Browsing Tag
दीर्घकालीन गुंतवणूक
10 posts
स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करताय? लक्षात ठेवा या ५ गोष्टी
Reading Time: 2 minutesस्टॉक मार्केट म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो भरघोस परतावा किंवा प्रचंड नुकसान. अनेकदा पूर्वग्रहदूषित नजरेने आपण स्टॉक किंवा शेअर्स खरेदीकडे बघत असतो. परंतु, तुमच्याकडे स्टॉक निवडण्याचे योग्य कौशल्य आणि सतत देखरेख करण्यासाठी वेळ असेल, तर तुम्ही स्टॉकमार्केट म्हणजे शेअर बाजारात गुंतवणुकीचा विचार करू शकता.
निवृत्तीपश्चात सुरक्षित मुद्दल आणि नियमित उत्पन्न देणाऱ्या योजना
Reading Time: 3 minutesगुंतवणुक करताना आपल्यासाठी प्राधान्यक्रम हा मुद्दलाची सुरक्षितता, रोखता आणि नियमित उत्पन्न अशा प्रकारे असतो. त्याशिवाय चलनवाढीला तोंड देण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूकदेखील करावी लागते आणि इन्कम टॅक्स देखील कमीत कमी बसेल हे पाहावे लागते. मात्र ‘आखूड शिंगी बहुदुधी’ अशी सर्वगुणसंपन्न गुंतवणूक योजना कुठलीच नसते. विविध प्रकारच्या गुंतवणूक पर्यायांमध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात आणि त्यांची एकत्र मोट बांधून, पोर्टफोलिओ बनवून आपल्याला मार्ग काढावा लागतो. हे रिटायर्ड लोकांना माहिती असलेच पाहिजेत असे विविध गुंतवणूक पर्याय कुठले आणि त्यांचे गुणधर्म काय, हे आपण आज पाहू. मात्र प्रत्येक पर्यायात किती रक्कम गुंतवावी हा प्रत्येकाच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.
काय आहे निवृत्तीनियोजनाचे गणित?
Reading Time: 4 minutesसध्या तरुणांमध्ये लवकर रिटायर होण्याचं एक स्वप्न फॅशन किंवा फॅड सारखं दिसून यायला लागलंय. वयाच्या ४५-५० वयापर्यंत उत्पन्न, जबाबदाऱ्या वगैरे विवंचनेतून बाहेर पडून पुढचं ‘लाईफ एन्जॉय’ करायचं. मात्र हे व्यवहारात उतरवण्यात एक मोठी समस्या असते. लवकर रिटायरमेंटमुळे एकीकडे कमाईची आणि गुंतवणुकीची वर्षे कमी होतात, तर दुसरीकडे साठवलेली पुंजी जास्त वर्षे पुरवावी लागते. म्हणजेच ४५व्या वर्षी रिटायरमेंट घेणाऱ्याला निधी जमा करायला वीसच वर्षे मिळतात आणि ती पुंजी वयाच्या नव्वदीपर्यंत म्हणजे पुढील ४५ वर्षे पुरवणे गरजेचे ठरते. अर्थातच त्यासाठी कमाईच्या वर्षात बचत किंवा गुंतवणुकींसाठी उत्पन्नाचा फार मोठा भाग बाजूला काढावा लागतो. हे प्रत्येकाला शक्य असतेच असे नाही.
संकल्पाचा ‘अर्थ’ आणि गुंतवणुकीचा १५×१५×१५ चा नियम
Reading Time: 3 minutesअर्थसंकल्पानंतर भारतीय शेअर बाजारात झालेली घसरण पाहता बऱ्याच गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणुकीची चिंता भेडसावू लागली आहे. स्थिर सरकार आले म्हणून बाजार वर जाणार, या अपेक्षेने भरघोस परतावा मिळेल या आशेवर असलेले गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. खरतरं शेअर बाजार म्हणजे चढ-उतार हे समीकरण निश्चित ठरलेल आहे. मग एकतर तुम्ही परताव्याचा दर किंवा गुंतवणूक कालावधी ठरवून संकल्प सोडला पाहिजे. परंतु गुंतवणूक म्हणजे रग्गड नफा हेच एक समीकरण आपल्या मनात ठरलेले असते. मग तो नाही मिळत असे दिसू लागले की तोटा सहन करणे किंवा केलेली गुंतवणूक कवटाळून धरणे हे दोनच पर्याय शिल्लक राहतात.
श्रीमंतीच्या मार्गातील ‘अडथळे’
Reading Time: 3 minutesआर्थिक निर्णय म्हणजे फक्त गुंतवणूक हा समज सर्वात अगोदर दूर करा. खर्च करणे हा सुद्धा आर्थिक निर्णय प्रक्रियेतील एक अविभाज्य भाग आहे. त्यासाठी तुम्हाला तुमची जोखीम घेण्याची क्षमता माहित असलीच पाहिजे. ते न बघता जाहिरातींच्या प्रभावामुळे सामान्य माणसाचं चित्त विचलीत होते आणि गरज नसलेले आर्थिक निर्णय घेतले जातात.
गुंतवणुकीची उद्दिष्टे, उत्साह अन् उल्हास
Reading Time: 3 minutesप्रत्यक्षात बघायला गेलं तर गुंतवणूक करणं किंवा त्यातून श्रीमंत होणं ही एक संथ आणि त्यामुळे कंटाळवाणी प्रक्रिया आहे. आपण नियोजनाचा प्लान बनवताना, आपली आर्थिक उद्दिष्टे निश्चित करताना कदाचित कोणी स्वप्नं बघू शकेल, आपण काय काय साध्य करू शकतो? याच्या शक्यता कोणाला रोमांचकारी वाटू शकतात. पण श्रीमंत होण्याच्या कल्पना आणि त्यासाठीची प्रक्रिया यात एक मोठा फरक असतो. तो प्लान प्रत्यक्षात उतरवण्याची प्रक्रिया संथ व संयत असते.
कसे कराल बोनसचे नियोजन?
Reading Time: 3 minutesआर्थिक नववर्षाची सुरुवात करून देणारा एप्रिल महिना बहुसंख्य नोकरदारांसाठी विशेष महत्त्वाचा असतो. त्यांचे वार्षिक अप्रायजल झालेले असल्यामुळे साधारण याच सुमारास त्यांना त्यानुसार वार्षिक बोनस मिळणार असतो व पुढील वर्षासाठीची पगारवाढ ठरणार असते. बोनस किंवा तत्सम इतर कुठलाही एकरकमी मोठा निधी हातात आला, की त्याच्या खर्चाला वाटा फुटायला वेळ लागत नाही. तसे होऊ नये यासाठी अशा ‘लम्प-सम’च्या गुंतवणुकीचा विचार प्रत्येकाने आधीपासूनच करणे योग्य असते.
फसव्या विमा पॉलिसींचा सापळा
Reading Time: 4 minutesएन्डोमेंट किंवा मनीबॅकसारख्या पारंपरिक आयुर्विमा पॉलिसी आपल्याला कधीच पुरेसं विमासंरक्षण देऊ शकत नाहीत. बहुतांश वेळा त्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आणि करबचतीसाठी म्हणून विकल्या जातात. म्हणून या पॉलिसी गळ्यात बांधण्यासाठी जे दीर्घकालीन गुंतवणूक आणि आकर्षक परताव्याचं गाजर आपल्याला दाखवलं जातं, त्याचा परामर्श घेऊ.
आयपीएल आणि गुंतवणूक
Reading Time: 3 minutesक्रिकेटच्या तरुण चाहत्यांसाठी गुंतवणुकीच्या काही खास टिप्स. वर्षातून एकदा येणारी आयपीएल मॅच सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जाते. एवढंच काय तर मॅच आपल्याला गुंतवणुकीचे तत्वज्ञान शिकवून जाते. कशी? अगदी सोपं आहे! आता आयपीएल मॅच दरम्यान तुम्ही खेळाडू ज्या ज्या गोष्टी करतात त्या लक्ष देऊन बघा आणि त्यांना तुमच्या आयुष्यातील आर्थिक घटनांशी जोडून बघा. तुमच्या लक्षात येईल की मॅच मध्ये लागणारी खिलाडूवृत्ती, चिकाटी, आणि गुंतावूणुकीच्या नियमांमध्ये बरंच साम्य आहे आणि क्रिकेटचा जाणकार एक चांगला नियोजक किंवा गुंतवणूकदार होऊ शकतो.