरिहार्य बदल

Reading Time: 5 minutes लॉकडाऊन मध्ये अनेकांना नोकरी, व्यवसाय, आर्थिक नियोजन, गुंतवणूक, बचत याची काळजी आणि एकंदरीतच कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे येणाऱ्या नैराश्याने ग्रासलं आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रसिद्ध बिझनेस कोच आणि मोटिवेशनल स्पीकर “चकोर गांधी” यांनी लॉक डाऊन मध्ये  बदललेल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन आर्थिक नियोजन व गुंतवणुकी संदर्भात मार्गदर्शन करणारा ऑडिओ आम्ही ऑडिओ आणि लिखित अशा दोन्ही स्वरूपात प्रकाशित करत आहोत. 

कोरोना – रिझर्व बँकेकडून अर्थव्यवस्थेस दुसरा बूस्टर डोस

Reading Time: 2 minutes आरबीआय गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी २७ मार्च नंतर लगेचच २० दिवसांनी भारतीय अर्थव्यवस्थेस दुसरा बूस्टर डोस पाजला आहे. कोविड -१९ संकटाशी सामना करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्यात येतील असे यापूर्वीच आरबीआय कडून जाहीर करण्यात आले होते. यामुळे होणाऱ्या परिणामांवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी ९० तज्ञाची कमिटी (war room) स्थापन करण्यात आली आहे. आज सकाळी पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय व त्याचे परिणाम-

कर्जाच्या हप्त्याला स्थगिती दयावी का?

Reading Time: 3 minutes कोरोनाने महामंदी सोबतच महामारीचा यक्ष प्रश्न उभा केला. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक हातात हात घालून काम करण्यास सज्ज झाले आहेत. लोकांच्या हाती अडचणीच्या काळात खर्च करण्यासाठी पैसे राहावेत म्हणून ३ महिन्यांसाठी सर्व प्रकारच्या मुदतीच्या कर्जांचे हप्ते स्थगित करण्याचा पर्याय कर्जदारांना उपलब्ध करून देण्याची मुभा बँकांना देण्यात आली. आर्थिक भाषेत मॉरेटोरीअम म्हणजे कर्जाची परतफेड पुढे ढकलण्याचा कायदेशीर अधिकार. परंतु त्यावरून सामान्य कर्जदारांचे बरेच गैरसमज झाले आहेत. आपण हा मुद्दा उदाहरणाने समजून घेण्याचा प्रयत्न करू.

बुडणाऱ्या बँकांपासून गुंतवणूकदारांनी घ्यायचा बोध

Reading Time: 3 minutes व्यक्ती, संस्था यांच्याकडून व्याज देऊन ठेवी स्वीकारून गरजू व्यक्ती, संस्था यांना जास्त दराने व्याज घेऊन पैसे देणे हे बँकांचे मुख्य काम. याशिवाय इतर अनेक छोटे मोठे उद्योग करून बँका आपले उत्पन्न वाढवतात. पैसे पाठवण्याची सोय करणे, लॉकर पुरवणे, क्रेडिट कार्ड सुविधा देणे, व्यावसायिकांना कॅश क्रेडिटची सुविधा देणे, गुंतवणूक, विमा सुविधा पुरवणे इ. रिझर्व बँकेच्या नियमांचे पालन करून सर्व बँका आपला व्यवसाय करतात. यामध्ये सहकारी व सरकारी बँकांचे योगदान मोठे आहे. कर्जदारांना दिलेले कर्ज व त्यावरील येत असलेले व्याज ही बँकांची मालमत्ता असते तर ठेवीदारांच्या ठेवी व त्यावरील द्यावयाचे व्याज ही बँकांची देयता असते. 

कर्ज परतफेड -कर्जमाफी नाही, तर सवलत !

Reading Time: 2 minutes रिझर्व बँकेचे अलीकडील ‘अर्थव्यवस्थेस गती देणारे निर्णय व त्याचे परिणाम’ यातील कर्ज परतफेड निर्णयाबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असून याबाबत पत्रकात असलेली असंधिग्ध वाक्यरचना, त्याचे वेगवेगळ्या लोकांनी काढलेले अर्थ आणि समाज माध्यमात प्रसारित होणाऱ्या उलटसुलट बातम्या यामुळे यातील घोळ अजून वाढत असल्याने यासंबंधी योग्य ती माहिती नक्की काय आहे व त्याचा नेमका काय परिमाण होतो ते पाहुयात.

रिझर्व्ह बँकेचा कर्जदारांना ३ महिन्यांचा दिलासा : जाणून घ्या वस्तुस्थिती

Reading Time: 2 minutes रिझर्व्ह बँकेने आज कर्जदारांसाठी मोठी घोषणा केली आहे.  कोरोना व्हायरस बाबत ‘आरबीआय’ने कर्जदारांसाठी नेमकी काय घोषणा केली आहे ? यासाठीचा कालावधी कोणता आहे ? कर्ज माफी आणि अतिरिक्त कालावधी यात काय फरक आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

कोरोना – रिझर्व्ह बँकेचे महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्याचे परिणाम

Reading Time: 3 minutes रिजर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी दिनांक २७ मार्च २०२० रोजी पत्रकार परिषद घेऊन कोविड १९ मुळे उद्भवलेल्या सध्याच्या कठीण परिस्थितीत अर्थव्यवस्था गतिमान करण्याच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत हे निर्णय कोणते व  त्याचे काय परिणाम होऊ शकतात याबद्दल विचार करूयात.

कमी क्रेडिट स्कोअर असताना वैयक्तिक कर्ज कसे मिळवाल?

Reading Time: 3 minutes क्रेडिट स्कोअर हा तीन अंकी क्रमांक आहे, जो कर्ज मंजूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. ही तीन अंकी संख्या ३०० ते ९०० दरम्यान असते. सामान्यपणे ७५० किंवा त्यापेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असेल तर तो चांगला मानला जातो, अथवा पेक्षा कमी असणारा अंकाला खराब क्रेडिट स्कोअर असं म्हटलं जातं.  क्रेडिट स्कोअर कमी असल्यास कर्ज मंजूर होण्यात अडथळे येतात किंवा मंजूर होत नाही. 

तरुणांसाठी गुढीपाडवा व नवीन आर्थिक वर्षाचे संकल्प

Reading Time: 3 minutes सर्वसाधारणपणे उच्च शिक्षण पूर्ण होऊन नोकरी व्यवसायास सुरुवात केल्यापाऊन त्यात स्थिरस्थावर होईपर्यंत ३० वे वर्ष चालू होते. तेव्हा या वयोगटातील व्यक्तीने येणाऱ्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर, खरं तर कोणताही मुहूर्त न पाहता लवकरात लवकर काही नवे संकल्प करावेत.