रिअल इस्टेट – रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक न करण्याची ७ कारणे… 

Reading Time: 3 minutesभारत हा शेतीप्रधान देश आहे. अर्थातच इथल्या प्रत्येकाची जमिनीशी नाळ जोडलेली असते. वडिलोपार्जित मिळालेली जमीन असो किंवा घर आधी आजोबांनी जपलेलं पुन्हा वडिलांनी त्यांच्या हयातीत पुढच्या पिढीसाठी राखून ठेवलेलं असतं, थोडक्यात काय तर घराचा संबंध भावनेशी जोडलेला असतो. साहजिकच आहे म्हणा, स्वत:च हक्काचं घर प्रत्येकाला हवं असतंच. भाड्याच्या घरात आपली हयात घालणारे मुलीचे वडील पैसा जमवून ठेवतात कारण त्यांना मुलीची पाठवणी त्यांच्या स्वत:च्या घरातूनच करायची असते. भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा स्वत:च्या घरात रहायला आपल्याला नेहमीच आवडतं. त्या हक्काच्या घरात, आपण आणि आपलं कुटुंब राहत असल्याचं समाधान फार मोठं असतं. कारण त्यामागे आपले अनेक प्रयत्न आणि कष्ट असतात. पण हल्ली गुंतवणूकीचा पर्याय म्हणून आपण रिअल इस्टेट क्षेत्राकडे पाहत असल्यास, काही नुकसानकारक गोष्टींचा विचार करायला हवा. 

Technical Analysis Chart Patterns: तांत्रिक विश्लेषणातील चार्ट पॅटर्न्स

Reading Time: 4 minutesTechnical Analysis Chart Patterns तांत्रिक विश्लेषण हे चार्टच्या आधारावर केले जाते. शेअर…

P/E Ratio: ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’- शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांचा अदृश्य सल्लागार !

Reading Time: 4 minutesमग शेअर बाजारात गुंतवणूक करताना केवळ चढता-उतरता ग्राफ पाहून, हिरवे किंवा लाल आकडे पाहून अथवा कुणाच्या ‘टीप’च्या आधारे गुंतवणूक करायची ठरवणे म्हणजे वेडेपणाच म्हणायला हवा की नाही? अर्थात शेअर मार्केटमध्ये आपणास प्रत्यक्षरित्या कंपनीचे कामकाज पाहता येत नाही किंवा एवढ्या मोठ्या उद्योगाची आवक जावक पडताळून पहात बसणे शक्य नसते. अशावेळी आपल्या मदतीला धावून येतो तो ‘पी/ई रेशो’.

Candlestick Patterns: शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी उपयुक्त असे महत्वाचे कॅन्डलस्टिक पॅटर्न

Reading Time: 4 minutesतांत्रिक विश्लेषणात महत्वाचा भाग म्हणजे कॅन्डलस्टिक पॅटर्न (Candlestick Patterns) होय. यामध्ये आपणास अनेक प्रकारचे पॅटर्न दिसून येतात. त्यापैकी काही अत्यंत महत्वाचे पॅटर्न आणि ट्रेडिंग व गुंतवणूक करताना त्याचा वापर कसा करावा व ते कसे उपयुक्त असतात याबद्दल माहिती घेऊया.

ESG Funds: शाश्वत गुंतवणूकशैली जोपासणारे ईएसजी फंड

Reading Time: 4 minutesजगापुढे असलेल्या अनेक समस्यांपैकी- अन्न सुरक्षितता, असमान प्रगती, बेरोजगारी, वातावरणातील बदल, आर्थिक विषमता, लिंग असमानता, महायुद्धाची शक्यता यासारख्या प्रमुख समस्यांची  सोडवणूक शाश्वत जीवनशैली स्वीकारल्यासच होऊ शकेल याबद्दल बहुतेक तज्ज्ञांमध्ये एकमत आहे. त्यादृष्टीने जागतिक पातळीवरील विविध संघटना आपल्या सदस्यांनी आचरण पद्धतीत कोणते बदल करावे याबाबत मार्गदर्शन करत असतात. यादृष्टीने म्युच्युअल फंड योजनांत ईएसजी योजनांकडे विशेष योजना म्हणून पाहता येईल. 

Nykaa IPO: नायका आयपीओ बाबतच्या या १० गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

Reading Time: 3 minutes‘नायका’ आयपीओ (Nykaa IPO) मार्केटमध्ये विक्रीसाठी उपब्ध होत आहे. साधारणतः महिला वर्गाला किंवा ‘पती’ वर्गाला ‘नायका’ नेमका काय ब्रँड आहे? ही कंपनी कुठल्या क्षेत्रात काम करते? याविषयी थोडीबहुत माहिती असेल, परंतु आपण गुंतवणूकदार किंवा आर्थिक घडामोडींकडे सुज्ञपणे पाहणारे जाणकार असाल तर ‘नायका’च्या आयपीओची कुणकुण आपल्या कानी आली असेल. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी ‘नायका’ विषयी काही महत्वाची माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे.

Aptus Value Housing Finance: Aptus व्हॅल्यू हाऊसिंग कपंनीच्या आयपीओ संदर्भात ९ महत्वाच्या गोष्टी : 

Reading Time: 3 minutesगृहकर्ज देणाऱ्या क्षेत्रातील मोठं नाव  ‘Aptus व्हॅल्यू हाऊसिंग (Aptus Value Housing Finance)’ कंपनी आपला आयपीओ घेऊन आली आहे. घराचं बांधकाम, नवीन घर खरेदी, घर सुधारणा या सर्व गरजांसाठी लोकांना तत्परतेने मदत करणाऱ्या या कंपनीच्या आयपीओला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतांना दिसत आहे. ‘Aptus व्हॅल्यू हाऊसिंग’ या कंपनीने काही वर्षांपूर्वी मालमत्ता विमा सुद्धा सुरू केल्याने त्यांच्या ग्राहक संख्येत लक्षणीय वाढ झाली आणि ही कंपनी खऱ्या अर्थाने लोकांना माहीत झाली.

NSC RFSC – आंतराष्ट्रीय शेअरबाजाराकडून गुंतवणूकीची संधी

Reading Time: 2 minutesमुंबई शेअरबाजार पुरस्कृत इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज व राष्ट्रीय शेअरबाजार पुरस्कृत एनसीसी आरएफएससी (NSC RFSC) हे भारतातील दोन आंतरराष्ट्रीय शेअरबाजार आहेत. गांधीनगरजवळ नव्यानेच वसवण्यात आलेल्या गिफ्टसिटी या आंतराष्ट्रीय व्यापार केंद्र असलेल्या स्मार्ट शहरात दिवसभरातील 22 तास कामकाज चालू असणारा इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज व 15 तास सुरू असणारा एनसीसी आरएफएससी यामुळे जगभरातील लोकांना भारतातील आंतरराष्ट्रीय बाजारात व्यवहार करण्याची सोय झाली आहे. येथे करविषयक अनेक सवलती असल्याने  गुंतवणूकदारांना कमीतकमी खर्चात स्पर्धात्मकदराने येथे व्यवहार करता येतात.

Nuvoco Vistas Corporation IPO: ‘नुवोको विस्टाज कॉर्पोरेशन’ आयपीओ बाबत या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

Reading Time: 3 minutes‘नुवोको विस्टाज कॉर्पोरेशन’चा आयपीओ (Nuvoco Vistas Corporation IPO) मार्केटमध्ये विक्रीसाठी उपब्ध झाला आहे. यामध्ये आपण गुंतवणूक करायला हवी की नको? आजच्या घडीला घेतलेला निर्णय भविष्यात पश्चातापास कारणीभूत  ठरणार नाही ना? अशी चलबिचल मनात असताना उगाच धाडसी निर्णय घेत अंधारात तीर मारणे म्हणजे आत्मघात ठरू शकतो. या आयपीओ बाबत कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी आपणास माहिती असायला हव्यात.

Technical Analysis: शेअर बाजार गुंतवणुकीमध्ये तांत्रिक विश्लेषणाचे महत्व

Reading Time: 3 minutesगुंतवणूकदार मूलभूत विश्लेषणाचा तर ट्रेडर्स तांत्रिक विश्लेषण विचारात घेतात. खरं तर या दोन्ही गोष्टींचा एकत्रित विचार केल्यास ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार दोघांनाही अधिक फायदा होऊ शकतो. शेअर बाजारामध्ये पाहिलं तर ७०% व्यवहार ट्रेडिंगचे होतात. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ट्रेडर यांना तांत्रिक ज्ञानाची गरज आहे. यात प्रामुख्याने आलेखांचा (Charts) विचार केला जातो. या दृष्टीनेही चार्ट विश्लेषण प्रणाली सर्वात विश्वसनिय व लोकप्रिय आहे. काही वर्षांपासून याचा वापर वाढत आहे.